AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यातल्या सीआयडी कार्यालयातून 4 UPS चोरीला, सफाई कामगारानेच चोरी केल्याचे उघड

पुण्यातील पाषाण रोड परिसरात असणाऱ्या सीआयडी कार्यालयातून युपीएसची चोरी झाल्याचं समोर आलं आहे.

पुण्यातल्या सीआयडी कार्यालयातून 4 UPS चोरीला, सफाई कामगारानेच चोरी केल्याचे उघड
Crime
| Updated on: Mar 10, 2021 | 1:01 PM
Share

पुणे : पुण्यातील पाषाण रोड परिसरात असणाऱ्या सीआयडी कार्यालयातून (CID Office) युपीएसची चोरी झाल्याचं समोर आलं आहे. सीआयडीच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या कार्यालयातून 4 युपीएस चोरीला गेलेत. दरम्यान कार्यालयात काम करणाऱ्या सफाई कामगारानेच चोरी केल्याचे निष्पन्न झालंय. (Theft In CID office in Pune)

अनंत विश्वनाथ मोरे (वय 34, रा. विधाते वस्ती, बाणेर) याच्यावर चतु:श्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान खुद्द सीआयडी कार्यालयात अशा पद्धतीने चोरी झाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

फिर्यादी गेल्या 4 वर्षांपासून सीआयडीत पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत. 8 मार्च रोजी सकाळी पोलिस उपअधीक्षक अनुजा देशमाने या कार्यालयात आल्या असता त्यांना चोरी झाली असल्याचं दिसून आलं. त्यांनी सीआयडीच्या नियंत्रण कक्षाला फोन केला. विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्या कार्यालयातील युपीएस चोरीला गेल्याचं त्यांनी सांगितलं.

सफाई कामगारानेच चोरी केल्याचे निष्पन्न

त्यानंतर सीसीटीव्हीशी पडताळणी करण्यात आली. याधम्ये सफाई कामगार म्हणून काम करणारा अनंत मोरे याने युपीएस चोरुन नेल्याचे आढळून आले. त्यापैकी त्याने एक युपीएस पार्किंगमधील बाथरुममध्ये लपविला होता. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

(Theft In CID office in Pune)

हे ही वाचा :

Mansukh Hiren Death Case | एटीएसची टीम मुंब्र्यात, हिरेन मृत्यू प्रकरणाचे नाट्य रुपांतर करणार

सहा महिन्यांपूर्वी लव्ह मॅरेज, क्षुल्लक वादातून पतीकडून नवविवाहितेची हत्या

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.