Pune crime : मोबाइल शॉपीचं शटर तोडून लंपास केला तीन लाखांचा मुद्देमाल; खडकवासलातली चोरी सीसीटीव्हीत कैद

एक चोर मध्यरात्री अडीचच्या सुमारास दुकानाचे शटर उचकटून आत शिरतो तसेच महागडे मोबाइल पोत्यात भरून घेऊन जाताना सीसीटीव्हीत कैद झाला. चरवड यांनी याबाबत हवेली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून प्रभारी अधिकारी तेगबीरसिंह संधू हे अधिक तपास करीत आहेत.

Pune crime : मोबाइल शॉपीचं शटर तोडून लंपास केला तीन लाखांचा मुद्देमाल; खडकवासलातली चोरी सीसीटीव्हीत कैद
पुणे-सातारा महामार्गावर सेंट्रल बँकेचं एटीएम चोरट्यांनी फोडलं
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: May 24, 2022 | 4:10 PM

किरकटवाडी, पुणे : मोबाइलच्या दुकानाचे शटर तोडून तीन लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास (Mobile theft) केला आहे. खडकवासला गावातील मुख्य रस्त्याला लागून असलेले सक्सेस मोबाइल शॉपीमध्ये हा प्रकार घडला आहे. दुकानाचे शटर तोडून मोबाइलचे बॉक्स पळवतानाची ही घटना सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाली आहे. मध्यरात्री अडीचच्या सुमारास घडलेल्या या चोरीच्या घटनेमुळे परिसरात खळबड उडाली असून व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सकाळी स्थानिक नागरिकांनी दुकानाचे शटर अर्धवट उघडे असल्याची माहिती दुकान मालक लोकेश चरवड यांना दिली. त्यांनी तातडीने दुकानात येऊन पाहिले असता चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी सीसीटीव्ही तपासले. त्यात चोर मोबाइल चोरताना स्पष्ट दिसून आला. त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार (Police conplaint) दाखल केली.

सीसीटीव्हीत कैद

एक चोर मध्यरात्री अडीचच्या सुमारास दुकानाचे शटर उचकटून आत शिरतो तसेच महागडे मोबाइल पोत्यात भरून घेऊन जाताना सीसीटीव्हीत कैद झाला. चरवड यांनी याबाबत हवेली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून प्रभारी अधिकारी तेगबीरसिंह संधू हे अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, दुकानात मोबाइल व इतर साहित्य असा पाच ते सात लाखांचा माल नुकताच मालक चरवड यांनी भरला होता. चोराने यातील केवळ महागडे मोबाइल चोरले आहेत.

चोर सराईत

चोरी करण्याच्या त्याच्या स्टाइलवरून हा चोर सराइत असल्याचे दिसून आले आहे. त्याने अत्यंत सफाईदारपणे दुकानाचे शटर तोडले आणि आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्याने शोधून शोधून महागडे मोबाइल पोत्यात भरले आणि तेथून पोबारा केला. आता सीसीटीव्हीवरून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.