AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaishnavi Hagawane Death : सुशील हगवणे हाच पीडित? मयुरी जगतापचा तो दावा वाचला का?

Sushil Hagawane : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आता एकामागून एक धक्कादायक बाबी समोर येत आहे. हगवणे कुटुंबियांनीच मुलीची गळा दाबल्याचा आरोप कसपटे कुटुंबियांनी केला आहे. तर याप्रकरणात मोठी सून मयुरी जगताप हिने पतीविषयी मोठा दावा केला आहे.

Vaishnavi Hagawane Death : सुशील हगवणे हाच पीडित? मयुरी जगतापचा तो दावा वाचला का?
सुशील हगवणे, मयुरी जगतापImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: May 22, 2025 | 3:13 PM
Share

वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणाने समाजमन सुन्न झाले आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिसांना कारवाईचे आदेश दिले आहे. वैष्णवीचे बाळ आता तिच्या वडिलांकडे सुपूर्द करण्यात आले. 16 मे रोजी वैष्णवीने जीवनयात्रा संपवली होती. तेव्हापासून हे बाळ हगवणे कुटुंबियांनी लपवून ठेवल्याचा आरोप करण्यात येत होता. तर हगवणे कुटुंबियांनीच मुलीची गळा दाबल्याचा आरोप कसपटे कुटुंबियांनी केला आहे. तर याप्रकरणात मोठी सून मयुरी जगताप हिने पतीविषयी मोठा दावा केला आहे.

दोन्ही मुलांचा प्रेमविवाह, पण सुखी कोणी नाही

हगवणे यांचा मोठा मुलगा सुशील याने मयुरी जगतापसोबत प्रेमविवाह केला होता. पण मयुरीच्या दाव्यानुसार, सासू, नणंद आणि दीराने तिला अनेकदा मारहाण केली. तिने त्याचे फोटो सुद्धा दाखवले आहे. तर या मारहाणीचा व्हिडिओ असल्याचा दावा करण्यात येत आहे. तिने सासरा राजेंद्र हगवणे याच्यावर गंभीर आरोप केला आहे. राजेंद्र याने कपडे फाडले आणि विनयभंग केल्याचा आरोप तिने केला आहे.

तर मयत वैष्णवी आणि आरोपी शशांक या दोघांचा सुद्धा प्रेमविवाह झाला आहे. या विवाहा सोहळ्याला अजितदादांनी हजेरी लावली होती. त्यांच्या हस्ते नवरदेवाला फॉर्च्युनर कारची चाबी देण्यात आली होती. त्यावेळी दादांनी यासाठी जबरदस्ती केली का, अशी विचारणा सुद्धा केली होती. लग्नानंतर काही दिवसातच वैष्णवीचा छळ सुरू झाला. हुंड्यासाठी, मोबाईलसाठी सातत्याने त्रास देण्यात येत होता. चांदीच्या मूर्तीसाठी तिला मारहाण करण्यात आली. तिच्या कुटुंबियांनी तिला खूप त्रास दिल्याचा आरोप केला आहे.

सुशील हगवणे हाच पीडित

याप्रकरणात सासरा राजेंद्र आणि सुशील हगवणे हा फरार आहे. त्यांना लवकरच अटक करण्यात येईल, असे सरकारकडून मंत्री सांगत आहेत. तर सुशील हगवणे याची पत्नी आणि या घरातील मोठी सून मयुरी जगताप हिने मोठा दावा केला आहे. सासू, दीर, नणंद हे आपल्या पतीला, सुशील याला घालून पाडून बोलत असत. त्याला मारहाण करत असत, असा आरोप केला आहे. सुशील हगवणे हाच पीडित असल्याचा दावा तिने केला आहे. तिचे आणि सुशीलचा प्रेम विवाह झाला आहे. पण गेल्या दीड वर्षांपासून ती हगवणेंच्या घरातच वेगळी राहत असल्याची ती म्हणाली. तर सासू, नणंद आणि दिराने मारहाण केल्यानंतर ती तिच्या माहेरी आली. तिने याप्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. तिने तिला मारहाण झाल्याचे फोटो दाखवले. तर याविषयीचा व्हिडिओ असल्याचे समोर आले आहे.

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.