AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वैष्णवी हगवणेचं स्त्रीधन जप्त; वस्तू पाहून बसेल धक्का

वैष्णवीचे दोन भाऊ विराज व पृथ्वीराज आणि तिची एक मैत्रीण अशा तीन साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. तसेच वैष्णवीला देण्यात आलेलं स्त्रीधन देखील जप्त करण्यात आलं आहे.

वैष्णवी हगवणेचं स्त्रीधन जप्त; वस्तू पाहून बसेल धक्का
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 24, 2025 | 8:24 PM
Share

पुण्यात 16 मे रोजी एक धक्कादायक घटना घडली होती, वैष्णवी हगवणे नावाच्या तरुणीनं गळफास घेऊन आत्महत्या केली, सासरच्या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केली असा आरोप आहे. या प्रकरणात पोलिसांनी तिचा पती, दीर, सासू, सासरा आणि नणंद यांना अटक केली आहे. या प्रकरणात दररोज नवनवी खुलासे होत आहेत.

या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे, ती म्हणजे या प्रकरणात वैष्णवीचे दोन भाऊ विराज व पृथ्वीराज आणि तिची एक मैत्रीण अशा तीन साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. तसेच वैष्णवीला देण्यात आलेलं स्त्रीधन देखील जप्त करण्यात आलं आहे. यामध्ये चांदीची भांडी ज्यामध्ये  (पाच ताटं ,पाच तांबे ,चार वाट्या, एक करंडा, एक अधिक महिन्यात दिलेलं चांदीचं ताट )  जप्त करण्यात आलेलं आहे.

दरम्यान या प्रकरणात आता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील उडी घेतली आहे. त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. दमानिया यांनी आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकरांवर गंभीर आरोप केले आहे. जालिंदर सुपेकर आणि हगवणे कुटुंब यांचे जवळचे संबंध  आहेत, हगवणे कुटुंबीयांनी आपल्या सूनांना सुपेकर यांचा धाक दाखवला, या विरोधात मयुरीच्या आईने महिला आयोगाला पत्र देखील लिहिलं होतं. निलेश चव्हाण याला बंदुकीचं लायसन्स देखील जालिंदर सुपेकर यांनीच दिलं. जालिंदर सुपेकर यांनी कारागृहात जी खरेदी केली त्याच्यामध्येही 500 कोटी रुपयांचा घोटाळा आहे. नाशिक कोल्हापूर असे सर्व कारागृह त्यांच्याकडे आहेत, असा गंभीर आरोप या प्रकरणात अंजली दमानिया यांनी केला आहे. तसेच या प्रकरणात जालिंदर सुपेकर यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

दरम्यान या प्रकरणात आरोपी असलेला वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे याच्याबाबत देखील धक्कादायक माहिती समोर आली आहे. वैष्णवीने आत्महत्या केल्याच्या दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह पाहाण्यासाठी राजेंद्र हगवणे आपल्या 20 ते 25 कार्यकर्त्यांसह रुग्णालयात गेले होता, मात्र तिथेच त्याला गुन्हा दाखल होणार असल्याची कुणकुण लागली आणि तो फरार झाला, अशी माहिती समोर येत आहे.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी