Pune Municipal Election | भाजपसोबत की स्वबळावर, विनायक मेटेंचा शिव’संग्राम’ कोणाशी?; उद्या फायनल निर्णय
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या मैदानात आमदार विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षाने उडी घेतली आहे. हा पक्ष पालिका निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार आहे. तशी माहिती मेटे यांनी दिली

पुणे : राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्यामुळे मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहे. यामध्ये पुणे पालिकेवर आपल्याच पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसलीय. आता या पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या मैदानात आमदार विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षाने उडी घेतली आहे. हा पक्ष पालिका निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार आहे. तशी माहिती मेटे यांनी दिलीय.
उद्या पुण्यात शिवसंग्रामचा पदाधिकारी मेळावा
कोरोना नियम शिथिल होताच राज्यात वेगवेगळ्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. सहकारी संस्था, जिल्हा बँका, पोटनिवडणुका अशा अनेक प्रकारच्या निवडणुका राज्यात होत आहेत. तर आगामी काळात राज्यातील प्रमुख शहरांच्या पालिका निवडणुकादेखील येऊ घातल्या आहेत. यामध्ये सर्वात जास्त चर्चा ही पुणे महानगरपालिकेची रंगलीय. पुढच्या वर्षी म्हणजेच 2022 च्या फेब्रुवारी महिन्यात ही निवडणूक होण्याची शक्यता आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी प्रत्येक पक्ष आपापल्या परीने योजना आखत आहे. याच पार्श्वभूमीवर विनायक मेटेंचा शिवसंग्राम ही निवडणूक ताकदीने लढवणार आहे. उद्या पुण्यात शिवसंग्रामचा पदाधिकारी मेळावा होणार आहे. या मेळाव्यात विनायक मेटे आपली भूमिका आणि निर्णय जाहीर करणार आहेत.
मेळाव्यात शिवसंग्रामची भूमिका ठरणार
तसेच ही निवडणूक स्वतंत्र्यरित्या लढवावी की भाजपशी हातमिळवणी करावी यावरुसुद्धा उद्या म्हणजेच रविवारी 31 ऑक्टोबर रोजी निर्णय घेतला जाणार आहे. मेटे यांनी पालिका निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता पुण्यात राजकीय गणितं बदलण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी शिवसंग्रामच्या उद्या होणाऱ्या मेळाव्यात आता काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
राष्ट्रवादी, शिवसेनेनेही कंबर कसली
दरम्यान, ही निवडणूक जिंकण्यासाठी राष्ट्रवादीनेदेखील कंबर कसलीय. खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या निवडणुकीत लक्ष घातलंय. त्यांचे पुणे आणि पंपरी चिंचवड येथील दौरे वाढले आहेत. ते पदाधिकाऱ्यांच्या भेटी आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांत उत्स्फूर्तपणे सहभाग घेताना दिसत आहेत. तर दुसरीकडे पुण्याची महापालिका निवडणूक आम्हीच जिंकणार असा दावा शिवसेनेचे नेते करताना दिसतात. महापौर आमचाच होणार असे वक्तव्य यापूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेले आहे.
पुणे महापालिकेतील सध्याचे पक्षीय बलाबल
- भाजप 99
- काँग्रेस 09
- राष्ट्रवादी 44
- मनसे 2
- सेना 9
- एमआयएम 1
- एकूण 164
इतर बातम्या :
चोरी करायला दुकानात शिरला, दुकान जाळून खाक केलं, पोलिसांनी पकडलं तेव्हा तर….
Apple पुढच्या वर्षी 5G सपोर्टसह iPhone SE Plus लॉन्च करणार, जाणून घ्या iPhone SE 3 लाँचिंग अपडेट#Apple #iPhone #iPhoneSE3 #iPhoneSEPlushttps://t.co/KPU1elY9Yh
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 30, 2021
(vinayak mete party shivsangram will contest pune municipal corporation election)
