AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

परत पाठव देवा माझ्या विठ्ठलाला… वारकरी महिलेच्या हातात अजितदादांचा फलक अन्…

अजित पवार यांच्या निधनानंतरही महाराष्ट्रात शोक कायम आहे. सध्या सुरू असलेल्या वारीमध्ये एक वारकरी महिला अजितदादांचा फलक घेऊन फिरताना दिसली, त्यावर 'परत पाठव देवा माझ्या विठ्ठलाला' असे हृदयस्पर्शी वाक्य लिहिले होते. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे, जो दादांच्या आठवणींना उजाळा देत आहे.

परत पाठव देवा माझ्या विठ्ठलाला... वारकरी महिलेच्या हातात अजितदादांचा फलक अन्...
Warkari WomansImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 15, 2026 | 6:22 PM
Share

राज्याचे माजी मुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्र अजूनही सावरलेला नाही. येनकेन प्रकारे अजितदादांच्या आठवणी आजही जागवल्या जातात. सध्या वारी सुरू आहे. या वारीतही अजितदादांच्या आठवणी जागवल्या जात आहे. एक महिला वारीत हातात फलक घेऊन जाताना दिसली. या फलकावर अजितदादांचा फोटो आहे. माझ्या विठ्ठलाला परत द्या… असं त्यावर लिहिलंय. आ महिलेच्या एका हातात फलक आहे अन् चेहरा भावूक आहे. हा फोटो पाहून अनेकांच्या काळजात कालवाकालव झाल्याशिवाय राहत नाही. हा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

लोणंदमध्ये महिला वारकऱ्यांने हातातील फलकाने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. या फलकावर अजितदादांचा टाळ वाजवताना फोटो आहे. अजितदादा वारकऱ्यांच्या वेषात आहे. एवढाच निरोप सांगा पांडुरंगाला, परत पाठव देवा माझ्या विठ्ठलाला… असं या फोटोवर लिहिलं आहे. हा फ्लेक्स हातात घेऊन महिला वारकरी वारीत सहभागी झाल्या आहेत. अजित पवार यांच्या या बॅनरने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

विठ्ठला दादांना परत पाठवा

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने वारकऱ्यांसाठी सेवाभाव देहू ते पंढरपूरपर्यंत करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूरपर्यंत वारकऱ्यांसाठी सेवाभाव करण्यात येत असल्याची माहिती कार्यकर्त्यांनी दिलीय. लाख मेले तरी लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे होता. दादा आज तुकोबांचा पालखी सोहळा आहे आणि तुम्ही आमच्यात नाहीत. विठ्ठला दादांना परत पाठवा, अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून वारकऱ्यांसाठी आरोग्य सेवेमध्ये वारकऱ्यांच्या पायाची मालिश, सर्व आरोग्याच्या संबंधित सेवा पालखीमध्ये देण्यात येत आहे.

पालखी सोहळा बारामतीत

दरम्यान, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा बारामतीमध्ये दाखल झाला आहे. बारामतीमधील शारदा प्रांगण येथे आज श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा मुक्कामी असणार आहे बारामतीत पालखी सोहळा दाखल होताना पालखी सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केलीय.

Follow Us
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक