पुणेकरांवर जलसंकट? खडकवासला धरणात केवळ 38 टक्के पाणीसाठा

पुणे (Pune) आणि परिसराकडे गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली आहे. मागच्या काही दिवसांत पुण्यात जोरदार पाऊस (Pune Rain) बरसलेला नाही. पुण्याच्या जवळपासच्या धरणक्षेत्रांमध्येही अशात समाधानकारक पाऊस झालेला नाही.

पुणेकरांवर जलसंकट? खडकवासला धरणात केवळ 38 टक्के पाणीसाठा
खडकवासला धरण

पुणे : पुणे (Pune) आणि परिसराकडे गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली आहे. मागच्या काही दिवसांत पुण्यात जोरदार पाऊस (Pune Rain) बरसलेला नाही. पुण्याच्या जवळपासच्या धरणक्षेत्रांमध्येही अशात समाधानकारक पाऊस झालेला नाही. पुणे शहर आणि परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार प्रमुख धरणांपैकी पानशेत (Panshet Dam) आणि वरसगाव (Varasgaon Dam) ही धरणं शंभर टक्के भरलेली असली तरी पावसाने ओढ दिल्याने खडकवासला (Khadakwasla Dam) धरणातला पाणीसाठा 38 टक्क्यांवर आला आहे. (water storage in Khadakwasla Dam in Pune has been reduced due to lack of rain in the last few days)

धरणांमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा असल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या या चार धरणांमध्ये 27.54 अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी ऑगस्ट अखेरीस या धरणांमध्ये 28.75 टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता, अशी माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे.

पावसाने विश्रांती घेतल्याने खडकवासला धरणातला पाणीसाठा कमी

मागच्या काही दिवसांत पावसाने विश्रांती घेतल्याने खडकवासला धरणातला पाणीसाठा कमी झाला आहे. या धरणामध्ये 0.74 टीएमसी पाणीसाठा आहे. टेमघर धरणात 3.34 टीएमसी म्हणजे 90 टक्क्यांपर्यंत पाणीसाठा आहे. पानशेत धरणात 10.65 टीएमसी तर वरसगाव धरणात 12.82 टीएमसी पाणीसाठा झाल्याने ही धरणं शंभर टक्के भरली आहेत. पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण परिसरातही पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. या धरणात 8.34 टीएमसी पाणी आहे. उजनी धरण 33 टीएमसी पाणीसाठ्यासह 62 टक्के भरलं आहे.

पुण्यात आज पावसाची शक्यता

पुण्यात मागचे अनेक दिवस दडी मारून बसलेला पाऊस पुन्हा परतण्याची चिन्हं आहेत. हवामान विभागाने आजपासून पुढचे तीन ते चार दिवस राज्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यात पुणे आणि परिसरातही अनेक भागात पावसाची शक्यता आहे. आज सकाळपासून पुण्यात ढगाळ वातावरण आहे. दुपारनंतर अनेक भागात पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

विविध जिल्ह्यांना ऑरेंज अ‌लर्ट

हवामान विभागानं सोमवारी परभणी जिल्ह्याला ऑरेंज अ‌लर्ट दिला आहे. तर,रत्नागिरी, जळगाव, बुलडाणा, जालना, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, लातूर, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांना यलो अ‌लर्ट देण्यात आला आहे.

31 ऑगस्टला रायगड, ठाणे आणि नाशिकला अ‌लर्ट

मंगळवारी रायगड, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी, मुंबई, पालघर, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यांना यलो अ‌लर्ट देण्यात आलाय. तर, 1 सप्टेंबरला राज्यात पालघरला ऑरेंज अ‌लर्ट देण्यात आला असून मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक आणि नंदूरबार जिल्ह्यांना यलो अ‌लर्ट देण्यात आला आहे.

बळीराजाला दमदार पावसाची प्रतीक्षा

जुलैच्या दुसऱ्या पंधरावड्यात महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. गेल्या दहा पंधरा दिवसांपासून राज्यात पावसानं उघडीप दिली आहे. पाऊस उघडल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीची कामं आवरली आहेत. पिकांना पावसाची आवश्यकता असून शेतकरी दमदार पावसाची प्रतीक्षा करत आहे. राज्यातील अनेक धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे सध्या जर पाऊस झाला नाहीतर मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

इतर बातम्या :

Pune Weather | पुण्यात आज पावसाचं पुनरागमन होणार, रात्री जोरदार पावसाचा अंदाज

हडपसर, चाकणमध्ये लवकरच महापालिका? पायाभूत सुविधा उभारण्यासाठी पीएमआरडीएला सूचना

तर कुलूप तोडून लोक मंदिरं सुरू करतील; चंदक्रांत पाटील यांचा आघाडी सरकारला इशारा

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI