हडपसर, चाकणमध्ये लवकरच महापालिका? पायाभूत सुविधा उभारण्यासाठी पीएमआरडीएला सूचना

भविष्यात या जिल्ह्याची गरज लक्षात घेता पुणे आणि पिंपरी चिंचवडसोबत आणखी दोन महापालिका होणार असल्याचे सूतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलं आहे. नव्या महापालिकांसाठी (New Municipal Corporation) हडपसर (Hadapsar) आणि चाकण (Chakan) परिसरात पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या सूचना अजित पवार यांनी पीएमआरडीएला दिल्या आहेत.

हडपसर, चाकणमध्ये लवकरच महापालिका? पायाभूत सुविधा उभारण्यासाठी पीएमआरडीएला सूचना
हडपसर, चाकणमध्ये पायाभूत सुविधा उभारण्यासाठी पीएमआरडीएला सूचना

पुणे : पुणे (Pune) आणि पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) शहराचा विस्तार वेगाने होत आहे. भविष्यात या जिल्ह्याची गरज लक्षात घेता पुणे आणि पिंपरी चिंचवडसोबत आणखी दोन महापालिका होणार असल्याचे सूतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलं आहे. नव्या महापालिकांसाठी (New Municipal Corporation) हडपसर (Hadapsar) आणि चाकण (Chakan) परिसरात पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या सूचना अजित पवार यांनी पीएमआरडीएला दिल्या आहेत. त्यामुळे पुढच्या काळात हडपसर आणि चाकणमध्ये महापालिका तयार करण्याच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत. (Infrastructure facilities are being set up in Hadapsar and Chakan in Pune for setting up new Municipal Corporations)

पुण्यात आणखी दोन महापालिका स्थापन होण्याचे संकेत

विभागीय आयुक्त कार्यालयात काल उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान अजित पवारांनी पीएमआरडीए अधिकाऱ्यांना काही स्पष्ट सूचना केल्या आहेत. पुणे आणि परिसराची गरज लक्षात घेऊन आणखी दोन महापालिकांची उभारणी करावी लागेल. त्यासाठी पीएमआरडीएने हडपसर आणि चाकण भागात पायाभूत सुविधांची आतापासूनच उभारणी करावी आणि त्यासाठी विकास आराखड्यात नियोजन करावं, अशा सूचना अजित पवारांनी दिल्या आहेत. त्यामुळे भविष्यात पुण्यात आणखी दोन महापालिका स्थापन होण्याचे संकेत मिळत आहेत

विकास आराखड्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

विधान भवन इथे या बैठकीत पीएमआरडीएच्या विकास आराखड्याचे सादरीकरण खासदार, आमदारांना दाखवण्यात आलं. येत्या काळात याविषयी एक बैठक मुख्यमंत्र्यांसोबत केली जाणार आहे. त्यामध्ये विकास आराखड्यातल्या विविध मागण्यांबाबत चर्चा होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. गावांगावांतील रस्ते रेकॉर्डवर नसतील तर नंतर नागरिक रस्त्यांसाठी जागा देण्यास टाळाटाळ करतात. कारण, त्या परिसरातील जागेचे भाव नंतर प्रंचड वाढलेले असतात. परिणामी नागरिक जागा देताना विचार करतात, विरोध करतात, हा आमचा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे त्याची दखल पीएमआरडीएने घ्यावी असंही अजित पवारांनी म्हटलं आहे.

आराखडा हस्तांतरण झाल्यानंतर बदल शक्य

पीएमआरडीएने पुणे महापालिकेत नव्यानं समाविष्ठ झालेल्या 23 गावांबाबतचा विकास आराखडा सादर केला आहे. मात्र, पुणे महापालिकेकडे आराखडा हस्तांतरण झाल्यानंतर महापालिका त्यात बदल करू शकतात. पुणे आणि पिंपरी चिंचवड या महापालिका भाजपच्या ताब्यात असल्या तरी विकासाच्या बाबतीत कसलंही राजकारण केलं जात नाही, याबाबत मुख्यमंत्री सकारात्म असल्याचं अजित पवारांना सांगितलं.

विकास आराखड्यासंदर्भात साडेनऊ हजार तक्रारी

पीएमआरडीएचा विकास आराखडा तयार करताना जिल्ह्यातल्या अडीचशे गावांमध्ये आरक्षण टाकण्यात आली आहेत. या आरक्षणाबाबत अनेक आक्षेप समोर आले आहेत. जिल्हा परिषदेने पीएमआरडीएने टाकलेलं आरक्षण रद्द करण्याचा प्रस्तावही पारीत केला आहे. अनेक जिल्हा परिषद सदस्यांसह अनेक ग्रामपंचायतींनीही विकास आराखड्या संदर्भात तक्रारी नोंदवल्या आहेत. पीएमआरडीएकडे आतापर्यंत साडेनऊ हजारांहून जास्त तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

इतर बातम्या :

पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांचा मोठा निर्णय, ‘श्रीं’च्या दर्शनासाठी करणार ‘ही’ खास सोय

मोठी बातमी, अजित पवारांची झोपडपट्टीमुक्त पुण्याची घोषणा, 17 झोपडपट्यांबाबत पुढच्या आठवड्यात बैठक

तीन दिवसांच्या खंडानंतर पुण्यात आज लसीकरण, पाहा कोणत्या केंद्रावर किती मिळणार लस

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI