पिंपरी चिंचवडमध्ये पाणीबाणी; नागरिकांसाठी पालिकेचा मोठा अलर्ट

एकीकडे कोरोनाचं संकट तर आता दुसरीकडे पिंपरी चिंचवडकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये पाणीबाणी; नागरिकांसाठी पालिकेचा मोठा अलर्ट
Follow us
| Updated on: Oct 06, 2020 | 9:37 AM

पिंपरी चिंचवड : राज्यात आधीच कोरोनाच्या महामारीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अशात पुण्यात कोरोनाचा सगळ्यात जास्त धोका आहे. एकीकडे कोरोनाचं संकट तर आता दुसरीकडे पिंपरी चिंचवडकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आज आणि उद्या पाणी पुरवठा बंद राहणारा असल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे. (water supply will be cut off today and tomorrow in pimpri Chinchwad)

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा दिला जाणाऱ्या रावेत इथल्या जलउपसा केंद्रातील उच्चदाब वीज संच मांडणीचं अचानक काम उद्भवलं आहे. उपस्कर वाहिनीचे तातडीने दुरुस्तीचं काम करण्यात येणार असल्याने संपूर्ण शहरात पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती आहे.

पालिकेने सांगितल्यानुसार, आज सकाळी 11 ते 12.30 या कालावधी जलउपसा बंद राहणार आहे. त्यामुळे 12 नंतरचा, सायंकाळचा आणि रात्रीचा तसंच दूसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी सकाळचा संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा कमी दाबाने किंवा विस्कळीत राहणार आहे. त्यामुळे चिंचवडकरांनी याची दक्षता घेत पाण्याचा अपव्यय टाळावा आणि पुरेसा पाणीसाठा घरात भरून ठेवावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

नागरिकांनी उपलब्ध पाणी जपून वापरून महानगरपालिकेस सहकार्य करण्याचं आवाहन महापालिका पाणी पुरवठा विभागाकडून करण्यात आलं आहे. (water supply will be cut off today and tomorrow in pimpri Chinchwad)

खरंतर, यंदा झालेल्या चांगल्या पावसामुळे पुणेकरांची तहान भागवणारी सर्व धरणं चांगली भरली आहेत. त्यामुळे वर्षभरासाठी पुणेकरांची तहान भागली असं म्हणायला हरकत नाही. गेल्या महिन्यात झालेल्या पावसाने चारही धरणांतील पाणीसाठा वाढला आहे. चारही धरणांमध्ये ऑगस्ट महिन्यापर्यंत 18.13 टीएमसी म्हणजेच 62.21% टक्के पाणीसाठा होता, आता त्यामध्ये आणखी वाढ झाली आहे. त्यामुळे पुणेकरांची वर्षभर तहान भागणार आहे. पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली असली तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कमी जलसाठा आहे.

गेल्या वर्षीच्या 29.15 टीएमसी म्हणजेच 100 टक्क्याच्या तुलनेत जलसाठा कमी आहे. त्यामुळे यंदा धरण पूर्ण भरल्यास जिल्ह्यातील शेतीच्या पाण्याची चिंता मिटणार आहे. जुलै महिन्यात पाणी साठा कमी झाल्यानं पाणी कपातीची टांगती तलवार होती.

इतर बातम्या – 

ट्रम्प खरंच कोरोना पॉझिटिव्ह होते की होता पॉलिटिकल स्टंट? अमेरिकेत चर्चेला उधाण
Alert! ताशी 24046 किमी वेगाने पृथ्वीच्या दिशेने येतोय लघुग्रह, विमानाइतका आहे आकार

(water supply will be cut off today and tomorrow in pimpri Chinchwad)

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.