AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आम्हाला पंचतारांकित सोयीसुविधा मिळतात पण शांती नाही मिळत –  भगतसिंग कोश्यारी

नेत्यांप्रमाणे या अधिकाऱ्यांनी जनतेची काळजी केली असती तर हा समाज आज स्वर्गाप्रमाणे निर्माण झाला असता. असं ही राज्यपालांनी यावेळी नमूद केलं. आत्ता जर क्रांतिवीर चाफेकर असते तर या अधिकाऱ्यांची खैर नव्हती.

आम्हाला पंचतारांकित सोयीसुविधा मिळतात पण शांती नाही मिळत -  भगतसिंग कोश्यारी
भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल, महाराष्ट्र.
| Edited By: | Updated on: Dec 29, 2021 | 5:20 PM
Share

पुणे – माझं आणि विनय सहस्त्रबुद्धे यांचं एक सौभाग्य आहे. आम्हाला पंचतारांकित सोयीसुविधा मिळत असतात.  पण शांती नाही मिळत ती शांती फक्त निसर्गाच्या सानिध्यात आणि बांबूच्या झोपडीत मिळते,  असं नमूद करत राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांनी राज्यपालांच्या खुर्चीने शांती भंग झाल्याची अप्रत्यक्षपणे कबुली दिली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये ‘प्राचीन भारतीय संस्कृती’ व्याख्यानमाला तसेच ‘भारतीय वारसा: परिचय आणि संवर्धन’ या कार्यशाळेचं उद्घाटन पार पडलं. त्यावेळी ते बोलत होते.

आत्ता जर क्रांतिवीर चाफेकर असते तर.. सरकारी अधिकाऱ्यांना लोकांची चिंता नसून फक्त नेत्यांची चिंता लागून राहिलेली असते. आशा कानपिचक्या राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांनी सरकारी अधिकाऱ्यांना दिल्या. नेत्यांप्रमाणे या अधिकाऱ्यांनी जनतेची काळजी केली असती तर हा समाज आज स्वर्गाप्रमाणे निर्माण झाला असता. असं ही राज्यपालांनी यावेळी नमूद केलं. आत्ता जर क्रांतिवीर चाफेकर असते तर या अधिकाऱ्यांची खैर नव्हती. हे सांगतांना इंग्रजांचा कलेक्टर रँडच्या हत्येचा दाखला राज्यपालांनी दिला.

देशाच्या उन्नतीसाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे आवश्यक

देशासाठी ज्यांनी बलिदान देत जीवन समर्पित केले त्यांचे नाव मृत्यूनंतरही अजरामर आहे. अशा महान व्यक्तिमत्वांचा आदर्श समोर ठेवीत देशाच्या उन्नतीसाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. प्रत्येकाने उत्तमतेवर भर दिल्यास देशाची अधिक प्रगती होऊ शकेल. पुनरुत्थान समरसता गुरुकुलमच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी केले जाणारे प्रयत्न स्तुत्य आहेत. गुरुकुलमच्या माध्यमातून पारंपरिक कलेचा विकास होत आहे. यामुळे उपेक्षित, मागासलेल्या समाजातील नागरिकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासोबत त्यांच्या कलेला वाव देत आर्थिक विकास होण्यासही मदत होत आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे, महापौर उषा ढोरे, पिंपरी-चिंचवड पालिका आयुक्त राजेश पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे, डेक्कन महाविद्यालयाचे माजी कुलगुरु डॉ. वसंत शिंदे आदी उपस्थित होते.

IND vs SA : शमी ठरला द. आफ्रिकेचा कर्दनकाळ, या 5 गुणांच्या जोरावर यजमानांचा उडवला धुव्वा

Narayan Rane vs Shiv Sena : शाहू, फुले, आंबेडकरांचे नाव घ्यायचे आणि तालिबान्यांसारखे वागायचे- आशिष शेलार

Sourav Ganguly: हॉस्पिटलने दिली बीसीसीआय अध्यक्षांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.