AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA : शमी ठरला द. आफ्रिकेचा कर्दनकाळ, या 5 गुणांच्या जोरावर यजमानांचा उडवला धुव्वा

मोहम्मद शमीने या डावात अप्रतिम गोलंदाजी केली. त्याने 5 विकेट घेतल्या. तसेच त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 200 बळींचा टप्पा पार केला आहे. आर अश्विनचा विक्रम मोडीत काढत शमी भारतासाठी सर्वात कमी चेंडूत 200 बळी घेणारा गोलंदाज ठरला.

IND vs SA : शमी ठरला द. आफ्रिकेचा कर्दनकाळ, या 5 गुणांच्या जोरावर यजमानांचा उडवला धुव्वा
मोहम्मद शमी
| Edited By: | Updated on: Dec 29, 2021 | 5:07 PM
Share

सेन्च्युरियन : येथील सुपर स्पोर्ट पार्क स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये (INDvsSA) सुरु असलेला पहिला कसोटी सामना रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. या कसोटीत टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करत 327 धावा केल्या होत्या. त्यानंतर भारताच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली आणि दक्षिण आफ्रिकेला केवळ 197 धावांत गुंडाळले. टीम इंडियाकडून मोहम्मद शमीने पाच बळी घेतले, तर बुमराह-शार्दुलने प्रत्येकी दोन आणि मोहम्मद सिराजने एक विकेट घेतली. काल तिसऱ्या दिवसअखेर भारताला 146 धावांची आघाडी मिळाली आहे. (strengths of Mohammed Shami that make him extremely dangerous bowler)

गोलंदाजीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीचा दोन्ही संघाच्या गोलंदाजांनी चांगला फायदा उचलला. पाच गोलंदाजांसह खेळणाऱ्या भारताने त्याच तोडीची गोलंदाजी केली. शामी, बुमराह, ठाकूर, सिराज या चौघांनी भेदक मारा करुन आफ्रिकेचा पहिला डाव 197 धावात गुंडाळला. शामीने आफ्रिकेचा निम्मा संघ तंबूत पाठवला. शार्दुल आणि बुमराहने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. आफ्रिकेकडून फक्त टेंबा बावुमाने (52) अर्धशतक झळकावले. क्विंटन डि कॉक (34) सोबत बावुमाने केलेली भागीदारी आणि राबाडाने (25) थोडा फार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आफ्रिकेला 197 पर्यंत पोहोचता आले.

मोहम्मद शमीने या डावात अप्रतिम गोलंदाजी केली. त्याने 5 विकेट घेतल्या. तसेच त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 200 बळींचा टप्पा पार केला आहे. आर अश्विनचा विक्रम मोडीत काढत शमी भारतासाठी सर्वात कमी चेंडूत 200 बळी घेणारा गोलंदाज ठरला. मोहम्मद शमी भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये 200 विकेट घेणारा पाचवा जलदगती गोलंदाज ठरला आहे.

सर्वात जलद 200 बळी

मोहम्मद शमीच्या आधी कपिल देव, इशांत शर्मा, झहीर खान आणि जवागल श्रीनाथ यांनी हा पराक्रम केला आहे. मोहम्मद शमी हा भारतासाठी सर्वात कमी चेंडूत 200 बळी घेणारा गोलंदाज आहे. शमीने 9896 चेंडूत 200 कसोटी बळी घेतले आहेत. त्याने 10,248 चेंडूत विकेट्सचे द्विशतक झळकावणाऱ्या अश्विनचा विक्रम मोडित काढला. याबाबतीत भारताचे इतर सर्व गोलंदाज शमी आणि अश्विनच्या मागे आहेत.

दक्षिण आफ्रिकेचा दुसऱ्यांदा ‘पंच’नामा

मोहम्मद शमीने दक्षिण आफ्रिकेत दुसऱ्यांदा एका डावात पाच विकेट घेतल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेत जवागल श्रीनाथने 3 वेळा एका डावात 5 बळी घेतले आहेत. शमीने दक्षिण आफ्रिकेत आतापर्यंत 7 डावात 20 विकेट घेतल्या आहेत.

आता प्रश्न असा आहे की मोहम्मद शमीमध्ये असे कोणते गुण आहेत की तो प्रत्येक खेळपट्टीवर चांगली गोलंदाजी करतो. शमीमध्ये असे कोणते कौशल्य आहे, ज्याच्या जोरावर तो लाल चेंडूने 22 यार्डच्या खेळपट्टीवर जादूई कामगिरी करतो? आम्ही तुम्हाला शमीचे पाच गुण सांगणार आहोत ज्यामुळे तो सध्याच्या काळातील सर्वात धोकादायक कसोटी गोलंदाज आहे.

1. Bowling Action

मोहम्मद शमीच्या उत्कृष्ट लाईन-लेन्थचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे त्याची अॅक्शन. कोणताही गोलंदाज अचूक लाईन किंवा लेन्थवर चेंडू टाकू शकत नाही, जोपर्यंत त्याची अॅक्शन बरोबर नाही आणि मोहम्मद शमी यात आघाडीवर आहे, शमीची अॅक्शन हाय आर्म आहे आणि त्याचा हात कानाजवळून येतो. यासोबतच त्याच्या मनगटाची स्थितीही अगदी सरळ आहे, त्यामुळे चेंडू जागेवरच पडतो.

2. उत्तम सीम पोझिशन

चांगल्या अॅक्शनमुळे मोहम्मद शमीच्या चेंडूची सीम पोझिशन एकदम सरळ आहे. लाल बॉलमध्ये गोलंदाजाची सीम पोझिशन अगदी अचूक असेल तर त्याची विकेट घेण्याची शक्यता जास्त असते. चांगल्या सीममुळे चेंडू हवेत जास्त मूव्ह करतो आणि जर स्विंग नसेल तर खेळपट्टीवर असलेल्या सीममुळे चेंडू मूव्ह होतो. यामुळेच शमी चेंडूला हवेपेक्षा खेळपट्टीवरून जास्त मूव्ह करतो आणि त्यामुळेच फलंदाज अस्वस्थ झालेले दिसतात.

3. अतिरिक्त बाऊन्स आणि रिव्हर्स स्विंग आहे

मोहम्मद शमीच्या सीम पोझिशनमुळे त्याला अतिरिक्त बाऊन्स मिळतो. तसेच, त्याचे खांदे खूप मजबूत आहेत, ज्यामुळे तो अधिक ताकदीने खेळपट्टीवर चेंडू वेगाने हिट करतो. याच कारणामुळे त्याच्या हातात जुना चेंडू दिला तरी त्याला बाऊन्स मिळतो. शमीला नव्या चेंडूने विकेट मिळाली नाही तरी तो जुन्या चेंडूवर रिव्हर्स स्विंग करण्यात माहीर आहे. शमी नवीन आणि जुना अशा दोन्ही चेंडूंने खूप धोकादायक गोलंदाजी करतो.

4. फिटनेस आणि डाएटमुळे कामगिरी सुधारली

चांगला आहार आणि फिटनेस रूटीनने मोहम्मद शमीच्या कामगिरीला चार चाँद लावले आहेत. एका मुलाखतीत शमीने सांगितले होते की, पूर्वी तो खूप बिर्याणी खात होता. तसेच प्रशिक्षणावरही त्याचे फारसे लक्ष नव्हते. पण त्यानंतर त्याने आपल्या आहाराकडे लक्ष दिले आणि गोलंदाजी करताना त्याची ताकद आणखी वाढली.

5. नेट्समध्ये कठोर परिश्रम

मोहम्मद शमीच्या यशाचे रहस्य त्याची नेटवरची मेहनत आहे. शमीच्या गोलंदाजीचे सराव सत्र खूप मोठे आहे आणि तो प्लॅनिंग करुन गोलंदाजी करतो. शमी टीम इंडियासोबत नसतानाही तो आपल्या गावात नेट्समध्ये सराव करतो.

इतर बातम्या

IND VS SA: ऋषभ पंतची कमाल, धोनीचा विक्रम मोडला

IND vs SA: दक्षिण आफ्रिकेने एक चूक सुधारली आणि टीम इंडियाचे फलंदाज झाले फेल

IND vs SA: रोहितच्या अनुपस्थितीत, विराट असूनही ‘या’ खेळाडूकडे दिली जाऊ शकते वनडेची कॅप्टनशिप

(strengths of Mohammed Shami that make him extremely dangerous bowler)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.