Weather report: राज्यात आठवडाभर ढगाळ वातावरण; उकाडा आणखी वाढणार

या कालावधीत दिवसाच्या कमाल तापमानात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. | Weather report

Weather report: राज्यात आठवडाभर ढगाळ वातावरण; उकाडा आणखी वाढणार
प्रतिकात्मक छायाचित्र
Follow us
| Updated on: May 06, 2021 | 8:46 AM

मुंबई: कमी दाबाचे पट्टे आणि हवेच्या चक्रीय स्थितीमुळे राज्याच्या सर्वच विभागांत आठवडाभर पावसाळी वातावरण कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने (Weather prediction) वर्तविला आहे. तर काही भागांत दुपारपर्यंत निरभ्र आकाश आणि त्यानंतर अंशत: किंवा सामान्यत: ढगाळ स्थिती राहील, असा अंदाज आहे. (Weather prediction for Maharashtra region)

तर दुसरीकडे या कालावधीत दिवसाच्या कमाल तापमानात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. दक्षिणेपासून मध्य प्रदेशाच्या दरम्यान कमी दाबाचे पट्टे निर्माण होऊन त्याचप्रमाणे हवेच्या चक्रीय स्थितीचा परिणाम म्हणून गेल्या आठवड्यापासून राज्यात पावसाचे सावट आहे. गेल्या काही दिवसांत राज्याच्या अनेक भागांमध्ये पाऊस पडला आहे. काही ठिकाणी गारपीटही झाली होती. राज्यातील पावसाळी वातावरण आणि मेघगर्जनेसह पावसाचे सावट आणखी आठवडाभर कायम राहणार असल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

कोकणात तुरळक पावसाची शक्यता

कोकण विभागात आणखी एक दिवस मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज असून 9 मे पर्यंत तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मात्र 9 मेपर्यंत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याचा वारा वाहून हलक्या पावसाचा अंदाज आहे.

मुंबईत वैशाख वणव्याची धग

मुंबई शहर आणि उपगनरांमध्ये आतापासूनच वैशाख वणव्याचे चटके बसू लागले आहेत. गेल्या दोन दिवसांत मुंबईतील तापमान 35 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. पुढील आठवड्यात तापमान 36 अंशांच्या पुढे जाईल, असा अंदाज आहे. त्यामुळे मुंबईकरांना आणखी उकाडा सहन करावा लागणार आहे.

संबंधित बातम्या:

राज्यात अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी, ‘या’ भागात अवकाळी पावसाचा अंदाज

मराठवाड्यातील भूजल पातळी उंचावली, औरंगाबादमध्ये सर्वाधिक 5.13 मीटरनं वाढ

(Weather prediction for Maharashtra region)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.