Pune Weekend Lockdown : पुण्यात वीकेंड लॉकडाऊन, तिसरी लाट थोपवण्याचा निर्धार

कोरोनाचा उद्रेक पाहता पुण्यात वीकेंड लॉकडाऊन (Weekend Lockdown) लागू करण्यात आला आहे. पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत एकमताने निर्णय घेण्यात आला.

Pune Weekend Lockdown : पुण्यात वीकेंड लॉकडाऊन, तिसरी लाट थोपवण्याचा निर्धार
Ajit Pawar
प्रदीप कापसे

| Edited By: सचिन पाटील

Jun 19, 2021 | 12:06 PM

पुणे : कोरोनाचा उद्रेक पाहता पुण्यात वीकेंड लॉकडाऊन (Weekend Lockdown) लागू करण्यात आला आहे. पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar)  यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत एकमताने निर्णय घेण्यात आला. शनिवारी आणि रविवारी पुण्यात वीकेंड लॉकडाऊन असेल. अत्यावश्यक सेवा वगळता बाकी सर्व काही बंद राहणार आहे. वाढती गर्दी पाहता प्रशासनानं हा निर्णय घेतल्याची माहिती, भाजप खासदार गिरीश बापट यांनी दिली. गिरीश बापट यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधताना पुण्यातील वीकेंड लाकडाऊनची माहिती दिली. (Weekend Lockdown In Pune Maharashtra decision taken by Ajit Pawar)

कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी नियोजन सुरु आहे. कोरोनाचं प्रमाण जरी कमी असलं तरी विदेशात आलेली तिसरी लाट पाहून खबरदारी म्हणून आतापासून नियोजन सुरु आहे. शनिवारी आणि रविवारी नियम लाग होतील. तिसऱ्या लाटेत स्मशानभूमी, कोव्हीड हॉस्पिटल्स अपग्रेड करायची आहेत, असं गिरीश बापट म्हणाले.

ग्रामीण भागात नियम आहेत तसेच राहतील. घरेलू कामगारांना निधी मिळायला सुरुवात झाली आहे. दुकानदारांचं प्रत्येक 15 दिवसांनी लसीकरण करायला हवं, कोरोना कमी झाला की आपण ढिले पडतो, आपण आतापासूनच काळजी घेतली पाहिजे, असंही गिरीश बापटांनी सांगितलं.

NCC, NSS चे विद्यार्थी महापालिकेच्या मदतीला

एनसीसीचे 200 विद्यार्थी महापालिका आणि पोलीसांना मदत करतील, केंद्र सरकारकडून याला परवानगी घेतली आहे. विद्यापीठातील एन एस एसचेही विद्यार्थी महापालिकेसोबत आता कोरोना काळात काम करतील, असं बापट म्हणाले.

लसीचं उत्पादन वाढवण्यास सांगितलं आहे. पहिला टप्प्यात 13 लाख जणांचं लसीकरण झालंय, दुसऱ्या टप्प्यात 6 लाख लसीकरण झालंय, आता दुसऱ्या टप्प्यातील लसीला प्राधान्य दिलं जाईल, असं बापटांनी नमूद केलं.

शिवसेनेला वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा

राजकीय जीवनात राजकीय पक्ष मित्र असतात, कोणीही राजकारणात वैर ठेवू, नये. अजित पवार म्हणतात की राजकारणात कोणी कोणाचा मित्र नाही आणि कोणी कोणाचा शत्रू नाही तसं, आमचा राजकारणात कोणी शत्रू नाही. ही आमची भाजपची भूमिका आहे, शिवसेनेला वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा, असं गिरीश बापट म्हणाले.

पुण्यात काय सुरु काय बंद? 

पुण्यातील कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्यात आले होते. मात्र, शिथिलता मिळाल्यानंतर पुणेकर मार्केट आणि दुकानांमध्ये मोठी गर्दी करत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर रविवारी मॉल, दुकानं आणि सलून बंद राहणार असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे. पुण्यात शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता बाकी सर्व दुकानं बंद राहणार आहेत. वाढत्या गर्दीमुळं पालिकेनं हा निर्णय घेण्यात आलाय. शनिवारी आणि रविवारीही हा नियम लागू असणार आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडून ही माहिती देण्यात आली आहे.

पुणे महापालिका हद्दीतील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने, मॉल, सलून, ब्युटी पार्लर, स्पा आणि वेलनेस सेंटर हे शनिवार आणि रविवार पूर्णत: बंद राहतील. तर रेस्टॉरंट, बार, फूड कोर्टमधून शनिवार आणि रविवार केवळ पार्सल सेवा देता येणार आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिलीय.

संबंधित बातम्या 

Pune Unlock | पुण्यातील अनलॉकबाबत नवी नियमावली जाहीर, काय बंद काय सुरु?

Corona 3rd Wave | कोरोनाची तिसरी लाट खरंच येणार आहे का?

(Weekend Lockdown In Pune Maharashtra decision taken by Ajit Pawar)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें