MLA Tanaji Sawant : कोण आहेत शिंदे गटातले आमदार तानाजी सावंत, ज्यांच्या कार्यालयावर पुण्यात तोडफोड केली गेली, का उद्धव ठाकरेंवर ते नाराज होते?

महाविकास आघाडी सरकारमध्ये कुरबुरी असल्याची टीका भाजपाकडून सातत्याने होत आहेच. मात्र याला खतपाणी घालण्याचे काम तानाजी सावंत यांनी केले. सरकारमध्ये राहूनही त्यांनी सातत्याने आणि जाहीरपणे महाविकास आघाडीतील घटकपक्ष राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर टीका केली.

MLA Tanaji Sawant : कोण आहेत शिंदे गटातले आमदार तानाजी सावंत, ज्यांच्या कार्यालयावर पुण्यात तोडफोड केली गेली, का उद्धव ठाकरेंवर ते नाराज होते?
आरोग्यमंत्री तानाजी सावंतImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 25, 2022 | 1:35 PM

मुंबई : शिवसेनेचे बंडखोर आमदार तानाजी सावंत (MLA Tanaji Sawant) यांच्या पुण्यातील कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. शिवसैनिक आक्रमक झाल्यानंतर त्यांनी पुण्यातील बालाजी नगर परिसरातील सावंत यांचे कार्यालय फोडले. तानाजी सांवत हे मूळ शिवसैनिक (Shivsainik) नाहीतच. तानाजी सावंत कळीचा नारद असून या गद्दाराला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. याची सुरुवात पुण्यापासून करत आहोत, असे तोडफोड केल्यानंतर आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी सांगितले. मूळ शिवसैनिक नाहीत तर मग तानाजी सावंत आहेत कोण? तर मूळ शिवसैनिक नसून ते राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले एक नेते आहेत. ते आमदार कमी आणि लक्ष्मीपुत्र म्हणूनच जास्त ओळखले जातात. साखरसम्राट अशीही त्यांची ओळख आहे. महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) स्थापन झाल्यापासूनच त्यांनी आपल्या वक्तव्यांतून वाद निर्माण केले होते.

तानाजी सावंत यांच्याविषयीचे काही ठळक मुद्दे –

  1. तानाजी सावंत हे मूळ सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील रहिवासी आहेत.
  2. 2015मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत दाखल झाले.खासगी साखरसम्राट आणि शिक्षणसम्राट अशी त्यांची ओळख आहे.
  3. उस्मानाबादच्या राजकारणावर त्यांची चांगली पकड आहे, असे म्हटले जाते.
  4. कोणतेही मोठे आंदोलन न करता शिवसेनेत सध्या त्यांना मोठे स्थान आहे.
  5. हे सुद्धा वाचा
  6. ‘लक्ष्मी’पुत्र अशी शिवसेनेमध्ये खासगीतील ओळख आहे.
  7. राष्ट्रवादीचे बबन शिंदे यांच्याविरोधात तीनवेळा निवडणूक लढवली होती.
  8. शिवसेनेकडून दोनवेळा निवडणूक लढवली.
  9. अपक्ष म्हणून एकदा विधानसभा निवडणूक लढवली.
  10. राष्ट्रवादीचे विजयसिंह मोहिते पाटील गटाचे ते समर्थक म्हणून ओळखले जातात.

सरकारमध्ये राहून महाविकास आघाडीला लावला सुरूंग

महाविकास आघाडी सरकारमध्ये कुरबुरी असल्याची टीका भाजपाकडून सातत्याने होत आहेच. मात्र याला खतपाणी घालण्याचे काम तानाजी सावंत यांनी केले. सरकारमध्ये राहूनही त्यांनी सातत्याने आणि जाहीरपणे महाविकास आघाडीतील घटकपक्ष राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर टीका केली. शिवसेनेला दुय्यम वागणूक मिळते, अर्थसंकल्पातूनही हे दिसून येत आहे, असे ते दोन महिन्यांपूर्वीच म्हणाले होते. शिवसेनेला केवळ 16 टक्केच बजेट दिले जाते. त्यात पगारावर सहा टक्के जाते, मग विकासावर किती, असा सवाल त्यांनी केला होता. आमच्यामुळे सत्तेत आले आणि आमचीच घडी विस्कटवण्याचा प्रयत्न तुम्ही करता, असा आरोप त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर केला. दरम्यान, आता त्यांनी बंड केले असून त्यांच्याविरोधात शिवसैनिक एकवटले असून पक्ष कार्यालय फोडण्यात आले आहे.

काय म्हणाले होते तानाजी सावंत?

राहुल मोटेंचा केला पराभव

उस्मानाबादमधील परंडा भूम मतदार संघ (2019) – विधान परिषद सदस्य असतानाही विधानसभेची उमेदवारी घेत तब्बल 32 हजार 902 मतांनी विजयी झाले. 3 वेळेस राष्ट्रवादीचे आमदार राहिलेले आणि अजित पवार यांचे नातेवाईक राहुल मोटे यांचा पराभव केला. 1 लाख 6 हजार 674 विक्रमी मते घेत जिल्ह्यात रेकॉर्ड केले.

आक्रमक शिवसैनिकांनी फोडले कार्यालय, पाहा व्हिडिओ –

Non Stop LIVE Update
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.