अभिजित पोते, TV9 मराठी, प्रतिनिधी, पुणे : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर म्हणाले, व्यक्तिगत आरोप होतात तेव्हा त्याचा परिणाम फार नसतो. पण, संस्थात्मक आरोप होत असतील तर त्याचं गांभीर्य जास्त असते. शिवसेनेचं चिन्ह गोठविणं, नाव गोठविलं हे अधिकार त्या निवडणूक आयोगाकडं आहे का? निवडणूक आयोग मनमानी करते. एखादा पक्ष फ्रीज करणं हे अधिकार निवडणूक आयोगाला आहेत का? हे सर्वोच्च न्यायालयानं तपासला पाहिजे, असं मला वाटतं, असंही ते म्हणाले.