Maratha Morcha: मराठा आरक्षणासाठी कोल्हापूरचीच निवड का?; वाचा सविस्तर

खासदार संभाजी छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांच्या नेतृत्वात कोल्हापुरात मराठा मूक मोर्चा सुरू झाला आहे. संभाजीराजे यांनी मराठा आरक्षण मोर्चासाठी कोल्हापूरची निवड करणं आणि छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेऊन आंदोलन करणं यामागे अनेक कारणं आहेत.

Maratha Morcha: मराठा आरक्षणासाठी कोल्हापूरचीच निवड का?; वाचा सविस्तर
maratha morcha
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: भीमराव गवळी

Jun 16, 2021 | 12:20 PM

मुंबई: खासदार संभाजी छत्रपती यांच्या नेतृत्वात कोल्हापुरात मराठा मूक मोर्चा सुरू झाला आहे. संभाजीराजे यांनी मराठा आरक्षण मोर्चासाठी कोल्हापूरची निवड करणं आणि छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेऊन आंदोलन करणं यामागे अनेक कारणं आहेत. त्याला ऐतिहासिक संदर्भ आहेत. काय आहेत ही कारणे?, यामागे कोणती ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे? याचा घेतलेला हा आढावा. (why sambhaji chhatrapati house kolhapur for maratha muk morcha?, read details)

कोल्हापूरचा इतिहास

इ.स.पूर्व 1 ल्या शतकापासून ते इ.स. 9 व्या शतकापर्यंत कोल्हापूर येथील वसाहत आजच्या ब्रह्यपुरीच्या टेकडीवर होती. तसे उत्खननातून सिद्ध झालं आहे. कोल्हापुरात सातवाहन, वाकाटक, कदंब, शेद्रक आणि मोर्य या प्राचीन राजघराण्याचे राज्य होते. तर चालुक्य घराण्याची सत्ता कोल्हापुरात सर्वात प्रभावी होती. बहुतेक सर्व चालुक्य सम्राट कोल्हापूरास ‘दक्षिण काशी’ व ‘महातीर्थ’ संबोधितात. दक्षिण काशी म्हणून करवीर पीठाचा उल्लेख केला जातो. महालक्ष्मीने आपल्या करांनी या नगरीला प्रलयकाळाच्या संकटातून सुरक्षित उचलेले म्हणून कोल्हापूरला ‘करवीर’ म्हटलं जातं. तशी अख्यायिका आहे.

आरक्षण भूमी

कोल्हापूर ही सामाजिक परिवर्तनाची क्रांती करणारी भूमी आहे. याच भूमीतून देशातील आरक्षणाची बीजं रोवली गेली. वेदोक्त प्रकरणानंतर छत्रपती शाहू महाराज यांनी 26 जुलै 1902 रोजी आरक्षणाचा आदेश काढला. त्यानंतर आरक्षणाला सुरुवात झाली. शाहू महाराजांची आठरापगड जातींना आरक्षण देऊन मुख्यप्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला. रिक्त झालेल्या जागांपैकी शेकडा 50 जागा मागासलेल्या लोकांस भराव्या. ज्या ऑफिसमध्ये मागासलेल्या वर्गाच्या अंमलदाराचे प्रमाण सध्या शेकडा 50 पेक्षा कमी असेल तर पुढची नेमणूक या वर्णातील व्यक्तीची करावी, असं या आदेशात म्हटलं होतं. मागासलेल्या वर्णाचा अर्थ ब्राह्मण, प्रभू, शेणवी, पार्शी व दुसरे पुढे असलेले वर्ण खेरीज करून सर्व वर्ण असा समजावा, असंही त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे खासदार संभाजी छत्रपती यांनी कोल्हापूरची निवड केली आहे. तसेच कोल्हापुरातच शाहू महाराज यांची समाधी आहे. त्यामुळेही संभाजीराजे यांनी या ऐतिहासिक स्थळाची निवड केली.

पुरोगामी आंदोलनाची भूमी

छत्रपती शाहू महाराज यांचा संपन्न वारसा राहिलेला कोल्हापूर पुरोगामी चळवळीचं केंद्रं मानलं जातं. कोल्हापुरातून अनेक सामाजिक आणि राजकीय आंदोलनं झाली आहे. कोल्हापुराने महाराष्ट्राला दिशा देण्याचं कामही केलं आहे. सत्यशोधक चळवळ, प्रजापरिषद चळवळ, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, शेतकरी कामगार चळवळ आणि डावी चळवळ आदी चळवळींचं कोल्हापूर हे केंद्र राहिलं आहे. सामाजिक न्यायाची बीजं रोवणारं शहर म्हणूनही कोल्हापूरकडे पाहिलं जातं. त्यामुळेही संभाजी छत्रपती यांनी कोल्हापूरची निवड केल्याचं सांगितलं जातं.

होम ग्राऊंड म्हणूनही निवड

मराठा मूक मोर्चासाठी कोल्हापूरची निवड करण्यामागे संभाजीराजे हे कोल्हापूरचे आहेत हे मूळ कारण आहे. आपल्या होमग्राऊंडवरून आंदोलन सुरू करावं असं त्यांच्या मनात असेल, त्यामुळे कोल्हापूरची निवड केली असले. दुसरं छत्रपती शाहू महाराजांनी याच भूमीतून आरक्षणाची बीजं रोवली तोही संदर्भ कोल्हापूरच्या निवडीमागे आहेच, असं राजकीय विश्लेषक, ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी सांगितलं. (why sambhaji chhatrapati house kolhapur for maratha muk morcha?, read details)

संबंधित बातम्या:

Maratha Morcha Kolhapur Live : मराठा मोर्चाला सुरुवात, संभाजीराजे, प्रकाश आंबेडकर आंदोलनस्थळी दाखल

Maratha Morcha : मराठा आंदोलनात प्रकाश आंबेडकर, चंद्रकांतदादांची एन्ट्री, काळे कपडे घालून मराठा आंदोलकांचा मूकमोर्चा सुरू

Maratha Morcha : शाहू महाराजांनी आरक्षणाची बीजं कशी पेरली?; वाचा, सविस्तर

(why sambhaji chhatrapati house kolhapur for maratha muk morcha?, read details)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें