
शिरुर/पुणेः पुणे जिल्ह्यातील शिरुर येथे एका अज्ञात व्यक्तीकडून शिरुर न्यायालय (Shirur Court) परिसरात गोळीबार केल्याची घटना घडली होती. त्यानंतर गोळीबार करणाऱ्या संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर जावयाकडूनच सासू आणि पत्नीवर गोळीबार (Shooting at wife) केल्याची प्राथमिक माहिती समोर आली. पती पत्नीच्या पोटगीची केस न्यायालयात चालू होती. यावेळी ही पत्नी आणि तिचा पती न्यायालयाते आले होते. यावेळी ही घटना घडली. या गोळीबारामध्ये पत्नीचा जागीच (Wife Death) मृत्यू झाला असून सासूची प्रकृती गंभीर आणि चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.
गोळीबारात जखमी असलेल्या सासूवर शिरूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. या घटनेची नोंद शिरूर पोलिसात झाली आहे.
या प्रकरणी माजी सैनिक दीपक पांडुरंग ढवळे आणि त्याचा सख्खा भाऊ संदीप पांडुरंग ढवळे (रा. अंबरनाथ, जि.ठाणे) या दोघांना पोलिसांनी पाठलाग करुन ताब्यात घेतले आहे. या दोघा भावांनी मिळून परवाना प्राप्त पिस्तूलमधून दीपक ढवळेची पत्नी मंजुळा रंगनाथ झांबरे (रा. वाडेगव्हाण ता. पारनेर, जि. अहमदनगर) व तिच्यासोबत असलेली तिची आईवर यांच्यावर गोळीबार केला होता. या घटनेत मंजुळा यांचा मृत्यू झाला असून त्यांची आई जखमी झाली आहे.
या घटनेतील दोघांसह रिक्षा आणि शस्त्र ताब्यात घेण्यात आले आहेत. ही कारवाई शिरूर पोलीस ,रांजणगाव पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांकडून करण्यात आली आहे. गोळीबार करण्यासाठी हे दोघेही अंबरनाथ तेथून रिक्षाने शिरूर येथे आले होते.
शिरूर न्यायालय परिसरात पोटगीवर केस चालू होती. यावेळी जावयानेच सासू आणि पत्नीवर न्यायालयाच्या आवारातच गोळीबार करण्यात आला. यावेळी जावयाने गोळीबार केल्यानंतर तो आणि त्याचा भाऊ पळून जात होते. यावेळी पोलिसांनी त्यांचा पाठलाग करुन दोघांनाही अटक करण्यात पोलिसांना यश आले.
या दोघां भावांनी न्यायालय परिसरात गोळीबार केल्यानंतर फरार झाले होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत शिरूर शहर आणि पुणे नाशिक महामार्गावर पाठलाग करून त्या दोघांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या.