AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajya Sabha Election: समाजवादी पार्टीशी चर्चा करू, मुख्यमंत्र्यांना किमान समान कार्यक्रमाची आठवण करून देऊ; बैठकीत आधीच नाना पटोलेंचे फटाके

Rajya Sabha Election: प्रत्येक छोट्या पक्षांशी संपर्क केला जात आहे. अपक्षांशी संपर्क केला जात आहे. त्यांना महाविकास आघाडीला मतदान करण्याची विनंती केली जात आहे. अपक्ष आमदार आणि छोटे पक्ष सुरुवातीपासूनच आमच्यासोबत आहेत.

Rajya Sabha Election: समाजवादी पार्टीशी चर्चा करू, मुख्यमंत्र्यांना किमान समान कार्यक्रमाची आठवण करून देऊ; बैठकीत आधीच नाना पटोलेंचे फटाके
समाजवादी पार्टीशी चर्चा करू, मुख्यमंत्र्यांना किमान समान कार्यक्रमाची आठवण करून देऊ; बैठकीत आधीच नाना पटोलेंचे फटाकेImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 07, 2022 | 1:41 PM
Share

मुंबई: राज्यसभा निवडणुकीच्या (Rajya Sabha Election) पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीची (mahavikas aghadi) अत्यंत महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीसाठी अपक्षांसह सर्व आमदारांना मुख्यमंत्री कार्यालयातून फोन गेले आहेत. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेस नेते एच. के. पाटील हे संबोधित करणार आहेत. त्यामुळे बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या बैठकीपूर्वीच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. आजच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना किमान समान कार्यक्रमाची अंमलबाजवणी करण्याची आठवण करून देऊ असं पटोले म्हणाले. तसेच अपक्ष आमदार नाराज असणं योग्यच आहे. आपल्या मतदारसंघातील कामाबाबत जर आमदार नाराज असतील तर त्यांचं चुकलं काय? असा सवाल पटोले यांनी केला आहे. बैठकी आधीच पटोले यांनी फटाके फोडल्याने या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

प्रत्येक छोट्या पक्षांशी संपर्क केला जात आहे. अपक्षांशी संपर्क केला जात आहे. त्यांना महाविकास आघाडीला मतदान करण्याची विनंती केली जात आहे. अपक्ष आमदार आणि छोटे पक्ष सुरुवातीपासूनच आमच्यासोबत आहेत. त्यामुळे कुणाला बोलायची गरज काय? एमआयएमही राष्ट्रवादीसोबत, समाजवादी काँग्रेसकडे आहे. त्यामुळे ज्यांच्यासोबत जे पक्ष आहेत, त्यांच्यासोबत ते ते पक्ष चर्चा करतील, असं पटोले म्हणाले.

ते आघाडीलाच मतदान करणार

आघाडीत ज्या मोठ्या पक्षांसोबत अपक्ष आणि छोटे पक्ष आहेत. ते पक्ष आपल्या मित्र पक्ष आणि अपक्ष आमदारांशी बोलतील. समाजवादी पार्टी काँग्रेससोबत आहे. त्यामुळे त्यांना आम्ही आघाडीला मतदान करण्याची विनंती करणार आहोत. आमचे आमदार आमच्यासोबत आहेत. तेही आघाडीलाच मतदान करतील, असंही त्यांनी सांगितलं.

आमदारांचं चुकलं काय?

नाराज अपक्ष आमदारांची नाराजी दूर केली जाईल. मतदान ही संधी असते. या निमित्ताने अपक्ष आमदारांना त्यांच्या मतदारसंघातील समस्या मांडता येतात. या आमदारांनी जनतेच्या हितासाठी काही गोष्टी मांडल्या, नाराजी व्यक्त केली तर त्यांचे काय चुकले? असा सवाल करतानाच आजच्या बैठकीत किमान समान कार्यक्रमाची मुख्यमंत्र्यांना आठवण करून देऊ, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

पटोलेंच्या घरी आमदारांची व्यवस्था

आमदारांना प्रशिक्षणाची गरज नाही. पण त्यांना मतदानाची थोडी माहिती द्यावी लागणार आहे. परवा मतदान आहे. आमदार दोन दिवस इथेच राहणार आहेत. त्यामुळे या आमदारांशी शिर्डीत नव संकल्प शिबीर झालं. त्यातील मुद्द्यांबाबत त्यांच्याशी चर्चा करणार आहे. लोहगड या माझ्या निवासस्थानी सर्व आमदारांना ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

विधान परिषदेच्या उमदेवारांचा निर्णय उद्या

शिवेसना आणि राष्ट्रवादीकडून विधान परिषदेच्या उमदेवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. काँग्रेसच्या उमेदवारांची नावे कधी निश्चित होणार? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर विधान परिषदेचा उद्या निर्णय होईल, असं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं.

Follow Us
माकडछाप ब्रँडने भाजपला शहाणपण शिकवू नये; नवनाथ बन यांनी कोणाला सुनावलं
Navnath Ban : 12 पक्ष बदलले नाही...माकडछाप ब्रँडने भाजपला शहाणपण शिकवू नये...; नवनाथ बन यांचा रवींद्र धंगेकरांवर घणाघात
ठाण्यातल्या शिवसेनेच्याच नगरसेवकांची आंदोलनाकडे पाठ; नेमकं काय घडलं?
Shivsena : ठाण्यातल्या शिवसेनेच्याच नगरसेवकांची आंदोलनाकडे पाठ; नेमकं काय घडलं?
ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र येणार? धंगेकर यांना कुठे सिग्नल मिळाला?....
Vijay Wadettiwar : ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र येणार? रवींद्र धंगेकर यांना कुठे सिग्नल मिळाला तो त्यांनी सांगावा...
प्रदीप पूर्णेकर प्रकरण गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांना महागात पडणार....
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर प्रकरण गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांना महागात पडणार; संजय राऊत असं का म्हणाले?
महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यावं; संजय राऊतांचं मोठं विधान
Sanjay Raut : वैचारिक मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यावं; संजय राऊतांचं मोठं विधान
साडेचार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर माथेरानची राणी पुन्हा धावली
Matheran Mini Train : पर्यटकांसाठी आनंदाची बातमी; साडेचार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर माथेरानची राणी पुन्हा धावली
मुंबईत अचानक पावसाची हजेरी, ऑक्टोबरच्या उकाड्यानंतर रिमझिम सरी...
Mumbai Rain Updates : मुंबईत अचानक पावसाची हजेरी, ऑक्टोबरच्या उकाड्यानंतर रिमझिम सरी; वातावरणात गारवा
मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचं विधान
Raj Thackeray : मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंचं वक्तव्य, CM स्वतःच हसू लागले
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड काय...
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड नेमकी काय चर्चा?
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय...
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाले?