AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुळशीच्या पैलवानावर काळाचा घाला, 8 दिवसांवर लग्न असताना नियतीचा अमानुष खेळ

पैलवान विक्रम पारखी याचे जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पुण्याजवळील मुळशी तालुक्यातील ही घटना घडली. विक्रम याने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतला होता आणि अनेक पदके जिंकली होती. त्याचे येत्या १२ डिसेंबरला लग्न होणार होते. या दुर्दैवी घटनेने कुस्ती क्षेत्रात आणि त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

मुळशीच्या पैलवानावर काळाचा घाला, 8 दिवसांवर लग्न असताना नियतीचा अमानुष खेळ
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Dec 04, 2024 | 5:55 PM
Share

जिममध्ये व्यायाम करत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने पैलवानाचा मृत्यू झाला आहे. पुण्यातल्या मुळशी तालुक्यातील माण येथे ही घटना घडली. पैलवान विक्रम पारखी असं आकस्मित मृत्यू झालेल्या पैलवानाचे नाव आहे. राष्ट्रीय खेळाडू पैलवान विक्रम पारखी यांचे आकस्मिक निधन झाल्याने माणसह मुळशीवर शोककळा पसरली आहे. पैलवान विक्रम पारखी याचे येत्या 12 डिसेंबरला लग्न होणार होते. मात्र काळाने त्याआधीच झडप घालून विक्रमचा मृत्यू झाल्याने पारखी कुटुंबावर आनंदा ऐवजी दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विक्रम याने अनेक राष्ट्रीय पदकं आणि किताब मिळवले आहेत. विक्रमने आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील कुस्ती स्पर्धेत सहभाग घेतला होता.

मुळशीच्या माण येथील राष्ट्रीय खेळाडू कुमार महाराष्ट्र केसरी पैलवान विक्रम पारखी याचे आज सकाळी जिममध्ये व्यायाम करताना आकस्मिक निधन झाले. पैलवान विक्रम याला हृदयविकाराचा झटका आला. त्यामध्ये त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेने संपूर्ण माणगावसह मुळशी तालुक्यावर आणि कुस्ती क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. पैलवान विक्रम पारखी याचे येत्या 12 डिसेंबरला लग्न होणार होते, मात्र काळाने त्याआधीच झडप घालून विक्रम ह्याला हिरावल्याने पारखी कुटुंबावर आनंदा ऐवजी दुःखाचा डोंगर कोसळलाय. पारखी कुटुंबावर कोसळलेल्या दुःखामुळे मुळशी तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

पैलवान विक्रम पारखीने अनेक पदकं मिळवली

मुळशीतल्या माणगावचा भूमिपुत्र असलेल्या विक्रम पारखी याने कुमार महाराष्ट्र केसरी पदावर आपलं नाव कोरून मानाची गदा मिळवली होती. २८ नोव्हेंबर २०१४ ला वारजे येथे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आयोजित महाराष्ट्र राज्य कुमार अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा २०१४ झाली होती. त्यात विक्रम याने अजिंक्यपद मिळवले.

विक्रम याने अनेक राष्ट्रीय पदकं आणि किताब मिळवले. आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील कुस्ती स्पर्धेत सहभाग घेतला होता. अनेक पदकं आणि किताब आपल्या नावावर करत विक्रम करणारा हा पैलवान युवा पैलवनांसाठी आदर्श होता. कुस्ती क्षेत्रात त्याला आदर्श आणि गुणी खेळाडू म्हणून ओळख होती.

झारखंड इथल्या रांचीमध्ये राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत त्याने ब्राँझ पदक मिळवले होते. मुळशीतल्या माले केसरी स्पर्धेचा विजेता बनवून माले केसरी किताब आणि गदा मिळवली होती. अशा अनेक नामांकित कुस्ती स्पर्धेत माण गावचे आणि मुळशी तालुक्याचे नाव विक्रम पारखी याने उंचावले होते. विक्रम पारखी याच्या आकस्मिक जाण्याने पारखी परिवाराचे आणि मुळशीतील कुस्ती क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचे वडील शिवाजीराव पारखी हे निवृत्त सैनिक आहेत, कारगिल युद्धातही त्यांनी सहभाग घेतला होता. विक्रम याच्यामागे आई- वडील, विवाहित एक भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?