शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी यवतमाळच्या शेतकऱ्याचा 600 कि.मी. पायी प्रवास

यवतमाळ जिल्ह्यातल्या जवळा इथले शेतकरी संजय खंदारे-देशमुख हे चक्क सहाशे किमी अंतर चालत पार करीत बारामतीत आले. (Sharad Pawar Sanjay Khandare)

  • नविद पठाण, टीव्ही 9 मराठी, बारामती
  • Published On - 18:34 PM, 12 Dec 2020
शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी यवतमाळच्या शेतकऱ्याचा 600 कि.मी. पायी प्रवास

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे. शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त देशभरातील नेत्यांनी दिल्या. मात्र, यवतमाळमधील शेतकरी संजय खंदारे-देशमुख अनोख्या पद्धतीनं शुभेच्छा देण्यास बारामतीत पोहोचले. आपल्या नेत्यावर प्रेम व्यक्त करण्यासाठी कार्यकर्ते नेहमीच वेगवेगळ्या संकल्पना वापरत असतात. त्यासाठी वेळ, काळ किंवा अंतर पाहिलं जात नाही असंच म्हणावं लागेल. त्याला कारणही तसंच आहे. यवतमाळ जिल्ह्यातल्या जवळा इथले शेतकरी संजय खंदारे-देशमुख हे चक्क सहाशे किमी अंतर चालत पार करीत बारामतीत आलेत. तेही त्यांच्या लाडक्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी. या अवलियाचं बारामतीकरांनीही उत्स्फुर्त स्वागत केलंय. (Yavatmal Farmer Sanjay Khandare walking six hundred k.m. to wish Sharad Pawar)

बारामतीकरांनी केलं उत्स्फुर्त स्वागत

सहाशे किलोमीटर पायी प्रवास करुन बारामतीत पोहोचलेले संजय खंदारे-देशमुख यवतमाळ जिल्ह्यातल्या आर्णी तालुक्यातील जवळा येथील शेतकरी आहेत . शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ते पायी चालत बारामतीत आलेत. २२ दिवसांचा प्रवास करत खंदारे देशमुख बारामतीत आलेत. या प्रवासात त्यांचं गावागावात स्वागत केलं गेलं. त्याचवेळी राहण्याची, जेवण्याची सोयही झाल्याचं ते सांगतात. (Yavatmal Farmer Sanjay Khandare walking six hundred k.m. to wish Sharad Pawar)

विदर्भातील प्रश्नांकडे लक्ष देण्याची विनंती

विदर्भात बोंडआळीमुळं झालेलं कापसाचं नुकसान, अतिवृष्टीमुळे झालेली अवस्था याबद्दल दखल घेण्याची विनंती करण्यासाठी आल्याचं संजय खंदारे देशमुख यांनी सांगितले. शरद पवार हे सर्व समाजाला सामावून घेणारे नेते आहेत. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न त्यांच्यामुळे मार्गी लागतात. त्यामुळे आपण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पायी बारामतीपर्यंत आल्याचं संजय खंदारे सांगतात. (Yavatmal Farmer Sanjay Khandare walking six hundred k.m. to wish Sharad Pawar)

सध्याच्या राजकारणात निष्ठा आणि प्रामाणिकपणा याला दुय्यम स्थान दिलं जातं. अशा परिस्थितीत तब्बल सहाशे किमी अंतराचा पल्ला पायी चालत येवून आपल्या नेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या संजय खंदारे देशमुख यांच्यासारखे कार्यकर्ते मोजक्याच नेत्यांच्या नशीबात असतात.

संबंधित बातम्या: 

शरद पवारांनी यूपीएचं नेतृत्व करावं, अशी माझी मनापासून इच्छा : अबू आझमी

Sharad Pawar| शरद पवारांचा गावागावात राष्ट्रवादी पोहोचवण्याचा प्लॅन एका क्लिकवर

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त धनंजय मुंडे यांचे 2 योजनांचे गिफ्ट

(Yavatmal Farmer Sanjay Khandare walking six hundred k.m. to wish Sharad Pawar)