शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त धनंजय मुंडे यांचे 2 योजनांचे गिफ्ट

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी 2 नवीन योजना जाहीर करत पवारांना वाढदिवसाचे वेगळे आणि खास गिफ्ट दिले.

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त धनंजय मुंडे यांचे 2 योजनांचे गिफ्ट

बीड : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी 2 नवीन योजना जाहीर करत पवारांना वाढदिवसाचे वेगळे आणि खास गिफ्ट दिले. दिव्यांगासाठी ‘महाशरद’ योजना तर बार्टी संस्थेचे नवीन शैक्षणिक अ‌ॅपची घोषणा मंत्री धनंजय मुंडे यांनी केली. (Two plan gifts from Dhananjay Munde on Sharad Pawar birthday)

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या कार्यक्रमात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी बीड येथून सहभागी होत 2 नवीन योजनांची घोषणा केली तसंच त्याचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आले.

‘महाशरद’ या योजनेत दिव्यांगाना मदत करण्यासाठी एक वेबसाईट व अ‌ॅप सुरु करण्यात आले आहे. यात त्यांची नोंद केल्यानंतर दिव्यांगत्व दूर करण्यासाठी लागणारी वैद्यकीय मदत व साहित्य सामाजिक संस्थांच्या मदतीतून केले जाणार आहे. आर्थिक स्थिथीमुळे अनेक दिव्यांगाना साहित्य खरेदी करता येत नाही तर दानशूर लोकांना माहिती नसते की कोणाला काय मदत हवी आहे? महाशरद पोर्टल व अ‌ॅपच्या माध्यमातून राज्यातील 29 लाख दिव्यांगाना मदत केली जाणार असल्याचे मंत्री मुंडे म्हणाले. तसेच बार्टी या संस्थेचे एक नवीन मोबाईल अँप आजपासून सुरू करण्यात आले यात केजीपासुन पीजी पर्यंत सर्व अभ्यासक्रम असणार आहे.

“शरद पवार हे चालते बोलते विश्वविद्यापीठ असून त्या विद्यापीठाचा मी एक कार्यकर्ते आहे. अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना शरद पवार यांच्या रुपात देवमाणुस दिसतो. अविरतपणे समाजसेवा करणे आणि गोरगरिबांच्या कामी येणे ही शिकवण पवारसाहेबांनी आम्हाला दिली आणि त्याचे पालन करणे हीच वाढदिवसाची भेट ठरेल”, असे मुंडे म्हणाले. शरद पवार यांचा शतकाचा वाढदिवस साजरा करु, अशी प्रार्थना धनंजय मुंडेनी श्री वैद्यनाथ व भगवानबाबा यांच्या चरणी केली.

“मराठवाड्यात एक म्हण आहे , होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याच होत करायचं… ही म्हण शरद पवार यांनी वर्षभरापूर्वी खरी करून दाखविली असं सांगत धनंजय मुंडे यांनी सत्तास्थानेच्या घडामोडींना उजाळा दिला. 56 आमदारांचा राज्याचा मुख्यमंत्री होतो, 54 आमदारांचा उपमुख्यमंत्री व 44 आमदारांच्या पक्षाचे मंत्री होतात आणि 105 आमदार असलेला भाजपा विरोधात बसतो याला खरं लोकशाहीचे दर्शन म्हणतात आणि हे पवारांनी करुन दाखविले याचा अभिमान आहे, असं म्हणत त्यांनी विरोधी पक्षाला चिमटा काढला.

(Two plan gifts from Dhananjay Munde on Sharad Pawar birthday)

संबंधित बातम्या

धनंजय मुंडेंसाठी ‘देवमाणूस’ कोण?, ‘वारसा’ कुणाचा?

BLOG : धनंजय की पंकजा? गोपीनाथरावांनी धर्मसंकट कसं सोडवलं?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI