AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हाय सिक्योरिटी, अंगात भगवी शाल, राहुल गांधी ‘हिंदुस्तानचे भावी पंतप्रधान’, पुण्यातील Video, बॅनरची एकच चर्चा!

Rahul Gandhi Saffron Shawl : पुण्यातील कार्यक्रमासाठी राहुल गांधी यांचे पुणे विमानतळावर आगमन झाले असता, कार्यकर्त्यांनी त्यांच्या गळ्यात भगवी शाल टाकत स्वागत केले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हाय सिक्योरिटी, अंगात भगवी शाल, राहुल गांधी 'हिंदुस्तानचे भावी पंतप्रधान', पुण्यातील Video, बॅनरची एकच चर्चा!
rahul Gandhi bhagavi ShalImage Credit source: TV 9 Marathi
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 22, 2026 | 6:56 PM
Share

लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. आज ते छात्रों की गूंज या कार्यक्रमात विद्यार्थिनींशी संवाद साधणार आहेत. पुण्यातील या कार्यक्रमासाठी राहुल गांधी यांचे पुणे विमानतळावर आगमन झाले असता, कार्यकर्त्यांनी त्यांच्या गळ्यात भगवी शाल टाकत स्वागत केले. तसेच पुण्यात राहुल गांधी हे हिंदुस्थानचे भावी पंतप्रधान असे बॅनरही पहायला मिळाले. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.  पुणे विमानतळावर नेमकं काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊयात.

गळ्यात भगवी शाल घालून राहुल गांधींचे स्वागत

पुण्यातील छात्रों की गूंज या कार्यक्रमासाठी राहुल गांधी यांचे पुणे विमानतळावर आगमन झाले. यावेळी काँग्रेसचे विविध पदाधिकारी हजर होते. राहुल गांधी विमानतळावरून बाहेर पडताच काही पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच एका महिला पदाधिकाऱ्याने राहुल गांधी यांच्या गळात भगवी शाल घातली. यावेळी माध्यमांचे प्रतिनिधीही हजर होते. त्यामुळे राहुल गांधी यांच्या गळ्यात भगवी शाल घालतानाचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

रेटून बोल पण खोटं बोल ही भाजपाची नीती – मोहन जोशी

राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्यावर बोलताना काँग्रेसचे नेते मोहन जोशी यांनी म्हटले की, राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, नाना पटोले, काँग्रेसचे अनेक नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. काँग्रेसमध्ये सध्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. रेटून बोल पण खोटं बोल की भाजपाची नीती आहे.

कार्यक्रमाला विद्यार्थी गर्दी करतील – जोशी

आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांचा मुंबईमध्ये कार्यक्रम होता त्यावेळेस पैसे देऊन त्यांनी मुलं आणली. त्यामुळे त्यांना तसेच वाटते की पुण्यामध्ये पण पैसे देऊन मुलं आणली असतील. पण स्वेच्छेने या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थिनी गर्दी करतील. सावित्रीच्या लेकी ठरवून देतील की आमचा नेता राहुल गांधी आहे. भाजपात राहुल गांधी यांच्या कार्यक्रमामुळे भीतीचे वातावरण आहे. प्रत्येकाने आपापल्या विधानसभेमध्ये वेगवेगळे संगीताचे कार्यक्रम ठेवलेले आहेत मात्र याला न जुमानता अनेक विद्यार्थिनी आज या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.

Follow Us
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच...
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच बसत नाही की...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया, म्हणाले...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, ‘सिनेसृष्टीतल ही पोकळी भरून निघणार नाही’
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते...
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते; 45 सीपीआर दिला मात्र...  काय घडलं?
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला- सुप्रिया सुळे
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला, मी... सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील...
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्याची भावनिक प्रतिक्रिया
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
Nana Patekar | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार...
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार, रोहित पवारांची मोठी माहिती
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा