
सध्या सर्वत्र माजी नगरसेवर मंगेश काळोखे यांच्या निर्घृण हत्येची चर्चा सुरु आहे. मंगेश काळोखे हे रायगड जिल्ह्यातील खोपोली गावातील शिवसेना शिंदे गटाच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती होते. मंगेश यांच्यावर 5 ते 6 हल्लेखोरांनी तलवारीने जवळपास 19 ते 20 वार करुन त्यांची हत्या केली. आता या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या हत्येचे बीडमधील वाल्मीक कराड कनेक्शन आमदार महेंद्र थोरवे यांनी सांगितले आहे.
काय म्हणाले आमदार महेंद्र थोरवे?
आमदार महेंद्र थोरवे यांनी काल मंगेश काळोखे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. तसेच त्यांनी या प्रकरणाचे बीड कनेक्शन काय आहे हे सांगितले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी रवी देवकर याचा बॉडीगार्ड हा बीडचा असल्याचे सांगितले आहे. तसेच या बॉडीगार्डने जवळपास 19 वार करुन मंगेश काळोखे यांची हत्या केल्याचा दावा देखील केला आहे. तसेच त्याचे बड्या नेत्यांशी एकदम जवळचे संबंध असल्याचा खळबळजनक आरोप देखील महेंद्र थोरवे यांनी केले आहेत.
रवी देवकर यांचा बॉडीगार्ड वाल्मीक कराडचा साथीदार
“मी आल्यानंतर मंगेशच्या परिवाराने मला धक्कादायक माहिती सांगितली. जो रवी देवकर यांचा बॉडीगार्ड आहे (महेश धायतडक) त्यांनी मंगेशवर तेरा वार एकट्याने केले आहेत. तो जो बॉडीगार्ड आहे तो वाल्मीक कराडचा साथीदार आहे आणि वाल्मीक कराडच्या बरोबर त्याच्या पेजवर त्याचं नाव आहे. त्याच्या ग्रुपवर तो आहे. धनंजय मुंडे सोबत गडावरचे देखील त्याचे फोटो आहेत. तो वॉन्टेड आहे रवी देवकर यांनी खास हत्या करण्यासाठी त्याला या ठिकाणी आणलेला होता. हे सर्व राष्ट्रवादी कनेक्शन आहे. धनंजय मुंडे वाल्मीक कराड आणि हा रवी देवकर यांनी आणलेला बॉडीगार्डची मंगेशची क्रूर हत्या करण्यामध्ये समावेश आहे” असे आमदार महेंद्र थोरवे म्हणाले.
पुढे आमदार महेंद्र थोरवे म्हणाले, शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितला आहे की यांच्या वरती मोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे. फास्ट ट्रॅकवर हा खटला चालला पाहिजे. जोपर्यंत कारवाई केली जात नाही तोपर्यंत महाराष्ट्रातले सर्वे आमदार मी या ठिकाणी एकत्र बोलवणार