Sunil Tatkare: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र? ती सर्वात मोठी अट काय? सुनील तटकरेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडं चेंडू टोलावला

Sunil Tatkare on NCP Merge: दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनि‍करणाबाबत अजूनही पेच आणि चर्चा सुरू आहे. आज याविषयी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भाष्य केलं. तर काल प्रफुल पटेल यांनी वक्तव्य केलं होतं. आज प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याबाबतीत मोठे वक्तव्य केलं आहे.

Sunil Tatkare: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र? ती सर्वात मोठी अट काय? सुनील तटकरेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडं चेंडू टोलावला
शरद पवार, अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस, सुनील तटकरे
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Edited By: | Updated on: Feb 04, 2026 | 12:00 PM

Sunil Tatkare-Ajit Pawar-Sharad Pawar-NCP: दोन्ही राष्ट्रवादी पक्ष विलीनि‍करणाची चर्चा सुरू होती आणि लवकरच त्याविषयीची घोषणा दिवंगत अजितदादा पवार करणार होते असा दावा पुढे आला. त्यावर अजितदादांच्या गोटातील वरिष्ठ नेत्यांनी कानावर हात ठेवले. त्यानंतर काल अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या गटाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी सुद्धा या चर्चांना काही अर्थ नसल्याचे संकेत दिले. तर आज शरद पवार यांनी दोन्ही पक्ष एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असल्याचे पुन्हा सांगितले. आता या सर्व प्रकरणावर दादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मोठे भाष्य केले आहे. त्यांनी विलीनि‍करणाचा चेंडू शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कोर्टात टोलावला. टीव्ही 9 मराठीला दिलेल्या खास मुलाखतीत त्यांनी अनेक विषयावर आणि सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले.

ती मोठी अट काय?

सुनील तटकरे यांनी गेल्या दोन-चार दिवसातील घडामोडींचा आढावा घेतला. त्यांच्यावर आणि प्रफुल पटेल यांच्यावर होत असलेल्या टीकेवरही मत व्यक्त केलं. सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीवरून त्यांच्यावर होत असलेल्या टीकेचा समाचार घेतला. तर त्याचवेळी तटकरे यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनि‍करणाबाबत मोठे भाष्य केले.

विलीनिकरण हा हायपोथेटीकल दाब आहे. राष्ट्रवादी हा एनडीएचा भाग आहे. मी एक प्रश्न वारंवार विचारत आहे की कुठल्या आणि कोणत्या पक्षाचं कोणत्या पक्षात होणार. पण त्यावर कोणीच उत्तर देत नाही. मला त्यामागील कारणमीमांस कळाली नाही. तर विलीनि‍करणाची ही चर्चा कोण, कुठल्या टप्प्यात सुरू करणार हे पुढे आहे. मी गेल्या दहा महिन्यांपासून हे म्हणच आलोय की, भारतीय जनता पक्षासोबत आम्ही आहोत, हे ज्यांना मान्य असेल तेच विलीनि‍करणाबाबत अथवा सोबत येण्याविषयीची चर्चा करू शकतात. नाहीतर चर्चा करण्याचा काही प्रश्नच नाही. हे जर मान्य असेल तर त्याविषयीच्या चर्चा कधी केव्हा कोण करणार हे मला आता सांगता येणार नाही असे मोठे वक्तव्य सुनील तटकरे यांनी केले.

माझा विरोध आहे की नाही हा मुद्दा अत्यंत गौण आहे. 40 वर्षांपासून मी दादांसोबत काम करत आलो आहे. मी दादांचा विश्वासू सहकारी म्हणून माझ्यावर अनेकदा आक्षेप घेतल्या गेले. उद्या मी त्याला उत्तर देईल. पण विलीनि‍करणाविषयी अजितदादांचा निर्णय झाला असता तर माझा त्याला विरोध असण्याचे कारण नव्हतं, असे तटकरे म्हणाले. दादांना विश्वास नक्की होता तटकरेंना मी सांगेल ते तो मान्य करेल. दादांची आणि माझी चर्चा व्हायची त्यावेळी मी मत मांडायचो.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, पुणे-पिंपरी चिंचवड पालिका एकत्रित लढण्याचा निर्णय झाला.विलीनि‍करणाच्या बाबतीत दादांनी स्पष्ट भूमिका मांडली. दादांनी मला जरुर, तो व्हीडिओ फिरतोय त्या आधी माझी आणि दादांची भेट झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्र लढायचं याबाबत सांगितलं. तर विविध वाहिन्यांवर दोन्ही एकत्र येण्याविषयी दादांनी स्पष्ट भू्मिका मांडल्याची आठवण तटकरे यांनी करून दिली.