AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेल्वे मंत्र्यांचा मोठा निर्णय, मुंब्रा लोकल अपघातानंतर धडा, लोकल डब्यांचे संपूर्ण डिझाईन बदलणार, काय होणार बदल? वाचा

मुंब्रा येथे लोकलमधून पडून चार प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर रेल्वेमंत्र्यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

रेल्वे मंत्र्यांचा मोठा निर्णय, मुंब्रा लोकल अपघातानंतर धडा, लोकल डब्यांचे संपूर्ण डिझाईन बदलणार, काय होणार बदल? वाचा
| Updated on: Jun 09, 2025 | 7:51 PM
Share

मुंब्रा येथे धोकादायक वळणावर दोन लोकल पास होताना तोल जाऊन १३ प्रवासी रुळांवर फेकले गेल्याने त्यातील चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्यानंतर आता रेल्वेमंत्र्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. आता मुंबई उपनगरीय लोकलच्या डब्यांचे संपूर्ण डिझाईनच बदलण्याचा निर्णय रेल्वे मंत्र्यांनी घेतला आहे. कसारा आणि कल्याण लोक पास होताना दारात लटकणारे प्रवासी रुळांवर पडल्याने आता सरकारला जाग आली आहे. काय होणार नेमके बदल वाचा..

ठाण्यापलिकडचा प्रवास दिवसेंदिवस धोकादायक होत आहे. त्यामुळे डोंबिवली, दिवा, मुंब्रा आणि कळवा येथे लोकलमध्ये शिरताना प्रवाशांची दमछाक होत असते. या प्रवासात अनेक प्रवाशांचा हकनाक बळी जात आहे. आज घडलेल्या घटनेत प्रवासी दारात उभे असल्याने कोसळ्याचा रेल्वेचा दावा आहे. परंतू दारात लटकण्याची वेळ प्रवाशांवर नेमकी का येते याचा विचार कोणी करत नाही.आता त्यामुळे रेल्वे मंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे.त्यानुसार लोकलच्या डब्याचे संपूर्ण डिझाईन बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

हे तीन महत्वाचे बदल होणार

मुंबईतील ईएमयू सर्बर्बन लोकलमध्ये बदल करण्यात येणार आहेत. आजच्या मुंब्रा येथील लोकल अपघाताने आता रेल्वे प्रशासनाने मोठा धडा घेतला आहे. नव्या ट्रेनचा लूक नोव्हेंबर २०२५ रोजी तयार होणार असून प्रत्यक्षे सेवेत येण्यासाठी जानेवारी २०२६ रोजी रुळांवर धावू शकणार आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज चेन्नईतील इंटग्रेल फॅक्टरीला भेट दिली आहे. लोकल डब्यांच्या नव्या डिझाईनला मध्ये तीन महत्वाचे बदल होणार आहेत. पहिला बदल म्हणजे दरवाजाला स्वयंचलित दरवाजे असतील, दुसरे म्हणजे कोच रुफ माऊंटेड व्हेन्टीलेशन युनिट असणार आहे. त्यामुळे डब्यात वरच्या भागातून हवा येणार आहे.  तिसरा बदल म्हणजे कोचेसना एकमेकांमधून दुसऱ्या डब्यात जाण्यासाठी लांबपल्ल्यांच्या गाड्यांप्रमाणे व्हेस्टीब्युल गँगवे असणार आहे.

रेल्वे मंत्र्यांनी सहवेदना व्यक्त केली

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या सोबत आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवर  संवाद साधला आहे.  यावेळी मुंब्रा येथे झालेल्या अपघाताबाबत चर्चा करण्यात आली आहे. यावेळी  रेल्वेने याची दखल घेत लोकलच्या फेऱ्या वाढवण्याची सूचना करण्यात आली. लोकलची  फ्रिक्वेंसी वाढवाव्या याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे.  रेल्वे मंत्री  अश्विनी वैष्णव यांनी या घटनेबाबत दु:ख जाहीर केले आहे.

राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.