AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पावसाचा तडाखा! मध्य आणि हार्बर रेल्वे 15 ते 20 मिनिटे उशिराने, स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी

Mumbai Rain Update : मुंबईमध्ये मागील तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस होताना दिसतोय. याचा परिणाम थेट मुंबईच्या लोकलवर झालाय. काल मध्य रेल्वे पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे बघायला मिळाले. आजरी रेल्वे उशिराने धावत आहे.

पावसाचा तडाखा! मध्य आणि हार्बर रेल्वे 15 ते 20 मिनिटे उशिराने, स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी
Mumbai local
| Updated on: Aug 20, 2025 | 7:22 AM
Share

मुंबईसह राज्यामध्ये मागील तीन दिवसांपासून पावसाचा जोर वाढलाय. मुंबईच्या रस्त्यांना नद्यांची स्वरूप आले. काल गुडघ्याभर पाण्यातून रस्ता काढत लोकांना जाण्याची वेळ आली होती. मुसळधार पावसामुळे सलग तिसऱ्या दिवशी मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे. कल्याण स्थानकावर प्रचंड गर्दी बघायला मिळतंय. लोकल गाड्या अर्धा तास उशिराने असल्याने प्रवाशी आणि चाकरमाने संतप्त होताना दिसत आहेत. मध्य रेल्वे कालच्या पावसामध्ये बंद होतील. मुसळधार पावसामुळे अप आणि डाऊन मार्गावरील सर्वच लोकल गाड्या उशिराने धावत आहेत. कल्याण CSMT मार्गावरील गाड्या अर्धा तास उशिराने सुरू असल्याने कल्याण स्थानकावर प्रचंड गर्दी आहे.

मध्य रेल्वे सहहार्बर रेल्वे देखील उशिराने सुरू आहे. सीएसटीकडून पनवेलला जाणाऱ्या लोकल गाड्या 8 ते 10 मिनिटे उशिराने तर पनवेल वरून येणाऱ्या गड्या 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत. तीन दिवसांच्या सतत पावसानंतर, आज थोडीशी विश्रांती पावसाने घेतली आहे. मुंबई उपनगरात सध्या रिमझिम पाऊस सुरू आहे. अंधेरी सबवे देखील सुरू आहे. सकाळची वेळ आहे, पश्चिम द्रुतगती महामार्ग देखील सुरू आहे, पश्चिम रेल्वे देखील वेळेवर धावत आहे.

आज सकाळपासून कमी पाऊस पडल्यामुळे मुंबई उपनगरात कुठेही पाणी साचलेले नाही. परंतु हवामान विभागाने आजही अलर्ट जारी केला आहे आणि मुंबईसह उपनगरात पावसाचा इशारा दिला आहे. ठाणे ते वाशी अप आणि डाऊन लोकल सात ते आठ मिनिटे उशिराने धावत आहेत. ठाणे मध्य रेल्वे दहा मिनिटे उशिरा धावत आहे. पश्चिम रेल्वेमध्ये, विरार ते चर्चगेट ही ट्रेन थोडी उशिराने धावत आहे. विरार ते चर्चगेट गाड्या 5 ते 10 मिनिटे उशिराने धावत आहेत. बोरिवली ते चर्चगेट ही ट्रेन देखील ५ मिनिटे उशिराने धावत आहे.

तीन दिवसांच्या सतत पावसानंतर, पावसाने आज थोडीशी विश्रांती घेतली आहे. मात्र, वीरा देसाई रोड वरती अजून ही पाणी साचलेले आहे पाण्याचा निचरा झालेला नाही. रीप रीप पावसाला सुरवात झाली आहे, येथे वाहतूक सुरु आहे वाहतूक कुठे ही विस्कळीत झालेली नाही. हवामान विभागाने मुंबईत आजही रेड अलर्ट जारी केला आहे आणि मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.