AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनसे आणि भाजपनं एकत्र आलं पाहिजे असं वाटतं का? राज ठाकरेंनी मनातलं सांगून टाकलं!

राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटासोबत युतीबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे, त्यानंतर आता चर्चेला उधाण आलं आहे, मात्र दुसरीकडे त्यांनी यावेळी आपली भाजपबाबतची भूमिका देखील स्पष्ट केली आहे.

मनसे आणि भाजपनं एकत्र आलं पाहिजे असं वाटतं का? राज ठाकरेंनी मनातलं सांगून टाकलं!
| Updated on: Apr 19, 2025 | 6:10 PM
Share

महेश मांजरेकर यांना दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी विविध विषयांवर आपली भूमिका व्यक्त केली आहे. शिवसेना ठाकरे गटासोबत युतीसंदर्भात त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची युती होऊ शकते अशी चर्चा आता सुरू झाली आहे. दरम्यान यावेळी त्यांना भाजपसोबत युती व्हावी असं वाटतं का? असाही प्रश्न विचारण्यात आला होता, या प्रश्नाला उत्तर देताना भाजपसोबत जाणं हे राजकीय होईल, पण राजकारणात कधी काय घडेल सांगता येत नाही, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले राज ठाकरे? 

मी मराठी माणसाबद्दल बोलू शकतो, भाजपसोबत जाणं राजकीय होईल, सर्वच भूमिका जुळतील असं नाही. पण राजकारणात कधी काय घडेल सांगता येत नाही. उद्या एकमेकांना हात जोडले जातील, हात मिळवले जातील, नमस्कार केला जाईल.  राजकारणात सर्वच गोष्टीला वेग आला आहे. कधी काय घडेल सांगता येत नाही, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, विचारधारेत फरक आहे. महाराष्ट्र हडपण्याचा प्रकार चारही बाजुने सुरू आहे. त्यावर मी जेव्हा बोलेन तेव्हा हे सर्व पक्ष मला किती साथ देतील ते  माहीत नाही. राजकीय अ‍ॅडजस्टमेंट या वेगळ्या गोष्टी आहेत, असं राज ठाकरे यांंनी यावेळी म्हटलं आहे.

शिवसेना ठाकरे गटासोबत युतीची चर्चा  

महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना राज ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे पुन्हा एकत्र येणार का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता, या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी म्हटलं की,  “या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं, वाद या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत. एकत्र येणं, एकत्र राहणं, ही काही कठीण गोष्ट आहे, असं मला वाटत नाही”  असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे, राज ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर आता मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची युती होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा