दुबे तुमको हम समंदर दुबे दुबे के मारेंगे, राज ठाकरे कडाडले
राज ठाकरे यांची तोफ आज मीरारोड येथे धडाडली. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात हिंदी सक्तीच्या मुद्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका तर केलीच परंतू भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांचाही समाचार घेतला आहे.

राज ठाकरे यांनी मीरारोडच्या सभेत मराठी माणूस आणि महाराष्ट्राबद्दल गैरउद्गगार काढणाऱ्या भाजपा खासदार निशिकांत दुब यांच्यावर कठोर भाषेत टीका केली. राज ठाकरे म्हणाले भाजपाचा तो खासदार दुबे की कोण त्याने महाराष्ट्राबद्दल मराठी माणसाबद्दल इतके वक्तव्य केले त्याच्यावर गुन्हा दाखल झाला की नाही याचा हे हिंदी चॅनलवाले पाठपुरवा करणार नाहीत. मी काही बोललो की लगेच आता चालू करतील राज ठाकरेने उगला जहर असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.
राज ठाकरे यावेळी म्हणाले की भाजपाचा तो खासदार दुबे की कोण त्याने महाराष्ट्राबद्दल मराठी माणसाबद्दल इतके वक्तव्य केले त्याच्यावर गुन्हा दाखल झाला की नाही याचा हे हिंदी चॅनलवाले पाठपुरवा करणार नाहीत. मी काही बोलला की लगेच आता चालू करतील राज ठाकरेने उगला जहर असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.
तुम्ही सतर्क असले पाहिजे. आज काही तरी प्रकरण उसळलं आणि आज जागं व्हायचं आणि नंतर झोपायचं. सगळं पोखरंल जातं. भुसभुशीत जमीन असते तिथे घुशी होतात. खडकावर होत नाही. तुम्ही खडकासारखे टणक व्हा अशा भाषेत राज ठाकर यांनी उपस्थितांना आवाहन केले. ते पुढे म्हणाले की महाराष्ट्राची बाजू समजून घेतली पाहिजे. सव्वाशे वर्ष राज्य केलं आहे. पर्शियन लोक याला हिंद प्रांत म्हणत. महाराजांची घोषणा काय होती. हे हिंदूवी स्वराज्य व्हावे ही नव्हती. हिंदवी स्वराज्य व्हावं ही होती असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.
तो महाराष्ट्र हतबल आहे
हिंद प्रांत आमचा असावा. कुणी सरकार स्थापन करू नये. आम्ही राज्य करणार. आम्ही कुणाचे गुलाम राहणार नाही. मराठीशाहीने राज्य केलं. अटकेपार झेंडे फडकावले. तिथपर्यंत पोहोचले होते मराठे. तो महाराष्ट्र हतबल आहे. तो महाराष्ट्र भिका मागत आहे. तुम्ही या महाराष्ट्राचे राजे. तुम्ही या महाराष्ट्राचे मालक ना असे सांगतानाच राज म्हणाले की,’ बाकीचे लोकं बाहेरून आली. त्यांच्यासमोर आम्ही हतबल होणार आणि नही नही भाई…का? स्वतहून काही करायची गरज नाही. पण अशा प्रकारे माज घेऊन कोणी आला तर ठेचायचा म्हणजे ठेचायचा. भाजपचा कोण तरी दुबे नावाचा खासदार काय बोलला. पटक पटक के मारेंगे म्हणाला. झाली का त्याच्यावर केस. हिंदी चॅनलने चालवलं का. काही नाही. कसे असतात ते पाहा. तु आम्हाला पटक पटक के मारणार. दुबे. दुबेलाच सांगतो. दुबे, तुम मुंबई में आ जाव. मुंबई के समुंदर में दुबे दुबे कर मारेंगे’
