डेलकर आत्महत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे द्या; शिवसेना खासदार गावितांचं मुख्यमंत्र्यांना पत्रं

खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे द्यावा आणि डेलकर यांची सुसाईड नोट सार्वजनिक करावी, अशी मागणी शिवसेनेचे पालघरमधील खासदार राजेंद्र गावित यांनी केली आहे. (rajendra gavit demands CID probe in mohan delkar suicide case)

डेलकर आत्महत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे द्या; शिवसेना खासदार गावितांचं मुख्यमंत्र्यांना पत्रं
राजेंद्र गावित, खासदार, शिवसेना
Follow us
| Updated on: Mar 08, 2021 | 7:33 PM

पालघर: खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे द्यावा आणि डेलकर यांची सुसाईड नोट सार्वजनिक करावी, अशी मागणी शिवसेनेचे पालघरमधील खासदार राजेंद्र गावित यांनी केली आहे. गावित यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. (rajendra gavit demands CID probe in mohan delkar suicide case)

टीव्ही 9 मराठीशी बोलताना राजेंद्र गावित यांनी याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना पत्रं लिहिल्याचं म्हटलं आहे. मोहन डेलकर यांच्या कामात प्रशासनाने अडथळा आणला होता. त्यामुळे ते मानसिक तणावात होते. या नैराश्यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप गावित यांनी केला आहे. डेलकर यांचा मृत्यू संशयास्पद आहे. त्यामुळे राज्य सरकारने उच्च स्तरीय समिती नेमावी किंवा सीआयडी मार्फत या प्रकरणाची चौकशी करमअयात यावी, असं गावित यांनी म्हटलं आहे.

डेलकरांवर दडपण होते

डेलकर हे आदिवासी समाजाचे होते. आदिवासी समाजहितासाठी त्यांनी नेहमीच प्रयत्न केले. आदिवासी समजाला हक्क मिळवून देण्यातही त्यांचा हातखंडा होता. अशा स्थितीत ते करीत असलेल्या कार्याला प्रशासनाने अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याने दडपण, मानसिक तणाव व नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट होत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सार्वत्रिक करावी दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गावित यांनी या पत्रातून केली आहे.

थोरात घटनाबाह्य काम करत आहेत

दरम्यान, आदिवासींच्या जमिनींचं बिगर आदिवासींकडे मोठ्या प्रमाणवर हस्तांतरण होत असल्याबद्दल गावित यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केली आहे. थोरात हे घटनाबाह्य काम करत असल्याचा आरोप गावित यांनी केला आहे. महाराष्ट्रात आदिवासी जमीन बंदी हस्तांतरणाचा कायदा असतानाही राज्यात मुंबई, ठाणे, पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणावर आदिवासींचे जमिनीचे हस्तांतरण बिगरआदिवासींकडे होत असून त्याला महसूल मंत्री परवानग्या देत असल्याचा गंभीरही त्यांनी केला आहे. थोरात यांनी सुमारे एक हजाराच्या आसपास अशा प्रकारच्या परवानग्या दिल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

युतीच्या काळात असं घडत नव्हतं

मुंबई, ठाणे, पनवेल भागात जमिनींना सोन्याचे भाव आले आहेत. त्यामुळे आदिवासी समाजाच्या जमिनींना मागणी वाढली असून थोरात घटनाबाह्य रितीने काम करत आहेत. सेना-भाजपचे सरकार असताना अशा प्रकारच्या परवानग्या दिल्या जात नव्हत्या, आता सरसकट परवानगी महसूल खाते देत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. थोरात यांनी दिलेल्या सर्व प्रकरणांची मुख्यमंत्र्यांनी तपासणी करून योग्य ती करवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. (rajendra gavit demands CID probe in mohan delkar suicide case)

संबंधित बातम्या:

पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

खामोश!! पहिल्याच रॅलीत ही भाषा शोभत नाही, शत्रुघ्न सिन्हांनी मिथुनला सुनावलं

भाजप खासदार राजेंद्र गावितांचा सेनेत प्रवेश, पालघरमधून उमेदवारी

(rajendra gavit demands CID probe in mohan delkar suicide case)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.