रामदास कदमांच्या ‘त्या’ ऑडिओ क्लिपनंतर शिवसेनेत खळबळ, आता प्रसाद कर्वे, वैभव खेडेकर यांची पहिली प्रतिक्रिया

| Updated on: Oct 02, 2021 | 5:48 PM

अनिल परब यांना अडचणीत आणण्यासाठी शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी मटेरियल पुरविल्याचा दावा केला जातोय. या दाव्याची पुष्टी करण्यासाठी काही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. आता या प्रकरणात मनसे नेते वैभव खेडेकर तसेच आरटीआय कार्यकर्ते प्रसाद कर्वे ही दोन नावे समोर येत आहेत. या दोघांनीही टीव्ही 9 मराठीला प्रतिक्रिया दिली आहे.

रामदास कदमांच्या त्या ऑडिओ क्लिपनंतर शिवसेनेत खळबळ, आता प्रसाद कर्वे, वैभव खेडेकर यांची पहिली प्रतिक्रिया
prasad karve vaibhav khedekar
Follow us on

मुंबई : शिवसेना नेते अनिल परब यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. अनिल परब अडचणीत आलेले असताना आता एक खळबळजनक माहिती समोर येत आहे. अनिल परब यांना अडचणीत आणण्यासाठी शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी मटेरियल पुरविल्याचा दावा केला जातोय. या दाव्याची पुष्टी करण्यासाठी काही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. आता या प्रकरणात मनसे नेते आणि खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर तसेच आरटीआय कार्यकर्ते प्रसाद कर्वे ही दोन नावे समोर येत आहेत. या दोघांनीही टीव्ही 9 मराठीला प्रतिक्रिया दिली आहे.

क्लिप समाजमाध्यमांवर येत आहेत त्यात तथ्य- खेडेकर  

वैभव खेडेकर यांनी रामदास कदम यांनी प्रसाद कर्वे यांच्या माध्यमातून अनिल परब यांच्या रिसॉर्टबाबत माहिती मिळवली. तसेच नंतर ती किरीट सोमय्या यांना पुरवली गेली असा गंभीर आरोप केलाय. यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. “अनिल परब आणि हे प्रकरण समाज माध्यमांवर यापूर्वीच आलेलं आहे. आता या संदर्भातील संभाषण ते माझं नसल्याचं म्हणत असतील. तर त्याबाबत फॉरेन्सिक तपास करावा. दुसरी गोष्ट म्हणजे जे प्रसाद कर्वे नामक माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत. त्यांनी आपल्या ऑडिओ क्लीप चोरीला गेल्याच्या पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. दुसरीकडे हे म्हणतात की त्या ऑडिओ क्लीप माझ्या नाहीत. यातच सगळा गौडबंगाल आहे. किरीट सोमय्या कोकणात येऊन उद्योजकांवर माहितीचा अधिकार टाकतात, सर्व माहिती मिळवतात. त्यांना स्थानिकांची साथ असल्याशिवाय ते एवढी मोठी डेअरिंग करुच शकत नाहीत. म्हणून मला म्हणायचंय शिवसेना आणि भाजपमध्ये सख्य नाहीय. त्यामुळे या ज्या क्लिप समाजमाध्यमांवर येत आहेत त्यांच्यात काहितरी तथ्य आहे, असे वैभव खेडेकर म्हणाले आहेत.

 माहितीचा अधिकार प्रसाद कर्वे यांनीच टाकला- खेडेकर

तसेच पुढे बोलताना “मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय अनिल देशमुख यांना अडचणीत टाकून मुख्यमंत्र्यांच्याच खुर्चीला धक्का पोहोचवण्याचं कृत्य करत आहेत. हे चूक आहे. आपल्याच पक्षाचा माणूस आपल्याच मंत्र्याच्या माणसाची अशा पद्धतीने माहिती काढून किरीट सोमय्यांना माहिती पुरवतो, हे बरोबर नाही. हे कोण करतंय, कोण नाही करत ते आमच्या विधानसभा क्षेत्रात, कोकणात सगळ्यांना माहिती आहे. वेगळं सांगण्याची गरज नाही. रामदास कदम नाकारत असतील तरी जे खरंय ते समोर आलेलं नाही. त्यांनी माहितीचे अधिकार जे टाकले आहेत ते सुद्धा प्रसाद कर्वे यांनीच टाकले आहेत. माझ्याकडे कागदपत्रे आहेत, अशी प्रतिक्रिया मनसेचे नेते वैभव खेडेकर यांनी दिलीय.

ज्यांनी राजकारणात उभं केलं, त्यांच्याविरोधातच पोटशूळ- प्रसाद कर्वे 

तर दुसरीकडे प्रसाद कर्वे यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.  “खेड नगरपरिषदेच्या भ्रष्टाचाराबाबत नगराध्यक्षांनी जे घोळ केलेले आहेत, मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे. तो भ्रष्टाचार मी माहिती अधिकारात काढला. त्यांनंतर कायदेशीरपणे त्यांना अपात्र करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे नगरसेवकांद्वारे प्रस्ताव दिले. रामदास कदम आणि त्यांचे पुत्र कोट्यवधीचा निधी आणत असल्याने वैभव खेडेकर त्यांच्यावर वारंवार गंभीर आरोप करत आहेत. ज्यांनी त्यांना गुरु म्हणून राजकारणात उभं केलं त्यांच्याविरोधात त्यांचा पोटशूळ आहे,” असे प्रसाद कर्वे म्हणाले.

रामदास कदम आणि कर्वे यांच्यातील कथित संभाषणाच्या ऑडिओ क्लिप व्हायरल 

शिवसेनेचे नेते रामदास कदम आणि प्रसाद कर्वे नावाच्या व्यक्तिच्या तीन कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. या तिन्ही क्लिपमधून रामदास कदम यांनीच भाजप नेते किरीट सोमय्या यांना परिवहन मंत्री अनिल परब विरोधातील दारुगोळा पुरावल्याचं दिसून येत आहे. मात्र, रामदास कदम यांनी या ऑडिओ क्लिप फेक असल्याचं सांगत या संभाषणाशी आपला काहीच संबंध नसल्याचं म्हटलं आहे. तसेच हा आपल्या बदनामीचा कट असल्याचंही म्हटलं आहे. मात्र, या तीन ऑडिओ क्लिपमुळे एकच खळबळ उडाली असून शिवसेना काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

इतर बातम्या :

Maharashtra News LIVE Update | अनिल परब प्रकरणात रामदास कदमांनी किरीट सोमय्याने रसद पुरवली का? ऑडिओ क्लीपने खळबळ

शिवसेनेत भूकंप? परबांच्याविरोधात ईडीची कारवाई, रामदास कदम म्हणतात, वाहवा वाहवा, ऑडिओ क्लिप व्हायरल

Samantha-Naga Chaitanya Divorce | ‘आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे…’, समंथा-नागा चैतन्यने केली घटस्फोटाची घोषणा!

(ramdas kadam and prasad kave audio clip went viral fist comment of vaibav khedeka and prasad karve on)