Maharashtra News LIVE Update | समुद्रात प्रवासी बोटीत सुरु असलेल्या ड्रग्ज पार्टीवर एनसीबीची कारवाई

| Updated on: Oct 03, 2021 | 12:59 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | समुद्रात प्रवासी बोटीत सुरु असलेल्या ड्रग्ज पार्टीवर एनसीबीची कारवाई
ब्रेकिंग न्यूज लाईव्ह अपडेटस

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 02 Oct 2021 09:15 PM (IST)

    समुद्रात प्रवासी बोटीत सुरु असलेल्या ड्रग्ज पार्टीवर एनसीबीची कारवाई

    मुंबईत एनसीबीने मोठी कारवाई केली आहे. एनसीबीने प्रवासी बोटीत सुरु असलेल्या ड्रग्ज पार्टीवर कारवाई केली आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. एनसीबीचे झोनल डिरेक्टर समीर वानखेडे यांनी ही कारवाई केली आहे. बोट समुद्राच्या मध्यभागी जाताच ही कारवाई केली आहे. एनसीबीने ड्रग्ज विकणाऱ्यांनाही ताब्यात घेतलं आहे

  • 02 Oct 2021 08:07 PM (IST)

    पीक विम्याबाबत अनेक तक्रारी, शेतकऱ्यांवर अन्याय : देवेंद्र फडणवीस

    विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :

    ज्येष्ठ लेखक द मा मिरासदार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अतिवृष्ठीमुळे मराठवाड्यात भीषण नुकसान, शेतकऱ्यांचे दुःख जाणून घेण्यासाठी, सरकारी यंत्रणा जागी व्हावी यासाठी दरेकर यांच्यासह मी दौरा करतोय काल यवतमाळ, आज वाशिम, हिंगोली नांदेडचा दौरा अतिवृष्टीमुळे 100 टक्के सोयाबीन गेलंय शेतकऱ्यांच्या हाथी काही लागेल असे वाटत नाही, सफाई करणं जड जाणार आहे तूर देखील पिवळी पडलीय, कापूस काळा पडलाय, काही भागात उसाचे नुकसान खरीपाचे प्रमुख पिकांचे अतोनात नुकसान पंचनामे करायाला कुणी आलं नाही- शेतकऱ्यांच्या तक्रारी गतवर्षी अतिवृष्ठी अवर्षण त्याचे पैसे मिळाले नाही विमा देखील मिळाला नाही वीज कापण सुरू आहे, दुहेरी मार शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय कर्जमाफी मिळाली नाही, प्रोत्साहन अनुदान मिळालं नाही लोक स्पष्टपणे सांगत होते की तुमच्या काळात पैसे मीळाले आता मात्र कुठलीही मदत नाही त्यामुळे आक्रोश दिसून येतोय पंचनामे करण्याचे सोपस्कार करू नये नजर आणेवारीत कमी नुकसान दाखबलय नदीकाठच्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश , हे अन्यायकारक आहे हे नियम शिथिल केले पाहिजेत, सरकारने या संदर्भात मदत केली पाहिजे आमच्या काळात 800/400 कोटी चा विमा मराठवाड्याला मिळाला, तरीही मोर्चे काढण्याची भाषा

    पीक विम्याबाबत अनेक तक्रारी, शेतकऱ्यांवर अन्याय सरसकट नुकसान भरपाई, चांगल्या प्रकारे द्यावी ही मागणी Ndrf च्या निकषाच्या बाहेर जाऊन आम्ही मदत केली मराठवाडा/ विदर्भा बाबत सरकार उदासीन वैधानिक विकास महामंडळाचा मुडदा पाडला गेल्या 5 वर्षात आम्ही शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापले नाहीत तात्काळ मदत द्यावी ही आमची मागणी सरकारच्या बोलणं आणि कृतीत फरक जे घोषित केले ते ही देत नाहीत राज्य सरकारला आमची मागणी कर्ज वसुली थांबवली पाहिजे दुष्काळात ज्या योजना राबवतो त्या आता ओला दुष्काळ समजून राबवाव्यात नियमित अधिवेधन 2 दिवसाचे होते अधिवेशनाची मागणी करून उपयोग नाही

  • 02 Oct 2021 07:53 PM (IST)

    ज्येष्ठ लेखक द मा मिरासदार यांचे निधन, शरद पवारांकडून शोक व्यक्त

    मराठीतले विनोदी लेखक व कथाकथनकार द मा मिरासदार यांचे निधन झालं आहे. त्यांच्या निधनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. "प्राध्यापक द मा मिरासदार यांचे निधन वृत्त समजले अतिशय दुःख झाले. मराठीतील एक अतिशय नामवंत लेखक, मराठीचे प्राध्यापक, कथाकथनकार म्हणून महाराष्ट्राला त्यांची ओळख होती.शंकर खंडू पाटील, व्यंकटेश माडगूळकर आणि मिरासदार सर यांचे कथा कथनकाचे कार्यक्रम अनेक वेळा पाहण्याचा योग आला त्यातील मजा ही काही औरच होती. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली मी बरीच पुस्तके वाचली भोकरवाडीच्या गोष्टी, फुकट, बेंडबाजा, मिरासदारी, भुताचा जन्म, माझ्या बापाची पेंड, अशा अनेक पुस्तकांचा समावेश करावा लागेल. 14 एप्रिल आंबेडकर जयंतीच्या दिवशी 1927 साली त्यांचा जन्म झाला आज 94 व्या वर्षी ते आपल्याला सोडून गेले. गेली अनेक वर्ष ते सार्वजनिक जीवनात दिसले नाहीत. प्राध्यापक मिरासदार सरांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली", अशा शब्दात शरद पवार यांनी शोक व्यक्त केला.

  • 02 Oct 2021 07:07 PM (IST)

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे स्थगित झालेल्या मुबंईतील स्थानिक क्रिकेट स्पर्धा पुन्हा सुरू होणार

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे स्थगित झालेल्या मुबंईतील स्थानिक क्रिकेट स्पर्धा पुन्हा सुरू होणार

    9 ऑक्टोबर पासून मुंबईत क्रिकेट स्पर्धा सुरू होणार

    तालीम शिल्डने मुंबईतील क्रिकेट हंगामाला सुरूवात होणार

    मुंबई क्रिकेट संघटनेच्या अपेक्स कौन्सिलच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला निंर्णय

    मुंबई क्रिकेटच्या आउटडोअर आणि इनडोअर अॅक्टिव्हिटीसाठी जनरल मॅनेजरची नियुक्ती केली जाणार

    जनरल मॅनेजर पदासाठी भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीचे नाव स्पर्धेत

  • 02 Oct 2021 07:03 PM (IST)

    राज्यात दिवसभरात 2696 नवे कोरोनाबाधित, 3062 रुग्णांची कोरोनावर मात

    राज्यात दिवसभरात 2696 नवे कोरोनाबाधित, 3062 रुग्णांची कोरोनावर मात, दिवसभरात 49 बाधितांचा मृत्यू, राज्यातील रग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.27 टक्क्यांवर

  • 02 Oct 2021 05:11 PM (IST)

    मंत्रिपद न मिळाल्याने रामदास कदमांचा हा पराक्रम : संजय कदम

    दापोलीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम यांची प्रतिक्रिया : 

    कोकणात खरंतर किरीट सोमय्यांचा भागच नव्हता. पण पक्षांतर्गत तक्रारी करुन आपण पाठीशी राहून कशा तक्रारी पुढे करता येतील, तो मी नव्हेच अशा भूमिकेत रामदास परब वावरले. राजकीय दृष्ट्या अनिल परब यांना कसं अडचणीत आणता येईल यासाठी त्यांनी किरीट सोमय्यांना गाठलं. मंत्रिपद न मिळाल्याने रामदास कदमांनी हा पराक्रम केला. आम्ही हा त्यांचा पराक्रम महाविकास आघाडीच्या नेतृत्वाला सांगितलं आहे. कोकणाच्या मुळावर येऊन अशा पद्धतीने कृत्य करत असतील तर आम्ही सर्व कोकणवाशी एक होऊन या प्रवृत्तीचा जाहीर निषेध करतो.

  • 02 Oct 2021 05:04 PM (IST)

    वैभव खेडेकर यांच्यात रामदास कदम यांच्याबाबत पोटशूळ : प्रसाद कर्वे

    प्रसाद कर्वे यांची प्रतिक्रिया :

    खेड नगरपरिषदेच्या भ्रष्टाचाराबाबत नगराध्यक्षांनी जे घोळ केलेले आहेत, मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे. तो भ्रष्टाचार मी माहिती अधिकारात काढला. त्यांनंतर कायदेशीरपणे त्यांना अपात्र करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे नगरसेवकांद्वारे प्रस्ताव दिले. रामदास कदम आणि त्यांचे पुत्र कोट्यवधीचा निधी आणत असल्याने वैभव खेडेकर त्यांच्यावर वारंवार गंभीर आरोप करत आहेत. ज्यांनी त्यांना गुरु म्हणून राजकारणात उभं केलं त्यांच्याविरोधात त्यांचा पोटशूळ आहे.

  • 02 Oct 2021 04:56 PM (IST)

    जे खरंय ते समोर आलेलं आहे : वैभव खेडेकर

    वैभव खेडेकर यांची प्रतिक्रिया :

    हे प्रकरण समाज माध्यमांवर यापूर्वीच आलेलं आहे. आता या संदर्भातील संभाषण ते माझं नसल्याचं म्हणत असतील. तर त्याबाबत फॉरेन्सिक तपास करावा. दुसरी गोष्ट म्हणजे जे प्रसाद कर्वे नामनक माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत त्यांनी आपल्या ऑडिओ क्लीप चोरीला गेल्याच्या पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. दुसरीकडे हे म्हणतात की त्या ऑडिओ क्लीप माझ्या नाहीत. यातच सगळा गौडबंगाल आहे. किरीट सोमय्या कोकणात येऊन उद्योजकांवर माहितीचा अधिकार टाकतात, सर्व माहिती मिळवतात, त्यांना स्थानिकांची साथ असल्याशिवाय ते एवढी मोठी डेअरिंग करुच शकत नाहीत. म्हणून मला म्हणायचंय शिवसेना आणि भाजपमध्ये सौख्य नाहीय. त्यामुळे या ज्या क्लिप समाज माध्यमांवर येत आहेत त्यांच्यात काहितरी तथ्य आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय अनिल देशमुख यांना अडचणीत टाकून मुख्यमंत्र्यांच्याच खुर्चीला धक्का पोहोचवण्याचं कृत्य होतंय. हे चूक आहे. आपल्याच पक्षाचा माणूस आपल्याच मंत्र्याच्या माणसाची अशा पद्धतीने माहिती काढून किरीट सोमय्यांना माहिती पुरवतंय, हे बरोबर नाही. हे कोण करतंय, कोण नाही करत ते आमच्या विधानसभा क्षेत्रात, कोकणात सगळ्यांना माहिती आहे. वेगळं सांगण्याची गरज नाही. रामदास कदम नाकारत असतील तरी जे खरंय ते समोर आलेलं नाही. त्यांनी माहितीचे अधिकार जे टाकले आहेत ते सुद्धा प्रसाद कर्वे यांनीच टाकले आहेत. माझ्याकडे कागदपत्रे आहेत.

  • 02 Oct 2021 04:45 PM (IST)

    माझ्या बदनामीचा कट, खोट्या ऑडिओ क्लीप व्हायरल करुन बदनामी : रामदास कदम

    कथित ऑडियो क्लीप व्हायरल प्रकरणी रामदास कदम यांची प्रतिक्रिया :

    विधानसभा निवडणुकीच्यावेळी देखील माझ्या आवाजाच्या ऑडिओ क्लीप बनवून व्हायरल करण्यात आल्या होत्या. त्या ऑडिओ क्लीपमध्ये मी मुस्लिम समुदायाला शिवीगाळ करत असल्याचा दावा करण्यात आला होता. गेल्या दोन महिन्यांमध्ये दहावेळा या विषयावर पत्रकार परिषदा घेतल्या आहेत. त्यांनी माझ्यावर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी मी अब्रुनुकसाणीचा दावा टाकलेला आहे. प्रसाद कर्वेसोबत माझा कुठलाही संबंध नाही. किरीट सोमय्यांशी माझा कुठलाही संबंध नाही. उलटपक्षी जो मुलगा आहे तो वैभव खेडेकरांच्या जवळचा कार्यकर्ता आहे. त्या दोघांनी मिळून हे केलं की काय? असं मला वाटत आहे. अनिल परब यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत. मी शिवसेनेचा नेता आहे. त्याची मला पूर्णपणे जाणीव आहे. आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. माझा मुलगा तिथे आमदार आहे. संजय कदम यांना पाडून तो आमदार बनलेला आहे. मी या गोष्टीचा निषेध करतो. हे पाप आहे. ते माज्या हातून घडणार नाही. खोट्या क्लीप व्हायरल करुन मला बदनाम करण्याचे प्रयत्न अनेकदा झाले होते. रामदास कदम बोलल्यानंतर मोठी प्रसिद्धी मिळते.

    याच्याआधीही माझी बदनामी झाल्याचा दावा मी ठोकलाय. आता पुन्हा मी न्यायालयात जाणार आहे. किरीट सोमय्या यांच्याशी आमचा दुरान्वयेही संबंध नाही. मी पाठीत खंजीर खुपसणारा नाही. विधानसभा निवडणुकीच्यावेळी देखील अशा क्लीप व्हायरल करुन बदनाम केलं गेलंय. मी दोनदा पत्रकार परिषदा घेऊन मंत्रीपद स्वीकारणार नाही, असं जाहीर केलं होतं. माझी कोणतीही नाराजी नाही. खोट्या क्लीप बनवून मला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. या प्रकरणावरुन मी कदाचित एक-दोन दिवसात उद्धव ठाकरे यांना भेटू.

  • 02 Oct 2021 04:19 PM (IST)

    अनिल परब प्रकरणात रामदास कदमांनी किरीट सोमय्याने रसद पुरवली का? ऑडिओ क्लीपने खळबळ

    अनिल परब प्रकरणात रामदास कदमांनी रसद पुरवली का? रामदास कदम यांची कथित ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल, त्यामुळे कदमांनीच भाजप नेते किरीट सोमय्या यांना कागदपत्रे पुरवली का? संबंधित ऑडिओ क्लीपची पुष्टी टीव्ही 9 मराठी करत नाही

    शिवसेनेत भूकंप येईल अशी ऑडिओ क्लिप आज व्हायरल झालीय. अनिल परबांच्याविरोधात सर्व मटेरीयल हे रामदास कदम यांनीच पुरवल्याचा आरोप मनसेच्या स्थानिक नेत्यानं केला होता. त्यावर शिक्कामोर्तब होईल अशा पद्धतीची ऑढिओ क्लिप व्हायरल झालीय. टीव्ही ९ मराठी ह्या क्लिपची पुष्टी करत नाही. पण ज्या दोन ते तीन ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यात त्यात, परबांच्याविरोधात जी ईडीनं कारवाई केली त्यावर कदम वाह वाह म्हणताना दिसत आहेत. एवढच नाही तर प्रसाद कर्वे हा रामदास कदमांचा कार्यकर्ता एकाच वेळेस कदम आणि सोमय्यांच्या संपर्कात होता असंही दिसतंय

  • 02 Oct 2021 03:20 PM (IST)

    दिल्ली विमानतळावरुन एका बांग्लादेशीला बनावट कागदपत्रांसह अटक

    मुंबई एटीएसकडून एका बांगलादेशीला अटक करण्यात आली आहे. दिल्ली विमानतळावरुन ही अटक करण्यात आली आहे. बनावट भारतीय कागदपत्रांसह ही अटक झाली आहे.

  • 02 Oct 2021 03:15 PM (IST)

    पुराच्या पाण्यातून दुचाकी घालणे बेतले जीवावर, वाहून जाणाऱ्या तरुणाला वाचवण्यात नागरिकांना यश

    औरंगाबाद :

    पुराच्या पाण्यातून दुचाकी घालणे बेतले जीवावर

    पुराच्या पाण्यात पडून दुचाकीस्वार गेला वाहून

    पुलाच्या एका बाजूने पडलेला तरुण पाईपमधून निघाला दुसऱ्या बाजूला

    औरंगाबादच्या पिसादेवी परिसरातली घटना

    वाहून जाणाऱ्या तरुणाला वाचवण्यात नागरिकांना यश

  • 02 Oct 2021 02:46 PM (IST)

    नुकसानीची पाहणी करण्यासाठी मंत्री अशोक चव्हाण थेट तेलंगणा राज्याच्या सीमेवर पोहोचले

    नांदेडमध्ये पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मंत्री अशोक चव्हाण थेट तेलंगणा राज्याच्या सीमेवर पोहोचले. सीमावर्ती भागातील नागरिकांना गोदावरी नदीच्या पुराचा मोठा फटका बसलाय, या लोकांना भेटून मंत्री चव्हाण यांनी त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. यावेळी मंत्री चव्हाण यांच्यासोबत जिल्हा परिषद तथा अन्य पदाधिकारी उपस्थित आहेत. मंत्री चव्हाण आज दिवसभर जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करतायत.

  • 02 Oct 2021 02:03 PM (IST)

    देवेंद्र फडवणीस आणि प्रविण दरेकर हिंगोलीत दाखल

    हिंगोली -

    देवेंद्र फडवणीस आणि प्रविण दरेकर हिंगोलीत दाखल

    तालुक्यातील कनेरगाव नाका शिवारात दाखल

    शिवारातील नुकसान ग्रस्त भागांची करत आहेत पाहणी

  • 02 Oct 2021 02:03 PM (IST)

    दिल्लीत काही लोकांच्या गाठीभेटी नंतर सिंधुदुर्गातील शासकीय मेडिकल कॉलेजला त्रुटी दाखवून नामंजूर केलं

    सिंधुदुर्ग -

    दिल्लीत काही लोकांच्या गाठीभेटी नंतर सिंधुदुर्गातील शासकीय मेडिकल कॉलेजला त्रुटी दाखवून नामंजूर केलं

    खासदार विनायक राऊत यांचा नारायण राणेवंर नाव न घेता रोख

    सिंधुदुर्गातील शासकीय मेडिकल कॉलेजला 17 तारीखला केंद्रीय एनएमसी कमिटी मान्यता देते आणि लगेच दोन दिवसात 21 तारीखला जुनियर कमिटी त्रुटी दाखवून मान्यता नामंजूर करते

    या दोन दिवसात काही लोकांच्या दिल्लीत झालेल्या गाठीभेटीतून झालेला प्रकार असून चांगल्या कामात काड्या घालण्याचा हा प्रकार

    स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी स्वतःचा कॉलेजवर गंडांतर येणार आहे. त्यामुळे त्यांनी काड्या घालण्याचा प्रयत्न केला आहे. काड्या घालायच्या तर त्यानी घालू दे माञ आम्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोणत्याही परिस्थितीत मंजूर करून घेणार म्हणजे घेणारचं

  • 02 Oct 2021 12:42 PM (IST)

    सुरत-अहमदनगर-सोलापूर असा ग्रीनफिल्ड रस्ता तयार करणार आहोत - गडकरी

    आम्ही ब्रिज कमी बंधारे बांधायला सुरू केली आहे

    30 मीटर वरून आम्ही पिलर 120 मीटर वर नेला आहे. त्यामुळे पुलाच्या पिलर ची लांबी वाढली

    दिलीप गांधी हे नाहीत याची मला सातत्याने अटजावन होत आहे. त्यांनी या कामासाठी खूप चकरा मारल्या

    लँड अकविजेजेशनचा प्रॉब्लेम या जिल्ह्यात खुप आहे. आणखी लागले तर पैसे देतो पण हा प्रॉब्लेम सोडवावा

    सुरत अहमदनगर सोलापूर असा ग्रीनफिल्ड रस्ता तयार करणार आहोत, पूर्ण ग्रीनरी रोडच्या बाजूने असणार आहोत

    सुरत नाशिक अहमदनगर आकाळकोट कळणार बेंगलोर असा हा रस्ता होणार आहे

    हा रस्ता अहमदनगर जिल्ह्यातून 180 किलोमीटर जाणार आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्हा मेन लाईनवर येणार आहे, हा रस्ता 50 हजार कोटी रुपयांचा आहे.

    आपल्या राज्यात एक जमीन अधिग्रहण करण्यासाठी 18 कोटी रुपये खर्च होता

    18 कोटी देऊन कसे रोड बांधणार आणि आता तो दर कमी होणार आहे

    माझ्या सेक्रेटरी ने पत्र काढलं होत की 18 कोटी हा दर कमी केल्याशिवाय महाराष्ट्रात विकास कामे होणार नाहीत मी बाळासाहेब थोरात यांच्याशी बोलली त्यात आता बदल होत आहे

    रस्त्याच्या कडेची जमीन नेत्यांऐवजी सरकारने विकत घेतली पाहिजे म्हणजे तिथे विकास कामे करता येतील त्यामुळे रोजगार उपलब्ध होईल

    अटलजींच्या काळात पेट्रोल डिझेल वर 50 पैसे सेस लावला आणि त्यातून ग्रामीण भागातील रस्ते झाले

    मी 12 शे कोटी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि विरोधीपक्ष आणि अपक्ष यांना वाटले आहेत

    अहमदनगर ते पुणे माझा जिव्हाळ्याचा विषय आहे. या रस्त्याने खुप ट्रॅफिक आहे त्यामुळे वाघोली ते शिरूर या ठिकाणी रस्त्यांची डेव्हलपमेंट करणार आहे

    एक डबल ब्रिज या रोडवर उभारणार आहे.

  • 02 Oct 2021 12:35 PM (IST)

    साखरेचे रुपांतर इथेनॉलमध्ये करा - गडकरी

    मी तीन साखर कारखाने चालवतो, कारखाने जिवंत राहिले तर शेतकरी जिवंत राहिला पाहिजे

    साखर करखान्यांनी शेतकऱ्यांचं शोषण नाही केलं पाहिजे

    आपल्या देशात साखरवची 70 लाख टन साखर जास्त निर्माण केली

    हे चक्र उलटं फिरलं तर शेतकरी कारखाने आणि बँका डुबतील

    साखरेचे रुपांतर इथेनॉलमध्ये करा

    असं केल तर साखरेमुळे निर्माण होणाऱ्या समस्या निर्माण होणार नाहीत

    1 लाख 60 हजार कोटी रुवयांचे खाद्य तेल आयात करतो

    उसात खाद्य तेल बिया लावल्या पाहिजेत

    तीन इथेनॉल पंपाचे पंतप्रधानांनी उद्घाटन केलं आहे.

  • 02 Oct 2021 12:13 PM (IST)

    महाराष्ट्रात आता इथेनॉल निर्माण केलं पाहिजे - गडकरी

    नितीन गडकरी -

    कोल्हापूरचे साखर कारखाने म्हणजे मेरिटच्या विद्यार्थ्यांची शाळा, मराठवाडा फास्ट क्लास विद्यार्थ्यांची शाळा आणि विदर्भ त्यानंतर

    महाराष्ट्र बद्दल मला नेहमी आस्था आहे आणि मला सतत वाटतं की महाराष्ट्र देशात नंबर एक ला असला पाहिजे

    महाराष्ट्रात आता इथेनॉल निर्माण केलं पाहिजे, शुगर केन ज्यूसपासून इथेनॉल निर्माण करायला परवानगी दिली आहे

    4500 करोड लिटर इथेनॉल निर्माण झाला, जेवढं इथेनॉल निर्माण होईल ते भारत सरकार विकत घेईल

    इथेनॉल फु्यअल हे पेट्रोल पेक्षा चांगलं आहे

    बाहेर देशात, अमेरिका ब्राझील आणि कॅनडामध्ये इलेक्ट्रिक आणि इथेनॉलवर गाड्या चालत आहेत

    माझा आग्रह आहे ट्रान्सपोर्ट शंभर टक्के इथेनॉल झालं पाहिजे

    बजाज आणि tvs ने इथेनॉल स्कुटर तयार केल्या आहेत

    12 लाख कोटी रुपयांचे इंधन आयात करतो, पण आपला शेतकरी इथेनॉल निर्माण करू शकतो, इथेनॉल पंपाना परवानगी मिळाली आहे.

    मी सुप्रीम कोर्टात अफेडवीत सबमिट केलं आहे. युरो 4 चे नॉर्म आहेत. त्यावर इथेनॉल वापरले तर शंभर टक्के प्रदूषण कमी होऊ शकते

    फ्लेक्स इंजिन निर्माण झालं की सगळं इथेनॉलवर सुरू, मी नागपुरात 35 बसेस इथेनॉल वर चालवल्या आहेत

    ब्राझील मध्ये इथेनॉल वर आहेत, येणाऱ्या काळात शेतकऱ्यांनी इथेनॉल इंधन निर्माण करतील

    आणि 12 लाख कोटी पैकी 5 लाख कोटी शेतकर्यांच्या घरात गेले तर कशाला शेतकरी गरीब राहील

  • 02 Oct 2021 12:09 PM (IST)

    सरकार ज्या ज्या ठिकाणी जागा देईल त्या त्या ठिकाणी आम्ही आमच्या पैशांनी विकास करायला तयार - गडकरी

    नितीन गडकरी -

    आज नगर जिल्ह्यातील अनेक कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण होत आहे.

    सुजय विखे म्हणाले की सर्वात जास्त निधी नगर जिल्ह्याला दिला, पण ज्या जिल्ह्यात आणि राज्यात जातो तिथे सगळेजण असंच म्हणतात

    गरीब गरीब असतो त्याला जात पंथ नसतो, जो गॅस हिंदूला ज्या पैशांत मिळतो त्याच पैशांत मुस्लिमाला मिळतो

    महाराष्ट्र सरकार ज्या ज्या ठिकाणी जागा देईल त्या त्या ठिकाणी आम्ही आमच्या पैशांनी विकास करायला तयार आहोत

    नगर जिल्हयाला विकासाची परंपरा आहे. पहिला साखर कारखाना या जिल्ह्यात तयार झाला 23 कारखाने या जिल्ह्यात आहेत. या जिल्ह्याचं विकासात फार मोठं योगदान, आपल्या जिल्ह्यात सर्वात जास्त उत्पन्न कोल्हापूरचं आहे. कारण तिथे साखर कारखाने सर्वाधिक आहेत.

    येणाऱ्या काळात साखर कारखान्याच्या माध्यमातून होणारा विकास किती मोठा आहे हे आपण जाणतो

    दुधाच्या माध्यमातून विकास पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांनी केला आहे.

    मदर डेअरी 3 लाख लिटर दुध कलेक्ट करते 10 लाखावर गेलं पाहिजे

    एकट्या पुणे जिल्ह्यात जे दूध संकलित होतं तेवढं विदर्भ आणि मराठवाड्यात होत नाही याची लाज वाटली पाहिजे

    गाईना सीमेन्स शंभर रुपयांपेक्षा कमी रुपयात उपलब्ध करून दिल आहे. गाईचं पोट ट्रान्सप्लांट करायचं आणि चांगल्या गाईचं ट्रान्सप्लांट केलं तर दूध वाढू शकतो

  • 02 Oct 2021 11:55 AM (IST)

    गडकरी यांच्या कार्यक्रमाला गेलं की दोन चार दिवसांत फरक दिसतो - शरद पवार

    शरद पवार -

    हा कार्यक्रम या जिल्ह्याच्या विकासाला दिशा देणारा कार्यक्रम आहे.

    मला दुसरीकडे एक कार्यक्रम होता, पण मला रोहित पवार यांच्याकडून निरोप मिळाला की गडकरी यांनी मी यावं असं सांगितलं त्यामुळे मला येणं भाग पडलं

    इतर कार्यक्रम गेलं की वर्षानुवर्षे काही बदल दिसत नाही पण गडकरी यांच्या कार्यक्रमाला गेलं की दोन चार दिवसांत फरक दिसतो

    सगळ्या वाहतुकीत रस्त्यावरची वाहतूक समाजाच्या हिटाची असते, हे काम गडकरी यांनी आपल्या हातात घेतला आहे

    गडकरी यांनी ही जबाबदारी घेण्याआधी देशात 5 हजार किलोमीटर काम होत होत ते आता 12 हजार किलोमीटरवर गेलं आहे.

    मी शक्यतो रस्त्याने प्रवास करण्याचा प्रयत्न करतो

    एखादा नेता देशाच्या उभारणीत कसं योगदान देतो हे गडकरी यांच्याकडे पाहून लक्षात येतं

    कोणताही लोकप्रतिनिधी त्यांच्याकडे गेला तर ते त्याला पक्ष न पाहता मदत करतात

    देशातल्या साखर कारखान्याच्या मुहूर्त मेढ या जिल्ह्यात लागली

  • 02 Oct 2021 11:50 AM (IST)

    काकीनाडा शिर्डी एक्सप्रेसमधुन पकडलेल्या एका संशयित तरुणांकडे आढळून आले 17 सिमकार्ड, 6 आधारकार्ड आणि पासपोर्ट

    मनमाड -

    रेल्वे पोलिसांनी काकीनाडा शिर्डी एक्सप्रेसमधुन पकडलेल्या एका संशयित तरुणांकडे आढळून आले 17 सिमकार्ड, 6 आधारकार्ड, 1 इतर नावाच्या व्यक्तीचा पासपोर्ट अरुणकुमार महेश पाठक असे या तरुणांचे नाव असुन तो दिल्लीचा रहिवाशी, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर कोर्टात हजर केले असता त्याला 4 दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे

  • 02 Oct 2021 11:20 AM (IST)

    शरद पवार, नितीन गडकरी यांच्या उपस्थितीतील कार्यक्रमाला राधाकृष्ण विखे पाटील गैरहजर

    शरद पवार नितीन गडकरी यांच्या उपस्थितीतील कार्यक्रमाला राधाकृष्ण विखे पाटील गैरहजर

    4 हजार कोटी रुपयांच्या विकास कामाच्या कार्यक्रमाला विखे पाटील राहिले गैरहजर

    राधाकृष्ण विखे पाटील गैरहजर राहिल्यामुळे पवार विखे हाड वैर पुन्हा एकदा उघड

  • 02 Oct 2021 10:47 AM (IST)

    आयटीबीपी अर्थात इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस दलाची सायकल रॅली

    नवी दिल्ली

    आयटीबीपी अर्थात इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस दलाची सायकल रॅली

    स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सव निमित्त देशभरात 10 सायकल रॅलीचे आयोजन

    सोळा हजार किलोमीटरचा टप्पा पार करून रॅली नवी दिल्लीत दाखल

    गोगरा लडाख इटानगर असा प्रवास करून सायकल रॅली नवी दिल्लीत दाखल

  • 02 Oct 2021 10:43 AM (IST)

    4 हजार कोटी रुपयांच्या विकास कामांचे शरद पवार आणि नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन

    अहमदनगर :-

    4 हजार कोटी रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन

    शरद पवार आणि नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार उद्घाटन

    थोड्याच वेळात नितीन गडकरी आणि शरद पवार येणार मंचावर

    राधाकृष्ण विखे पाटील यांचीही राहणार मंचावर उपस्थिती

  • 02 Oct 2021 10:37 AM (IST)

    केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि शरद पवार अहमदनगर हेलिपॅडवर दाखल होणार

    अहमदनगर

    10 मिनिटांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि शरद पवार हेलिपॅडवर दाखल होणार

    स्वागतासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री राम शिंदे यांच्या सह भाजप आणि राष्ट्रवादीचे नेते उपस्थित

  • 02 Oct 2021 09:37 AM (IST)

    फी माफीसाठी स्वतःचं डोकं आपटून घेणाऱ्या विद्यार्थ्यावर ही गुन्हा दाखल झालाय

    पिंपरी चिंचवड -

    -फी माफीसाठी स्वतःचं डोकं आपटून घेणाऱ्या विद्यार्थ्यावर ही गुन्हा दाखल झालाय

    -त्यामुळे आता याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल झालेत

    -पिंपरी चिंचवडमधील महात्मा फुले महाविद्यालयात बुधवारी ही घटना घडली होती

    -शुभम बारोठ या विद्यार्थ्यांचे फी वरून प्राचार्यांसोबत वाद सुरू होते. याच रागातून शुभमने स्वतःचे डोके दाराच्या काचेवर आपटले, यात त्याच्या डोक्याला इजा झाली. या घटनेत कर्मचारी ही जखमी झाले. असा आरोप करत महाविद्यालयाने शुभमवर गुन्हा दाखल केला

    - तर पहिल्या दिवशी शुभमने महाविद्यालयाच्या सुरक्षा रक्षकावर गुन्हा दाखल केलेला आहे

  • 02 Oct 2021 09:35 AM (IST)

    औरंगाबाद शहरातील नारेगाव परिसरात पुराच्या पाण्याचा कहर

    औरंगाबाद शहरातील नारेगाव परिसरात पुराच्या पाण्याचा कहर

    गाडे नगर परिसरात अनेकांच्या घरात घुसले पुराचे

    रस्त्यांनाही आले नद्यांचे स्वरूप

    रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे नारेगावात पाणीच पाणी

  • 02 Oct 2021 09:34 AM (IST)

    राष्ट्रीय महामार्ग 6 वर रात्री दीड वाजता भुसावळनजीक मोठा अपघात

    जळगाव -

    राष्ट्रीय महामार्ग 6 वर रात्री दीड वाजता भुसावळनजीक मोठा अपघात

    ट्रॅव्हल आणि पिकअप ची समोरासमोर धडक

    या अपघातात एकाच जागीच मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी

  • 02 Oct 2021 09:34 AM (IST)

    जायकवाडी धरणाचे आपत्कालीन दरवाजे पुन्हा उघडले

    औरंगाबाद -

    जायकवाडी धरणाचे आपत्कालीन दरवाजे पुन्हा उघडले

    जायकवाडी धरणातून 90 हजार क्यूसेक्स ने पाण्याचा विसर्ग सुरू

    एकूण 27 दरवाजातून 90 हजार क्यूसेक्स विसर्ग सुरू

    औरंगाबाद जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अवाक पुन्हा वाढली

    18 गेट 4 फूट उंचीची तर 9 गेट दीड फूट उंचीची उचलून अवाक सुरू

  • 02 Oct 2021 09:33 AM (IST)

    शरद पवार आणि नितीन गडकरी एकाच हेलिकॉप्टरमधून नगरला जाणार

    शरद पवार आणि नितीन गडकरी एकाच हेलिकॉप्टरमधून नगरला जाणार

    मुंबई गोवा महामार्गाबाबत दोघांमध्ये चर्चा,

    पुणे विमानतळावर दोघांमध्ये चर्चा

    नितीन गडकरी आणि शरद पवारांचा एकत्रित हवाई प्रवास

  • 02 Oct 2021 09:33 AM (IST)

    नवी दिल्लीत अवैध टेलिकॉम सेंटरचा पर्दाफाश

    नवी दिल्ली

    अवैध टेलिकॉम सेंटरचा पर्दाफाश

    चावडी बाजार परिसरात होते टेलिकॉम सेंटर

    आखाती देश आणि पाकिस्तान मधून कॉल आल्याचा संशय

    इंटरनॅशनल टेलिकॉम सेंटरवर कारवाई

    पाकिस्तान मधून रोज 50 हजार हुन अधिक कॉल्स

    टेलिकॉम सेंटर प्रकरणी 3 जणांना अटक

  • 02 Oct 2021 08:41 AM (IST)

    पुणे विमानतळाच्या जागेसंदर्भात शरद पवार नितीन गडकरींची भेट घेणार

    शरद पवार नितीन गडकरींची भेट घेणार

    पुणे विमानतळाच्या जागेसंदर्भात पवार गडकरींची भेट घेणार

    सकाळी 9 वाजता पुणे विमानतळावर भेट होणार

    दोघेही भेटीनंतर नगरला कार्यक्रमासाठी रवाना होणार

    भाजपा खासदार गिरीश बापट

    राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनिल तटकरे पुणे विमानतळावर उपस्थित

  • 02 Oct 2021 08:25 AM (IST)

    किरीट सोमय्या आणि चंद्रकांत पाटील यांच्या विरोधातील बदनामीच्या दाव्यावर शुक्रवारी होणार सुनावणी

    कोल्हापूर

    किरीट सोमय्या आणि चंद्रकांत पाटील यांच्या विरोधातील बदनामीच्या दाव्यावर शुक्रवारी होणार सुनावणी

    ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी किरीट सोमय्या आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर केलाय 100 कोटींच्या बदनामीचा दावा

    कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालय होणार सुनावणी

    सोमय्या आणि पाटील यांच्याकडून म्हणणे सादर करण्यासाठी मागितली गेलीय सात दिवसांची मुदत

  • 02 Oct 2021 08:25 AM (IST)

    दोन दिवसांच्या विश्रांती नंतर मनमाड शहर परिसरात पावसाची पुन्हा हजेरी

    मनमाड :-

    दोन दिवसांच्या विश्रांती नंतर मनमाड शहर परिसरात पावसाची पुन्हा हजेरी

    विजेच्या कडकडाट सह पाऊस सुरू

    सकाळ पासून रिमझिम पाऊस सुरू

    तर अधून मधून पावसाचा वाढत आहे जोर

  • 02 Oct 2021 08:25 AM (IST)

    कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील शाहू पुरस्कारांची फाईल झाली गायब

    कोल्हापूर

    कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील शाहू पुरस्कारांची फाईल झाली गायब

    फाईल सापडत नसल्यान अज्ञातांविरोधात शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

    अधीक्षक सचिन मगर यांनी दिली फिर्याद

    गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या आरोग्य विभागातील पुरस्कारांचा प्रवास पोचहला पोलिस ठाण्यापर्यंत

    पुरस्कारांची फाईलच गायब झाल्याने राज्यात पहिल्या आलेल्या कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

  • 02 Oct 2021 08:19 AM (IST)

    काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधींनी माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिली

  • 02 Oct 2021 08:16 AM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजय घाट येथे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिली

  • 02 Oct 2021 08:15 AM (IST)

    उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडूही राजघाटवर

  • 02 Oct 2021 08:13 AM (IST)

    लोकसभेचे स्पिकर ओम बिरला यांच्याकडून गांधीजींना मानवंदना

  • 02 Oct 2021 08:08 AM (IST)

    गांधी जयंती निमित्त पंतप्रधान मोदींकडून राजघाटवर जाऊन महात्मा गांधींना नमन

  • 02 Oct 2021 07:50 AM (IST)

    पुणे पोलिस आयुक्तालयातील शिपाई पदासाठीची 5 ऑक्‍टोबरला लेखी परीक्षा

    पुणे -

    - पुणे पोलिस आयुक्तालयातील शिपाई पदासाठीची 5 ऑक्‍टोबरला लेखी परीक्षा,

    - पोलिस भरती प्रक्रियेत पहिल्यांदाच पहिल्यांदाच शारिरीक चाचणीपुर्वी लेखी परीक्षा होत आहे,

    - आयुक्तालयाची लेखी परिक्षा जी. एस. सॉफ्टवेअर कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे,

    - पोलिस शिपाई पदासाठीच्या 214 जागांसाठी 39 हजार 323 अर्ज.

  • 02 Oct 2021 07:47 AM (IST)

    महात्मा गांधी जयंती निमित्त नागपुरातून वंदे मातरम् रक्तदान रॅलीला सुरुवात

    - महात्मा गांधी जयंती निमित्त नागपुरातून वंदे मातरम् रक्तदान रॅलीला सुरुवात

    - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दाखवली हिरवी झेंडी

    - देवता लाईफ फाऊंडेशन कडून २ ते १५ ॲाक्टोबर रक्तदान रॅलीचं आयोजन

    - रक्तदान जनजागृतीतीसाठी राज्यभर ३६ जिल्ह्यातील ५५०० किलोमीटर जाणार रॅली

    - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत रक्ताचा तुटवडा जाणवू नये म्हणुन रक्तदान रॅलीचं आयोजन

    - कॅंसर पिडीत रुग्णांना निशुल्क रक्त मिळावं म्हणुन देवात फाऊंडेशनचा पुढाकार

  • 02 Oct 2021 07:46 AM (IST)

    औरंगाबाद शहरातील नारेगाव आणि पिसादेवी परिसरात घुसले पावसाचे पाणी

    औरंगाबाद -

    औरंगाबाद शहरातील नारेगाव आणि पिसादेवी परिसरात घुसले पावसाचे पाणी

    अनेक दुकाने आणि घरामध्येही घुसले पावसाचे पाणी

    दुकानात पाणी घुसल्यामुळे व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान

    नारेगाव आणि पिसादेवी परिसरातील नद्यांना तुफाण पूर

    पुराचे पाणी गावात आणि रस्त्यावर घुसल्यामुळे जनजीवन विस्कळीत

  • 02 Oct 2021 06:43 AM (IST)

    औरंगाबाद शहर आणि जिल्ह्याला रात्रभर पुन्हा मुसळधार पावसाने झोडपले

    औरंगाबाद -

    औरंगाबाद शहर आणि जिल्ह्याला रात्रभर पुन्हा मुसळधार पावसाने झोडपले

    रात्री 11 पासून पहाटे 4 वाजेपर्यंत सुरू होता मुसळधार पाऊस

    मुसळधार पावसामुळे औरंगाबाद जिल्ह्यात पुन्हा सर्वत्र पाणीच पाणी

    पुन्हा एकदा पावसाने झोडपल्यामुळे शेतकरी झाला हवालदिल

Published On - Oct 02,2021 6:41 AM

Follow us
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.