AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आम्ही सगळे मिठाई देऊन थकलो तुमच्यापासून…’; रामदास कदमांचा राऊतांना खोचक टोला

नीलम गोऱ्हे यांच्या ठाकरे गटावरील आरोपानंतर आता वातावरण चांगलंच तापलं आहे, राऊतांनी गोऱ्हे यांच्या आरोपाला उत्तर देताना जोरदार हल्लाबोल केला. त्यानंतर आता रामदास कदम यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

'आम्ही सगळे मिठाई देऊन थकलो तुमच्यापासून...'; रामदास कदमांचा राऊतांना खोचक टोला
| Updated on: Feb 24, 2025 | 8:33 PM
Share

शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना ठाकरे गटावर गंभीर आरोप केला आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत एका पदासाठी दोन मर्सिडीज द्यावा लागत होत्या असा आरोप त्यांनी केला आहे. यावरून आता राजकारण चांगलंच तापलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावरून नीलम गोऱ्हे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्यानंतर आता शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी संजय राऊत यांच्या या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

नेमकं काय म्हणाले कदम?  

मी उद्धव ठाकरे यांना इतक्या वर्षापासून जवळून पाहत आहे, उद्धव ठाकरे यांचा मातोश्रीचा जो आमचा सर्वांचा अभ्यास आहे, ते पाहिल्यानंतर त्यात काही विशेष बाब आहे असे मला वाटत नाही. नेत्यांचं मंत्रिपद काढून घेतलं, बाप मुख्यमंत्री, मुलगा कॅबिनेट मंत्री, दिवाकर रावते यांचंही मंत्रिपद काढून घेतलं. राऊत साहेब आपला अभ्यास दांडगा आहे, अपक्षांना मंत्रिपद देण्यात आलं, त्यांचा पक्ष वाढिशी काहीही संबंध नव्हता. त्याच्यामागे काय गौडबंगला आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. तानाजी सावंताना फोन लावून विचारा, त्यांना मंत्री बनण्यासाठी काय काय करावं लागलं ते विचारा? म्हणजे तुमच्या ज्ञानात भर पडेल.  कशाला नीलम ताईंना बोलता, असा हल्लाबोल कदम यांनी राऊतांवर केला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, अशोक पाटील जे आता आमदार झाले, मागच्यावेळी ते सिटिंग आमदार असतानाही त्यांना तिकीट दिलं नाही. अशोक पाटील यांचा एबी फॉर्म काढून घेण्यासाठी समोरच्याकडून किती मिठाई घेतली याचा अभ्यास आपण करून घ्या, आम्ही सगळे मिठाई देऊन थकलो आहोत, तुमच्यापासून काही लपून ठेवलं नाही. तुम्ही नीलम गोऱ्हेंबद्दल जे बोलत आहात ते तुम्हाला शोभत नाही, असं कदम यांनी म्हटलं आहे.

असा एकही दिवस जात नाही, की ते एकनाथ शिंदेंविरोधात बोलत नाहीत. मुघलांचे घोडे पाणी प्यायला जायचे तेव्हा त्यांना पाण्यात संताजी -धनाजी दिसायचे, तशी राऊत यांची अवस्था झाली आहे.  राऊत यांना फक्त एकनाथ शिंदे, पंतप्रधान आणि शिवसेना हे पाण्यात दिसतात त्याला काही औषध नाही, असा खोचक टोला यावेळी कदम यांनी लगावला आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी