AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रामरक्षा आंदोलनाचे बॅनर पालिकेने फाडले; ठाकरे गटाचा दावा, नागपूरमध्ये राडा

Shiv Sena UBT : रामरक्षा आंदोलनाचे बॅनर नागपूर महानगर पालिकेकडून हटवण्याच आल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे नागपुरात मोठा राडा पहायला मिळाला.

रामरक्षा आंदोलनाचे बॅनर पालिकेने फाडले; ठाकरे गटाचा दावा, नागपूरमध्ये राडा
Ramraksha Andolan NagpurImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Jul 18, 2026 | 2:59 PM
Share

अयोध्येतील राम मंदिराच्या दानपेटीत चोरी झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. ठाकरे गट या गैरव्यवहार प्रकरणावरून मुंबईनंतर आता नागपुरात आंदोलन करणार आहे. यासाठी उद्धव ठाकरे नागपुरात दाखल झाले आहेत. अशातच आता या रामरक्षा आंदोलनाचे बॅनर नागपूर महानगर पालिकेकडून हटवण्याच आल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. यामुळे पालिका कर्मचारी आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाल्याचेही समोर आले आहे.

रामरक्षा पठण कार्यक्रमाचे बॅनर फाडले

आज नागपुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून रामरक्षा आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनासाठी ठाकरे गटाने अनेक हिंदुत्ववादी संघटनांना आमंत्रण दिलं आहे. या आंदोलनाची पूर्ण तयारी झाला आहे. या आंदोलनाबाबत नागपुरात ठाकरे गटाकडून बॅनरही लावण्यात आले होते, मात्र काही बॅनर हटवण्यात आल्याचे समोर आले आहे. हे बॅनर नागपूर महापालिकेकडून काढण्यात आल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे. त्यामुळे शिवसेना पदाधिकारी आणि पालिका कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाल्याचे समोर आले आहे.

पोलिसांचा कडक पहारा

उद्धव ठाकरे यांच्या कडून आयोजित रामरक्षा पठण कार्यक्रमासाठी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. अनेक वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस कर्मचारी बंदोबस्तात सहभागी आहेत. आजूबाजूच्या सगळ्या बिल्डिंगवर पोलीस सुरक्षा ठेवण्यात आली आहे. साध्या गनवेशातील पोलीस सुद्धा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांची सर्वत्र नजर असणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांना निमंत्रण

नागपुरातील रामरक्षा पठणाच्या कार्यक्रमाबाबत बोलताना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी म्हटले की, राजधानीनंतर आम्ही रामरक्षा पठणसाठी उपराजधानीची निवड केली आहे. रामाच्या चरणी आम्ही रामरक्षा पठण करणार आहोत. हे शहर मुख्यमंत्री यांचं आहे म्हणून निवड केली नाही तर हे उपराजधानीच शहर आहे म्हणून निवड केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनाही निमंत्रण दिले आहे, यायचं की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. हा कार्यक्रम राजकीय नाही त्यामुळे गर्दी किती होणार हा प्रश्न नाही.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...