डिसले गुरुजींच्या पीएचडीचा मार्ग मोकळा; अध्यायन रजेच्या अर्जला अखेर मंजुरी

डिसले गुरुजींच्या पीएचडीचा  मार्ग मोकळा; अध्यायन रजेच्या अर्जला अखेर मंजुरी
रणजित डिसले गुरुजी (फाईल फोटो)

डिसले गुरुजींची रजा मंजूर झाली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामींनी डिसले यांचा अर्ज मंजूर केला आहे. सुटी मंजूर झाल्यानंतर डिसले यांनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि जिल्हा प्रशासनाचे आभार देखील मानले आहेत.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अजय देशपांडे

Jan 23, 2022 | 9:12 PM

सोलापूर : परितेवाडी जिल्हा परिषद शाळेचे (ZP School) ग्लोबल टीचर पुरस्कार (Global Teacher Award) विजेते शिक्षक रणजित डिसले (Ranjeet Disle) यांनी अमेरिकेत पीएचडी करण्यासाठी रजेची मागणी केली होती. मात्र त्यांच्या रजेचा अर्ज नामंजूर करण्यात आला होता. इतकंच नाही तर डिसले गुरुजी यांच्या रजेचा अर्ज दीड महिन्यापासून अधिकाऱ्यांच्या टेबलावर पडून असल्याचंही बोललं जात होत.  मात्र त्यानंतर या प्रकरणात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी लक्ष घातलं. वर्षा गायकवाड यांनी लक्ष घातल्यानंतर अखेर रणजित डिसले यांचा उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. डिसले गुरुजींची रजा मंजुर झाली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामींनी डिसले यांचा अर्ज मंजूर केला आहे. सुटी मंजूर झाल्यानंतर डिसले यांनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि जिल्हा प्रशासनाचे आभार देखील मानले आहेत. त्यांनी याबाबत ट्विटरवरून पोस्ट करत माहिती दिली.

काय आहे प्रकरण?

परितेवाडी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक रणजित डिसले यांची अमेरिकन सरकारकडून शिक्षकांसाठी दिल्या जाणाऱ्या फुल प्रेस स्कॉलरशिपसाठी निवड झाली आहे. यासाठी त्यांना 2022 च्या ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीमध्ये अमेरिकेत जाऊन पिस इन एज्यूकेशन या विषयावर संशोधन करायचे आहे. त्यासाठी त्यांना रजा हवी असल्याने त्यांनी अध्यायन रजेचा अर्ज केला होता. मात्र या अर्जावरून मोठा गोंधळ निर्माण झाला होता. अखेर या प्रकरणी खुद्द शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी लक्ष घातल्यानंतर डिसले यांचा सुटीचा अर्ज मंजूर झाला आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामींनी डिसले यांचा अर्ज मंजूर केला आहे. अर्ज मंजूर झाल्यानंतर आता डिसले यांचा परदेशात जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

शिक्षण मंत्र्यांचे आभार

डिसले यांनी ट्विट करत अर्ज मंजूर झाल्याची बातमी दिली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामींनी आपला अर्ज मंजूर केल्याचे त्यांनी म्हटले आहे. सोबतच त्यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यासह बच्चू कडू आणि जिल्हा प्रशासनाचे देखील आभार व्यक्त केले आहेत. दरम्यान काल देखील त्यांनी एक ट्विट केले होते. ज्यामध्ये त्यांनी  राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांचे आभार मानले होते.

इतर बातम्या

‘बाळासाहेब असते तर…’ कवितेच्या माध्यमातून संजय राऊतांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा

Syed Modi Tournament : अंतिम फेरीत मालविका बनसोड पराभूत, खिताब पीव्ही सिंधूच्या नावावर

चांद्यापासून बांद्यापर्यंत! कधी कुठे आणि कोणकोणत्या इयत्तांच्या शाळा सुरु आणि कोणत्या बंद? वाचा सविस्तर

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें