AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चांद्यापासून बांद्यापर्यंत! कधी कुठे आणि कोणकोणत्या इयत्तांच्या शाळा सुरु आणि कोणत्या बंद? वाचा सविस्तर

हळूहळू राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असल्याने पुन्हा एकदा शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या आदेशानुसार उद्यापासून शाळा सुरू होत आहेत. मात्र अद्यापही काही जिल्ह्यांमध्ये शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही.

चांद्यापासून बांद्यापर्यंत! कधी कुठे आणि कोणकोणत्या इयत्तांच्या शाळा सुरु आणि कोणत्या बंद? वाचा सविस्तर
संग्रहित छायाचित्र
| Edited By: | Updated on: Jan 23, 2022 | 8:08 PM
Share

मुंबई : हळूहळू राज्यातील कोरोनाबाधितांची (Corona)  संख्या कमी होत असल्याने पुन्हा एकदा शाळा उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या आदेशानुसार उद्यापासून शाळा सरू (School resumes) होत आहेत. मात्र जरी असे असले तरी देखील कोरोनाचा संभाव्य धोका पहाता शाळा सुरू करायची की नाही याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार हे जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्यामुळे काही जिल्ह्यात उद्यापासून शाळा सुरू होत आहेत. तर काही जिल्ह्यात अद्यापही शाळा सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. देशावर गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट आहे. कोरोनाकाळात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक दिवस शाळा बंद होत्या. मागील काही दिवसांमध्ये कोरोना रुग्ण कमी झाल्याने शाळा उघडण्यात आल्या मात्र पुन्हा एकदा कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनने धुमाकूळ घातल्याने शाळा बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला होता. पाहुयात उद्यापासून नेमक्या कोणत्या जिल्ह्यातील शाळा उघडणार आहेत ते?

कुठे, कधी शाळा सुरू होणार?

मुंबई : 24 जानेवारी पासून शाळा सुरु होणार 1 ते 12 वी

ठाणे : 24 जानेवारीला शाळा सुरु होणार 1 ते 12 वी

नाशिक : 24 जानेवारीला शाळा सुरु होणार 1 ते 12 वी

जळगाव :  ग्रामीण भागातील शाळा सुरू होणार, शहरी भागातील तूर्तास बंद

औरंगाबाद : फक्त  दहावी आणि बारावीच्या वर्ग उद्यापासून उघडणार

पुणे : शाळा सुरु करण्याचा निर्णय पुढच्या आठवड्यात होणार

कोल्हापूर : 25 जानेवारीला शाळा सुरु होणार 1 ते 12 वी

सांगली : 1 फेब्रुवारी पासून शाळा सुरु होणार 1 ते 12 वी

नागपूर : 26  जानेवारी रोजी आढावा घेऊन त्यानंतर निर्णय

चंद्रपूर : शाळा सुरु करण्या संदर्भात अजून निर्णय नाही

सिंधुदुर्ग : शाळा सुरु करण्या संदर्भात 1 फेब्रुवारीला निर्णय

रत्नागिरी : शाळा सुरु करण्यासंदर्भात 26 जानेवारी रोजी निर्णय

रायगड : शाळा सुरु करण्यासंदर्भात उद्या जिल्हाधिकारी निर्णय घेणार

पालघर : 8 ते 12 वी पर्यंतच्या शाळा 27 जानेवारी पासून सुरु होणार, इतर वर्ग बंद

सोलापूर : शाळा सुरु करण्यासंदर्भात प्रशासनाचा अद्याप निर्णय नाही

धुळे : 8 ते 12 पर्यत च्या शाळा 27 जानेवारीला सुरु होणार, तूर्तास प्राथमिक शाळा बंद

नंदुरबार : 1 ते 4 थीच्या शाळा या ऑनलाइन सुरु राहणार, 5 ते 12 वी शाळा सुरू करण्याला परवानगी

बुलढाणा : शाळा सुरु करण्यासंदर्भात शासनाचा तूर्तास निर्णय नाही

अकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 1 ते 12  च्या शाळा उद्यापासून सुरु होणार, शहरी भागातील शाळा तूर्तास बंद

वाशिम : जिल्ह्यात शाळा सुरु करण्यासंदर्भात 27 जानेवारी रोजी निर्णय होणार

जालना : 24 जानेवारी पासून शहरी भागातील 8 ते  12 वी तर ग्रामीण भागातील 1 ते 12 वी शाळा सुरू होणार

हिंगोली : जिल्ह्यातील शाळा सुरु करण्यासंदर्भात 27 जानेवारीला निर्णय होणार

परभणी : उद्यापासून 9 ते 12 वी पर्यंतच्या शाळा सुरू होणार, 8 वी पर्यंतच्या शाळा बंदच

अहमदनगर : शाळा सुरु करण्यासंदर्भात 25 जानेवारीला निर्णय होणार

बीड : अद्याप निर्णय नाही, आज रात्री उशिरा निर्णय घेतला जाण्याची शक्यता

उस्मानाबाद : 10 आणि 12 वीचे वर्ग सुरु आहेत, इतर वर्गांबाबत 29 जानेवारीला निर्णय

सातारा : 1  ते 12 विच्या शाळा उद्यापासून संपूर्ण जिल्ह्यात सुरु होणार

नांदेड : उद्यापासून जिल्ह्यात 9 ते 12 विच्या शाळा सुरु होणार पहिले ते आठवीच्या शाळा बंदच

यवतमाळ : 27 जानेवारी पासून 9 ते 12 च्या शाळा सुरु होणार, पहिले ते आठवीच्या शाळा बंदच

अमरावती : पुढील एक आठवडा शाळा बंदच

वर्धा : संपूर्ण जिल्ह्यात 1 ते 12 वी च्या शाळा उद्यापासून सुरु होणार

गडचिरोली : उद्यापासून 5 ते 12 च्या शाळा सुरू, 1 ते 4 थी पर्यंतच्या शाळा बंद

गोंदिया : शाळा सुरु करण्यासंदर्भात तूर्तास निर्णय नाही

भंडारा : शाळा सुरु करण्यासंदर्भात तूर्तास निर्णय नाही

लातूर : संपूर्ण जिल्ह्यात 1 ते 12 वी च्या शाळा उद्यापासून सुरु होणार

संबंधित बातम्या 

मुंबईतील पहिल्या ‘सेफ स्कूल झोन’चा प्रयोग यशस्वी; 93 टक्के विद्यार्थ्यी म्हणाले, पूर्वीपेक्षा रस्त्यावरून चालणे अधिक सोपे

VIDEO: कलाकार हा कलाकार असतो, त्याला कोणतीही भूमिका करावी लागते; सुरेखा पुणेकरांची अमोल कोल्हेंसाठी बॅटिंग

मुंबईतील पहिल्या ‘सेफ स्कूल झोन’चा प्रयोग यशस्वी; 93 टक्के विद्यार्थ्यी म्हणाले, पूर्वीपेक्षा रस्त्यावरून चालणे अधिक सोपे

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार