VIDEO: कलाकार हा कलाकार असतो, त्याला कोणतीही भूमिका करावी लागते; सुरेखा पुणेकरांची अमोल कोल्हेंसाठी बॅटिंग

VIDEO: कलाकार हा कलाकार असतो, त्याला कोणतीही भूमिका करावी लागते; सुरेखा पुणेकरांची अमोल कोल्हेंसाठी बॅटिंग
Surekha Punekar

प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी आणि राष्ट्रवादीच्या नेत्या सुरेखा पुणेकर यांनी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांची पाठराखण केली आहे. कलाकार हा कलाकार असतो.

प्रदीप कापसे

| Edited By: भीमराव गवळी

Jan 23, 2022 | 5:25 PM

पुणे: प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी आणि राष्ट्रवादीच्या नेत्या सुरेखा पुणेकर यांनी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांची पाठराखण केली आहे. कलाकार हा कलाकार असतो. त्याला कोणतीही भूमिका करावी लागते, असं सांगत सुरेखा पुणेकर यांनी कोल्हे यांचं समर्थन केलं आहे.

सुरेखा पुणेकर यांनी मीडियाशी संवाद साधताना अमोल कोल्हे यांना आपला पाठिंबा दर्शविला. अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेची भूमिका केली आहे. पण कलाकार हा कलाकार असतो. त्याला कोणत्याही भूमिका कराव्या लागतात. कारण त्याच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न असतो. म्हणून त्यांनी गोडसेचं काम केलं आहे. त्यामुळे वावगं काही नाही. आता अमरिश पुरी यांनी पाकिस्तानी नागरिकांच्या भूमिका वठवल्या आहेत. पण ते मनाने चांगले होते. देशप्रेमी होते. तसेच कोल्हे यांनी भूमिका केली यात काही वावगं नाही. कलावंत हा कोणतीही भूमिका करणारच, असं सुरेखा पुणेकर म्हणाल्या.

काम केल्याशिवाय पोट कसे भरणार?

माझं त्यांच्या भूमिकेला समर्थन आहे. कलावंत हा कलावंत असतो. मीही कलावंत आहे. तेही कलावंत आहेत. कलाकारांना काम केल्याशिवाय पोट कसे भरणार? त्यावेळी ते खासदार नव्हते. आता खासदार झाले आहेत. आता आडवं लावण्यात काहीही अर्थ नाही, असंही ते म्हणाले.

तमाशा कलावंतांसाठी महामंडळ सुरू करा

मुख्यमंत्री उद्वव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सांस्कृतिक मंत्री अमित देशमुखांनी तमाशा कलावंतांचे प्रश्न सोडवावेत. तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. त्यामुळे या कलावंतांना कार्यक्रमांसाठी परवानगी लवकर दिली पाहिजे. कलावंतांसाठी एक महामंडळ लवकरात लवकर सुरू केलं पाहिजे, अशी मागणी करतानाच तमाशा कलावंतांचे प्रश्न धसास लावण्यासाठी राष्ट्रवादीच्या माध्यमातून पाठपुरावा करणार असल्याचं सुरेखा पुणेकर यांनी सांगितलं.

मी समाधानी

यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेल्या जबाबदारीवर समाधान व्यक्त केलं. पक्षाने मला जबाबदारी दिली. त्यावर मी समाधानी आहे, असं त्या म्हणाल्या.

म्हणून दरेकरांचा पराभव

यावेळी त्यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांना टोला लगावला. मी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांनी माझ्याबद्दल काही विधान केलं होतं. त्यांनी महिलांबद्दल व्यवस्थित बोललं पाहिजे ही माझी सूचना आहे. त्या विधानामुळेच त्यांचा मुंबै बँकेच्या निवडणुकीत पराभव झाला, असा टोला त्यांनी लगावला.

संबंधित बातम्या:

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणाआधीच शिवसेनेचं ‘एकला चलो रे?’; बडा नेता म्हणाला, महापालिकेत शिवसेनेची एकहाती सत्ता दिसेल

‘बाळासाहेब असते तर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी झालीच नसती’, सुधीर मुनगंटीवारांकडून सेनेला डिवचण्याचा प्रयत्न

मुंबईतील पहिल्या ‘सेफ स्कूल झोन’चा प्रयोग यशस्वी; 93 टक्के विद्यार्थ्यी म्हणाले, पूर्वीपेक्षा रस्त्यावरून चालणे अधिक सोपे

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें