AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अचानक अशक्तपणा… हातापायाला मुंग्या… पुण्यात दुर्मीळ आजाराचा शिरकाव; किती रुग्ण आढळले?

पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) नावाच्या दुर्मिळ आजाराचे २२ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. हे सर्व रुग्ण दीनानाथ मंगेशकर आणि पूना हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. ICMR-NIV येथे नमुन्यांची तपासणी सुरू आहे. पुणे महानगरपालिकेने बाधित भागात टीम पाठवली आहे. GBS चे निदान आणि उपचार गुंतागुंतीचे आहेत, तरी बहुतेक रुग्ण बरे होतात.

अचानक अशक्तपणा... हातापायाला मुंग्या... पुण्यात दुर्मीळ आजाराचा शिरकाव; किती रुग्ण आढळले?
| Updated on: Jan 21, 2025 | 10:42 AM
Share

पुणे शहरातील नागरिक सध्या एका दुर्मिळ आजाराचे अनेक संशयित रुग्ण आढळल्याने खळबळ माजली आहे. पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमचे ( Guillain Barre Syndrome (GBS)) चे 22 संशयित रुग्ण आढळल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी इंडियन मेडिकल काऊन्सिल ऑफ रिसर्च (ICMR-NIV) येथे पाठवण्यात आले आहेत. तेथील तपासणीअंती या आजाराचा निष्कर्ष निघेल.

दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि पूना हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात काही रुग्णांना दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या संबंधित हॉस्पिटलमध्ये संशयित रुग्णांना दाखल करण्यात आल्यानंतर सिंहगड रोड परिसरातून, गुइलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या दुर्मिळ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरची काही प्रकरणं पुणे महानगरपालिकेकडे नोंदवली गेली आहेत. शहरातील या दुर्मिळ विकाराच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी पुणे पालिकेतर्फे बाधित भागात एक टीम पाठवण्यात येणार असल्याची माहितीही समोर आली आहे. गुइलेन बॅरे सिंड्रोम म्हणजे नक्की काय हे जाणून घेऊया.

गुइलेन बॅरे सिंड्रोम म्हणजे काय ?

गुइलेन बॅरे सिंड्रोम हा एक दुर्मिळ आजार आहे. दरवर्षी १ लाख लोकांमध्ये तो एका व्यक्तीला होतो. याचे निदान गुंतागुंतीचे असते. चेतासंस्थेच्या चाचण्या आणि स्पायनल फ्लुइड चाचण्या या आजाराच्या निदानासाठी आवश्यक असतात. आयव्हीआयजी अथवा प्लाझ्मा एक्स्चेंजसारख्या उपचारांमुळे रुग्णाला लवकरात लवकर मदत मिळू शकते. या आजाराचे बहुतेक रुग्ण बरे होत असले, तरी 20 टक्के रुग्णांना सहा महिन्यांनंतरही हालचालींमध्ये अडचणी येतात, अशी माहिती समोर आली आहे.

जीबीएस या आजाराचे पहिले लक्षण म्हणजे अशक्तपणा आणि हातपायांना मुंग्या येणे. या आजाराचे नेमके कारण काय ते सध्या माहीत नाही. गुइलेन बॅरे सिंड्रोमची कारणे पूर्णपणे समजून घेणे वैद्यकीय शास्त्रासाठी अजूनही एक आव्हान आहे. पण गुइलेन बॅरे सिंड्रोमला ऑटोइम्यून डिसऑर्डर म्हणतात. गुइलेन बॅरे सिंड्रोम दोन तृतीयांश रुग्णांमध्ये शस्त्रक्रिया किंवा लसीकरणानंतर सात दिवस ते पाच आठवड्यानंतर दिसून आले. पण काही लोकांमध्ये हे संक्रमण ट्रिगरसारखे कार्य करते.

Follow Us
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ