रत्नागिरीतील तिवरे गावात तब्बल 6 ठिकाणी भूस्खलन, पुराच्या पाण्यात पूलही वाहून गेला

रत्नागिरीतील तिवरे गावाला मुसळधार पावसाचा जबर तडाखा बसला आहे. त्यामुळे गावातील एकूण तब्बल 6 ठिकाणी भूस्खलन झाले आहे. या घटनेमुळे गावकरी धास्तावले आहेत.

रत्नागिरीतील तिवरे गावात तब्बल 6 ठिकाणी भूस्खलन, पुराच्या पाण्यात पूलही वाहून गेला
tiware landslide
Follow us
| Updated on: Jul 27, 2021 | 10:56 AM

रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी अक्षरशः ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळला. त्यामुळे अनेक भागात पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. रायगड, रत्नागिरीत पाण्याने धोक्याची पातळी ओलांडून सारा भाग पाण्याखाली गेला होता. रत्नागिरीतील तिवरे गावाला मुसळधार पावसाचा जबर तडाखा बसला आहे. त्यामुळे गावातील तब्बल 6 ठिकाणी भूस्खलन झाले आहे. त्यामुळे गावकरी धास्तावले आहे. (Ratnagiri Tiware village Landslides in 6 places bridges collapse due to heavy rain flood)

रत्नागिरीतील तिवरे गावाला मुसळधार पावसाचा जबर तडाखा बसला आहे. त्यामुळे गावातील एकूण तब्बल 6 ठिकाणी भूस्खलन झाले आहे. या घटनेमुळे गावकरी धास्तावले आहेत. तर फणसवाडीसह गावातील अन्य 100 घरांना डोंगराच्यावरील भागास मोठ्या भेगा गेल्याने धोका निर्माण झाला आहे. तसेच पुराच्या पाण्यात तिवरे भेंदवाडीतील पुलही वाहून गेला. त्यामुळे पलीकडच्या वाडीचा संपर्क तुटला आहे.

अनेक ठिकाणी संभाव्य पुराचा धोका लक्षात घेऊन गावकऱ्यांचं तात्पुरतं मंदिरात स्थलांतर करण्यात आलं आहे. मात्र व्यवस्था नसल्याने पावसाचा अंदाज घेऊन ग्रामस्थ पुन्हा आपल्या घरात राहत असल्यामुळे चिंता वाढली आहे. तसेच तिवरे गावात जाणारे अनेक पूल वाहून गेल्यामुळे गावात जाण्यासाठी प्रशासनाला अनेक अडचणी येत आहेत.

तळीयेतील 32 नागरिक बेपत्ता

पाच दिवसापूर्वी तळीये येथे डोंगराचा कडा कोसळून झालेल्या दुर्घटनेत 35 घरे जमीनदोस्त झाली होती. या दरडीखाली दबलेले 32 मृतदेह काढण्यात बचाव पथकाला यश आलं होतं. मात्र, त्यानंतर एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि टीडीआरएफच्या टीमने रेस्क्यू ऑपरेशन हाती घेऊन कालपर्यंत 53 मृतदेह बाहेर काढले. मात्र, अजूनही 32 नागरिक बेपत्ता आहेत.

बेपत्ता नागरिकांना मृत घोषित करण्याची मागणी

गेल्या पाच दिवसांपासून तळीये येथे दरडीचा ढिगारा उपसण्याचं आणि बेपत्ता नागरिकांना शोधण्याचं काम सुरू होतं. त्यासाठी या ठिकाणी एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि टीडीआरएफची पथकं गेल्या पाच दिवसापासून रेस्क्यू ऑपरेशन करत होती. आजही या पथकांनी घटनास्थळी येऊन रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं. मात्र, त्यानंतर दोन तासाने रेस्क्यू मृतांना श्रद्धांजली अर्पण करुन रेक्स्यू ऑपरेशन थांबवण्यात आलं. या पथकांनी रेस्क्यू ऑपरेशन थांबवल्यानंतर स्थानिकांनी त्यांना गराडा घातला. तुम्ही रेस्क्यू ऑपरेशन थांबवा. त्याबद्दल आमचा आक्षेप नाही. मात्र, जे लोक बेपत्ता आहेत. त्यांना मृत घोषित करा, अशी मागणी या नागरिकांनी केली.

पाहा व्हिडीओ :

(Ratnagiri Tiware village Landslides in 6 places bridges collapse due to heavy rain flood)

संबंधित बातम्या : 

Taliye Landslide : तुमचं दु:ख आम्ही जाणतो, उद्ध्वस्त तळीयेसाठी माळीणवासियांकडून मोठी मदत

भगतसिंह कोश्यारी तळीयेला भेट देणार, उद्धव ठाकरे,नारायण राणेंपाठोपाठ राज्यपाल ग्रामस्थांची विचारपूस करणार

आपत्तीग्रस्तांना पुनर्वसनासाठी तातडीने मदत करा, दरेकरांची राज्य सरकारकडे मागणी, तळीये गावातील जखमींची जे.जे. रुग्णालयात विचारपूस

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.