AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रवींद्र धंगेकर यांनी ठणकावलं, राहुल गांधी माफी मागणार नाहीत, त्यांच्या रक्तातच नाही, उलट आता….

कसबापेठ पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार असलेले रवींद्र धंगेकर विक्रमी मतांनी विजयी झाले. भाजपच्या उमेदवाराचा इथे पराभव झाला. त्यामुळे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात कसब्याची निवडणूक आणि विजयी काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांची चर्चा झाली.

रवींद्र धंगेकर यांनी ठणकावलं, राहुल गांधी माफी मागणार नाहीत, त्यांच्या रक्तातच नाही, उलट आता....
Image Credit source: tv9 marathi
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Mar 25, 2023 | 11:24 AM
Share

विनायक डावरुंग, मुंबई : देशातील भाजपचे सर्व नेते तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हुकुमशाही पद्धतीने वागत आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याविरोधात सूडातून कारवाई केली. त्यांनी देशाची माफी मागण्यासाठी भाजप (BJP) आंदोलन करत आहे. मात्र राहुल गांधी कधीही माफी मागणार नाहीत. माफी मागणं त्यांच्या रक्तातच नाही. माफी मागायला त्यांनी काहीही चुकीचं केलेलं नाही. आता या हुकुमशाही विरोधात देश रस्त्यावर उतरले, असा इशारा काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी दिला आहे. कसबापेठ पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार असलेले रवींद्र धंगेकर विक्रमी मतांनी विजयी झाले. भाजपच्या उमेदवाराचा इथे पराभव झाला. त्यामुळे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात कसब्याची निवडणूक आणि विजयी काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांची चर्चा झाली. राहुल गांधी यांच्यावर काल झालेल्या कारवाईवरून रवींद्र धंगेकर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.

रवींद्र धंगेकर काय म्हणाले?

शुक्रवारी राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले. यावरून महाराष्ट्र काँग्रेसकडून सोमवारी आंदोलन करण्यात येणार आहे. विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी मुंबईत असलेल्या रवींद्र धंगेकर यांनी यावरून प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘ राहुल गांधी माफी मागू शकत नाहीत त्यांच्या रक्तात ते नाही. त्यांनी काही चुकीचे केले नाही माफी मागायला. गेली सात वर्ष भाजपने विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न केला. केंद्रीय यंत्रणेत भाजपचा हस्तक्षेप पहायला मिळतोय. पंतप्रधान व इतर भाजप नेते हे लोकशाही ही हुकुमशाहीकडे नेहताना पहायला मिळते. लोकशाहीचे जे जे स्तंभ आहेत. त्याच्यावर दबाव आहे. त्या चारही स्तंभाला पकडून त्यांच्यावर दबाव टाकला जातोय, मात्र याविरोधात आता जनता रस्त्यावर उतरणार आहे.

‘OBC ना पुढे करून भाजपचे असफल प्रयत्न’

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्य नाना पटोले यांनीही भाजपवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, ‘ भाजपची परिस्थिती उलटा चोर कोतवाल को दाटे अशी आहे. obc ला पुढे करून असफल प्रयत्न भाजप करत आहे. देशाचे पंतप्रधान स्वतःला obc म्हणत आहेत. लोकांना साथ देणारा कोण आहे हे कळतं, राहुल गांधी जनतेचा आवाज बनले. नरेंद्र मोदी यांच्या विरोधात ते लढत आहेत. – काल लोकशाहीचा खून करण्याचं काम भाजप सरकारने केलंय. जे पाप करायचं होत ते केलं पण लोक आता रस्त्यावर उतरतील, असा इशारा नाना पटोले यांनी दिलाय.

Follow Us
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते?
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते? कोर्टातील सुनावणीत मोठा ट्विस्ट
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून...
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून... थेट बजावली नोटीस
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावर राजकारण, अखेर बच्चू कडू...
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावरून राजकारण, अखेर बच्चू कडूंची मोठी प्रतिक्रिया समोर