संजय शिरसाट आणि चंद्रकांत खैरे एकमेकांच्या कानात काय म्हणाले, शिरसाटांचं सूचक विधान; मराठवाड्यात काय घडतंय?
छत्रपती संभाजीनगरमध्ये 76 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला. यावेळी पालकमंत्री संजय शिरसाट आणि ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांची भेट झाली. शिंदे गटातील शिरसाट आणि उद्धव ठाकरे गटातील खैरे यांच्यातील मैत्रीपूर्ण वार्तालापानं सर्वांचे लक्ष वेधले. दोघांनीही एकमेकांचे कौतुक केले, राजकीय मतभेद बाजूला ठेवून सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण झाले.

छत्रपती संभाजीनगरमध्ये 76 वा प्रजासत्ताक दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट उपस्थित होते. तसेच ठाकरे गटाचे नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनीही यावेळी हजेरी लावली. एवढंच नव्हे तर खैरे यांनी शिरसाट यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. शिरसाट कायदेशीर पालकमंत्री आहेत, असे म्हणत त्यांची स्तुतीही केली. शिवसेना विभागून ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट पडले. शिरसाट हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले तर चंद्रकांत खैने हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आहेत. लोकसभा निवडणूक असो की विधानसभा निवडणूक, अथवा इतर कोणता कार्यक्रम, हे दोन्ही नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसले. मात्र आजच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात हे दोन नेते एकमेकांशी प्रेमाने हितगूज करताना दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्यात.
छत्रपती संभाजीनगरमध्ये आजचा प्रजासत्ताक दिन आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला पालकमंत्री संजय शिरसाट, चंद्रकांत खैरे, खासदार संदीपान भुमरे यांच्यासह नेक नेते , पदाधिकारी, पोलीस अधीक्षकही उपस्थित होते. शिवसेना फुटीनंतर दोन्ही गट सतत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसले, त्यामुळे कटुता होती. पण आज शिरसाट आणि खैरे यांनी मात्र एकमेकांशी हितगुज केले , त्यामुळे वेगळे चित्र होतं.
छोडो कल की बाते, कल की बाते पुरानी
पालकमंत्री संजय सिरसाट यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. खैरे यांच्याशी काय बोलणं झालं याबद्दल संजय शिरसाट यांन विचारणा करण्यात आली होती. तेव्हा शिरसाट यांनी मार्मिक उत्तर दिलं. ” खैरे साहेब ज्य़ेष्ठ नेते आहेत, त्यांना माझी भूमिका आवडली असेल, त्यांना प्रत्यय आला, त्यांचे आभार मानतो” असे ते म्हणाले. त्यांनी मला कानमंत्र दिला, मी त्यांना कानमंत्र दिला असे त्यांनी नमूद केलं. तर गेल्या वर्षी खैरे आणि संदीपान भुमरे यांच्यात वाद झाला होता. खैरे यांनी भुमरेंना घटनाबाह्य पालकमंत्री म्हणत त्यांचे अभिनंदन करणे टाळले होते. या सगळ्या प्रसंगाबद्दल शिरसाट यांनी भाष्य केले. ” छोडो कल की बाते, कल की बाते पुरानी नये दौर से लिखे नई कहानी” असं म्हणत शिरसाटांनी जुन्या वादावर बोलणं टाळलं.
