AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मिशन मद्यविक्री, महाराष्ट्राला 28 दिवसात 2100 कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित

महाराष्ट्रात देशी दारुची 3 हजार 327 आणि विदेशी मद्याची 1 हजार 348 दुकानं, तर 3 हजार 463 वाईन शॉप सुरु झाली आहेत (Revenue worth Rs 2100 crore expected by liquor sale in Maharashtra)

मिशन मद्यविक्री, महाराष्ट्राला 28 दिवसात 2100 कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित
| Updated on: May 05, 2020 | 11:17 AM
Share

मुंबई : केंद्रीय गृह मंत्रालयाने लॉकडाऊनच्या नियमात अंशतः शिथिलता आणत एकल दुकानांमध्ये मद्यविक्रीला परवानगी दिली आहे. महाराष्ट्रात 8 हजार दुकानांमध्ये मद्यविक्री सुरु झाली असून महिन्याभरात राज्य सरकारला मद्यविक्रीतून 2100 कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित आहे. (Revenue worth Rs 2100 crore expected by liquor sale in Maharashtra)

महाराष्ट्रात देशी दारुची 3 हजार 327 आणि विदेशी मद्याची 1 हजार 348 दुकानं, तर 3 हजार 463 वाईन शॉप सुरु झाली आहेत. राज्यात आठ हजार दुकानांमध्ये मद्यविक्री सुरु झाल्याने दररोज 80 कोटींच्या महसुलाची सरकारला अपेक्षा आहे. मे महिन्याच्या अखेपर्यंत 2100 कोटी रुपयांचा महसूल राज्य सरकारला अपेक्षित आहे. 4 मेपासून राज्यात मद्यविक्री सुरु झाल्याने 28 दिवसात 2100 कोटी मिळण्याची आशा आहे.

हेही वाचा : कर्नाटकचा कोटा फुल्ल, एकाच दिवसात दारुची विक्रमी विक्री

कंटेनमेंट झोन वगळता ‘रेड झोन’मध्येही मद्यविक्रीच्या दुकानांना सशर्त मुभा देण्याचं जाहीर झाल्यानंतर पहिल्याच दिवशी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. ग्राहकांनी नियम पायदळी तुडवत दारुच्या दुकानांबाहेर मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

मद्यप्रेमींच्या लांबलचक रांगांमुळे पोलिसांवर काही ठिकाणी दारुची दुकाने बंद करण्याची वेळ आली. कोरोनाच्या प्रसारावर नियंत्रण ठेवण्यासाठी देशात लॉकडाऊन असल्याने भारतात 45 दिवसाहून अधिक काळ ‘लिकर स्टोअर्स’ बंद आहेत.

मद्य खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना एकमेकांपासून सहा फुटांचे अंतर राखावे लागणार आहे. तसेच एकावेळी पाचपेक्षा अधिक ग्राहक दुकानात नसतील, याची खबरदारी दुकानदारांना घ्यावी लागणार आहे. मात्र सर्रास हे नियम धाब्यावर बसवल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा : तळीरामांचा बांध फुटला, एकमेकांना चिकटून रांगा, दारुच्या मज्जेसाठी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

उत्पादन शुल्क हे राज्य सरकारच्या अखत्यारित येते. मद्यावरील कर (उत्पादन शुल्क) हा राज्यांच्या उत्पन्नाच्या प्रमुख स्रोतांपैकी एक मानला जातो. बिघडलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी हा कर हातभार लावू शकतो, असं बोललं जातं. (Revenue worth Rs 2100 crore expected by liquor sale in Maharashtra)

कुठे काय स्थिती?

मुंबई, नाशिक, पुणे, कोल्हापूरमध्ये वाईन शॉप बंद असतानाच दुकानाबाहेर काही मद्यपी घुटमळत होते. वसई, विरार आणि नालासोपारामध्येही वाईन शॉपबाहेर लोकांच्या सकाळपासून रांगा लागल्या होत्या.

पुण्यात दारुची दुकानं न उघडल्याने काल सकाळी तळीराम हिरमुसले होते. नंतर ग्रीन सिग्नल मिळताच पुन्हा गर्दी झाली होती. पण पोलिसांना ही गर्दी हटवावी लागली. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मद्य विक्रीवरील बंदी कायम आहे. राज्य सरकारच्या निर्णयानंतरही सोलापूर, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, अमरावती अशा काही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत.

औरंगाबादेत दारूची दुकाने उघडण्याला एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांचा विरोध  आहे. औरंगाबादमध्ये दारुची दुकानं उघडल्यास महिलांसह रस्त्यावर उतरु, असा इशारा इम्तियाज जलील यांनी दिला. (Revenue worth Rs 2100 crore expected by liquor sale in Maharashtra)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.