Rip Lata Mangeshkar : अखेरचा हा तुला दंडवत… लाडक्या गान सम्राज्ञीला अखेरचा निरोप; पंतप्रधान नरेंद्र मोदींसह नेते, सेलिब्रिटींची अंत्यसंस्काराला हजेरी

लतादिदींवर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी देशाचे पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) उपस्थित लावत आदरांजली वाहिली.

Rip Lata Mangeshkar : अखेरचा हा तुला दंडवत... लाडक्या गान सम्राज्ञीला अखेरचा निरोप; पंतप्रधान नरेंद्र मोदींसह नेते, सेलिब्रिटींची अंत्यसंस्काराला हजेरी
फक्त नेतेमंडळीच नाही तर बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनीही आंदरांजली वाहण्यासाठी उपस्थिती लावली होती. यावेळी शाहरुख खान, जावेद अख्तर अशी अनेक मंडळी छत्रपती शिवजी पार्कवर दाखल झाल्याचे दिसून आले.
Follow us
| Updated on: Feb 06, 2022 | 8:06 PM

मुंबई : लतादिदींच्या (Lata Mangeshkar) जाण्याने देशाचा सूर हरपला आहे. सारा देश हळहळ व्यक्त करत आहे. लतादिदींवर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी देशाचे पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) उपस्थित लावत आदरांजली वाहिली. (Rip Lata Mangeshkar)  दिदींना निरोप देण्यासाठी अनेक क्षेत्रातील दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे असे मोठे नेतेही उपस्थित होते. त्याचबोरबर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील सुभाष देसाई हे मंत्रीही अंत्यस्काराला आलेले दिसून आले. राज ठाकरेही परिवारासह उपस्थित होते. फक्त राज्यातील मंत्रीच नाही तर केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी हजेरी लावत आदरांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाजूला देवेंद्र फडणवीस बसले होते मात्र मुख्यमंत्र्यांना बघताचं फडणवीस उठले आणि मुख्यमंत्र्यांना मोदींशेजारी जागा दिली. सारा देश सध्या दिदींच्या जाण्याने शोकसागरात बुडाला आहे.

बॉलिवूडमधील दिग्गजांचीही उपस्थिती

फक्त नेतेमंडळीच नाही तर बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनीही आंदरांजली वाहण्यासाठी उपस्थिती लावली होती. यावेळी शाहरुख खान, जावेद अख्तर अशी अनेक मंडळी छत्रपती शिवजी पार्कवर दाखल झाल्याचे दिसून आले. यावेळी भारतरत्न सचिन तेंडूलकरही यांनीही हजेरी लावत आदरांजली वाहिली. राज्य सरकारने दुखवटा जाहीर केला आहे. त्यानिमित्ताने उद्या सोमवार 7 फेब्रुवारी रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. केंद्र सरकारपाठोपाठ राज्य सरकारनेही राजकीय दुखवटा जाहीर केल्याने दोन दिवस सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तसेच मंत्रालयावरील तिरंगा झेंडा अर्ध्यावर उतरवण्यात आला आहे. तसेच संसदेसह देशभरातील विधानसभा, मंत्रालये, सचिवालये आणि सरकारी कार्यालयांवरील तिरंगा अर्ध्यावर उतरवण्यात आला आहे.

कधीही न भरून निघणारे नुकसान

लता मंगेशकर यांचं आज सकाळी 8 वाजून 12 मिनिटांनी दीर्घ आजाराने निधन झालं. त्या तब्बल 28 दिवस ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत होत्या. काल त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्या उपचाराला प्रतिसादही देत नव्हत्या. अखेर आज सकाळी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनानंतर केंद्र आणि राज्य सरकारने दुखवटा जाहीर केला आहे. राज्य सरकारने यासंदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, आज रविवार 6 फेब्रुवारी रोजी भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले असून त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली आहे.

Lata Mangeshkar: बंगालमध्ये 15 दिवस सार्वजनिक ठिकाण, ट्रॅफिक सिग्नलवर लतादीदींची गाणी वाजणार, उद्या हाफडे सुट्टी; ममता बॅनर्जींची घोषणा

Lata Mangeshkar Funeral : पंतप्रधान मोदींनी शिवाजी पार्कवर वाहिली लतादीदींना श्रद्धांजली, दिग्गजांची उपस्थिती

Lata Mangeshkar Funeral Pics : अंत्ययात्रेत जनसागर उसळला! अखेरचा निरोप देताना अश्रू अनावर

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.