BMC Mayor Ritu Tawde : मुंबईच्या महापौरांच एक कोटीचं घड्याळ? ट्रोल होताच रितू तावडे काय म्हणाल्या ?
Ritu Tawde Rolex Watch : मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी हातात घातलेलं घड्याल कोट्यवधी रुपयांचं असल्याचा दावा करण्यात आला होता. सोशल मीडियावर तसे काही फोटोही फिरत होते. यावरून तावडे ट्रोलही झाल्या, त्यानंतर त्यांनी पुढे येऊन स्पष्टीकरण दिलं आहे.

मुंबई महानगरपालिकेवर अनेक दशकांनी भाजपचा झेंडा फडकला आहे. महापालिका निवडणुकीत बहुमत मिळाल्यावर भाजपच्या रितू तावडे यांची मुंबईच्या महापौर म्हणून निवड झाली. निवडणुका पार पडल्या असल्या तरी रितू तावडे या सध्या खूप चर्चेत आहे, पण ते त्यांच्या कामामुळे नव्हे तर वेगळ्याच गोष्टीमुळे. सध्या जो फोटो रितू तावडे यांचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायर झाला आहे आणि त्यातील घड्याळाने सर्वांच लक्ष वेधून घेतलंय. याच घड्याळामुळे त्यांच्याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. रितू तावडे यांच्या मनगटावर असलेलं घड्याळ अत्यंत महागडं असून त्याची किंमत कोट्यवधी असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यावरूनच तावडे यांना ट्रोलही करण्यात आलंय.
काय आहे प्रकरण ?
रितू तावडे यांचा जो फोटो व्हायरल झाला, त्यात त्यांच्या मनगटावर असलेल्या घड्याळाने लोकांचं लक्ष वेधलं. रितू तावडे यांनी घातलेलं हे घड्याळ ‘Rolex येलो गोल्ड डेटोना’ हे मॉडेल आहे, असा दावा सोशल मीडियावर अनेकांनी केला आहे. Rolex कंपनीच्या या मॉडेलची किंमत सुमारे 60 ते 70 लाख असून भारतात तर त्याचं मूल्य 1 कोटींच्या आसपास आहे, असंही सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं. त्यावरून तावडे या बऱ्याच ट्रोलही झाल्या, अनेकांनी त्यांच्यावर
महापौरांनी काय दिलं उत्तर ?
मात्र या मुद्यावरून ट्रोलिंग होताच स्वत: महापौर , रितू तावडे याच समोर आल्या आणि त्यांनी सोशल मीडियावरच एक पोस्ट टाकत हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. रितू तावडे यांनी X वर एक ट्विट करत घड्याळाबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. ‘ ही पोस्ट पूर्णपणे खोटी व दिशाभूल करणारी आहे. माझ्या हातातील घड्याळ Michael Kors कंपनीचे आहे, ते Rolex Daytona नाही. त्यामुळे लाखो-कोट्यवधींचा प्रश्नच उद्भवत नाही.अफवा पसरवणे हा बेजबाबदारपणा आणि जाणीवपूर्वक बदनामीचा प्रयत्न आहे.’ असं म्हणत त्यांनी सर्व दावे फेटाळून लावले आणि टीकाकारांनाही चोख प्रत्युत्तर दिलंय.
ही पोस्ट पूर्णपणे खोटी व दिशाभूल करणारी आहे.
माझ्या हातातील घड्याळ Michael Kors कंपनीचे आहे, ते Rolex Daytona नाही. त्यामुळे लाखो-कोट्यवधींचा प्रश्नच उद्भवत नाही.
अफवा पसरवणे हा बेजबाबदारपणा आणि जाणीवपूर्वक बदनामीचा प्रयत्न आहे.
अशा खोट्या आरोपांना मी भीक घालत नाही. https://t.co/QqeuQWze27 pic.twitter.com/JQJlTQCbff
— Ritu Tawde (@TawdeRitu) February 26, 2026
