AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Pawar : MPSC चे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याबद्दल रोहित पवार यांचा मोठा गौप्यस्फोट, त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा पाठवलाय पण..

Rohit Pawar : पुण्यामध्ये सध्या MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु आहे. MPSC चे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. आता या विषयात रोहित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

Rohit Pawar : MPSC चे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याबद्दल रोहित पवार यांचा मोठा गौप्यस्फोट, त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा पाठवलाय पण..
Rohit Pawar
| Updated on: Oct 06, 2026 | 10:10 AM
Share

प्रदीप कापसे, प्रतिनिधी : महाराष्ट्र लोक सेवा आयोगाचे वर्तमान अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याबद्दल रोहित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. “नैतिकता लक्षात घेता, विद्यार्थ्यांचं आंदोलन बघता नाव खराब झालेलं आहे. पेपर विवेक भीमनवार यांच्या काळात फुटला. नैतिकता न दाखवल्यामुळे त्यांच्याबद्दल वाईट वातावरण तयार झालेलं आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांना राजीनामा पाठवलेला आहे. विषय इतकाच आहे की, भीमनवारांनी मुख्यमंत्र्यांना राजीनामा पाठवून काही होणार नाही. तो राजीनामा राज्यपालांना देणं गरजेचं होतं. त्यांनी विषय पूर्णपणे मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात टाकलेला आहे. पण मुख्यमंत्र्यांसमोर प्रश्न हा आहे की, जर भीमनवारांचा राजीनामा घेतला, तर सामान्य माणसं कोणाचाही राजीनामा मागतील. उद्या मुख्यमंत्र्यांचाही राजीनामा मागितला जाऊ शकतो. आता हा सर्व इगोचा खेळ झालाय” असा दावा रोहित पवार यांनी केला.

“एकाबाजूला मित्राला वाचवायचं, दुसरीकडे इगो मेन्टेन करायचा. लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य, स्वप्न का मारली जातायत?. महाराष्ट्रातल्या तेरा ते साडेतेरा कोटी लोकांचं चांगल्या प्रशासनाचं स्वप्न का मारलं जातय? मुख्यमंत्र्यांच्या इगोमुळे. भीमनवार मुख्यमंत्र्यांचे जीवलग मित्र आहेत. राज्यपालांकडे त्यांचा राजीनामा गेला पाहिजे होता. भीमनवारांनी कदाचित त्यांची खेळी खेळली असावी. मी याच्यामध्ये नाहीय. मी राजीनामा तुम्हाला पाठवतोय. हा राजीनामा मी राज्यपालांकडे पाठवू की काय करु, तुम्ही ठरवा” असा दावा रोहित पवार यांनी केला.

भीमनरावांनी शॉर्टकर्ट काढला

“मुख्यमंत्र्यांना आता हे ठरवायचय की, लाखो विद्यार्थ्यांचं, महाराष्ट्राच्या जनतेचं भविष्य महत्वाचं आहे की, इगो आणि मैत्री. राजीनामा मुख्यमंत्र्‍यांकडे देऊन चालत नाही, तो राज्यपालांकडे पाठवावा लागतो. भीमनरावांनी शॉर्टकर्ट काढला, त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना राजीनामा पाठवला. माझ्याकडे माहितीय त्यानुसार त्यांनी मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढवला आहे. आता मुख्यमंत्र्यांना ठरवायचय की, मित्राला वाचवायचं की इगो मेन्टेन करायचा की विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करायच्या” असं रोहित पवार म्हणाले.

राज्यपालांकडे राजीनामा दिला पाहिजे

“या संस्थेपासून लांब होण्यासाठी, विद्यार्थ्यांचा रोष घेण्याची भीमनवारांची इच्छा नाहीय. त्यांनी मित्राकडे राजीनामा दिला आहे. खरंतर मित्राकडे राजीनामा देऊन काय होणार, राज्यपालांकडे राजीनामा दिला पाहिजे. मुख्यमंत्री काय करतायत, मित्राला वाचवातयात, स्वत:च्या इगोला ताकद देतायत आणि राज्यातल्या विद्यार्थ्यांचं भवितव्य कुठेतरी अडचणीत आणतायत” असा आरोप रोहित पवारांनी केला.

Follow Us
पुणे MPSC आंदोलनातून पोलिसांनी हटवल्या LED स्क्रीन, 80 विद्यार्थ्यांना
पुणे MPSC आंदोलनातून पोलिसांनी हटवल्या LED स्क्रीन, 80 विद्यार्थ्यांना नोटिसा
मुंबईतील बेकायदा फ्लेक्सवर महापालिकेचा दणका; आता जाहिरातींसाठी नवे...
मुंबईतील बेकायदा फ्लेक्सवर महापालिकेचा दणका; आता जाहिरातींसाठी नवे नियम काय?
इंडिया आघाडीच्या आंदोलनाचं आयोजन मात्र, मित्र पक्षाचा सहभाग नाही;
इंडिया आघाडीच्या आंदोलनाचं आयोजन मात्र, मित्र पक्षाचा सहभाग नाही; पक्षाने मांडली स्पष्ट भूमिका
प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, नेमकं कारणही...
प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, नेमकं कारणही आलं समोर
कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ! अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी...
कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ! अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्ध्यातच थांबवलं भाषण, नेमकं काय घडलं?
संसद ते निवडणूक आयोग! ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा महा
संसद ते निवडणूक आयोग! ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा महामोर्चा, जय्यत तयारी
राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण; म्हणाले, ‘ते...
राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण; म्हणाले, ‘ते विधान दिशाभूल करणारं...
कल्याणमध्ये भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड
Kalyan : कल्याणच्या सहजानंद चौकात भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड, नेमकं काय घडलं?
पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट, नेमकं काय घडलं?
आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून....
Raj Thackeray : आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात