AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Pawar : मेल करुन तो मुलगा आता म्हणतो MPSC चा पेपर फुटलाच नाही, मग आता रोहित पवारांची भूमिका काय?

Rohit Pawar : गौरव पाटील आणि लोकेश पाटील या दोघांनी काल रात्री एमपीएससीला मेल करून कळून ही तक्रार खोटी आहे असं सांगितलं. पेपर फुटला त्याचा काही संबंध नाही. हा एक बनाव होता. जो पेपर फुटला तो लोकल परीक्षेचा होता, असं मेलमध्ये म्हटलंय.

Rohit Pawar : मेल करुन तो मुलगा आता म्हणतो MPSC चा पेपर फुटलाच नाही, मग आता रोहित पवारांची भूमिका काय?
Rohit Pawar
| Updated on: Jul 27, 2026 | 2:09 PM
Share

एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदाच्या भरतीचा पेपर फुटल्याच्या बातमी सकाळी समोर आली. पण आता एमपीएसीकडून हा पेपर फुटलाच नसल्याचा दावा करण्यात आला आहे. तृषार पाटीलने MPSC ला मेल पाठवून ही तक्रार खोटी असल्याचं सांगितलं. आज सकाळी रोहित पवार यांनी या संबंधी पत्रकार परिषद घेऊन पेपर फुटल्याचे खळबळजनक दावे केले होते. हे पेपर फुटीचं प्रकरण खोट असल्याच समजल्यानंतर टीव्ही 9 मराठीने त्यांच्याशी संवाद साधला. त्यावर रोहित पवार यांनी आपण आपल्या आरोपांवर ठाम असल्याचं सांगितलं. “बनाव रचला असं ते म्हणत असतील ते पत्र ज्या तृषार पाटीलने दिलं त्याला आधी उचला आणि विचारा त्याने अशी फसवणूक का केली?.आमच्याकडे आलेले ते सगळे पुरावे तितकेच खरे आहेत. त्यामुळे त्या पुराव्यांची शहानिशा होणं तितकचं गरजेचं आहे” असं रोहित पवार म्हणाले.

“फक्त असं म्हणत असतील की ज्याने तक्रार केली तो म्हणतो ती तक्रार खरी नाही, यावर काही आम्ही थांबणारी लोकं नाही. हा सगळा मुद्दा मला काही तृषार पाटलांकडून आलेला नाही. तिसऱ्या लोकांकडून आला आहे. एमपीएससीचा पेपर फुटला असेल अशा पद्धतीने तर ती आमच्यासाठी धोक्याची घंटा आहे. अशी गोष्ट घडू नये यासाठी हा मुद्दा हातात घेणं गरजेच आहे” असं रोहित पवार म्हणाले.

पण कोर्टात गेल्यावर भ्रष्टाचार सिद्ध झाला

“आमच्याकडे पुरावे आलेत. त्यावर तुम्हाला टेक्निकलीच उत्तर द्यावं लागेल. तलाठी भरतीच्यावेळी घशाला कोरड पडेपर्यंत ओरडून बोललो. पण आमचं म्हणणं नाकारलं. पण कोर्टात गेल्यावर भ्रष्टाचार सिद्ध झाला. 100 पैकी 90 प्रश्न सारखे असतील तर पेपर फुटलाच म्हणणार ना” असं रोहित पवार म्हणाले.

जो पेपर फुटला तो लोकल परीक्षेचा होता

गौरव पाटील आणि लोकेश पाटील या दोघांनी काल रात्री एमपीएससीला मेल करून कळून ही तक्रार खोटी आहे असं सांगितलं. पेपर फुटला त्याचा काही संबंध नाही. हा एक बनाव होता. जो पेपर फुटला तो लोकल परीक्षेचा होता, असं मेलमध्ये म्हटलंय.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार