Rohit Pawar : फडणवीस सरकारने 10-12 दिवसांत निर्णय घ्यावा, अन्यथा…; दुष्काळ स्थितीवरून रोहित पवारांचा संताप, दिला शेवटचा अल्टिमेटम
महाराष्ट्रातील शेतकरी दुष्काळ स्थितीवरून खचून गेला आहे. त्यांना सरकारकडून मदत मिळावी, यासाठी रोहित पवारांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

राज्यात दुष्काळामुळे शेतकऱ्यांची स्थिती बिकट होऊ लागली आहे. शेतकऱ्यांचं सोयाबीन आणि अन्य पीक करपून गेलं आहे. हातातोंडाशी आलेला घास संकटाने हिरावून घेतल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांची हीच दयनीय परिस्थिती पाहण्यासाठी विरोधकांनंतर आता सत्ताधाऱ्यांकडून दुष्काळ दौरे केले जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांची भेट घेत आहेत. आता शेतकऱ्यांचा राज्यात दुष्काळ घोषित करावा, अशी मागणी केली जात आहे. तसेच आर्थिक मदत जाहीर करावी, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. परंतु सरकारने अद्याप दुष्काळ जाहीर केलेला नाही. शेतकऱ्यांच्या मागणीवरून आमदार रोहित पवारांनी सरकार अल्टिमेटम दिला आहे. सरकारने येत्या 10-12 दिवसांत निर्णय घ्यावा, अशी मागणई केली आहे.
रोहित पवार यांचा आज गुरुवारी बीडमध्ये मोर्चा आहे. या मोर्चादरम्यान रोहित पवारांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारला अल्टिमेटम दिला आहे. जर तुम्ही पुढच्या दहा-बारा दिवसांत शेतकऱ्याच्या बाजूने निर्णय घेतले नाही, तर सरकारला हे महागात कसं पडेल, आम्ही घोषणा करणार आहोत’. शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर बोलताना म्हटलं की, ‘हा शेतकऱ्यांचा आक्रोश आहे. कर्जमाफीपासून 90 ते 95 टक्के लोक वंचित राहिले आहेत. चालू बाकीदार त्यांचे मत आहे. आम्हाला पन्नास हजार नोक. दोन लाख रुपये मदत दया. जनावर जगवायची कशी, असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. शेतकरी आक्रमक झाल्यानंतर आपल्याला ऐकावं लागतं, आम्ही काय कुठे बॅरिकेट लावलेले नाहीत, आम्ही प्रामाणिकपणे लोकांच्या अडचणी समजून घेत आहोत. इथे असलेले लोकप्रतिनिधी खासदार पिक विमा मिळवण्यासाठी प्रयत्न करत नाहीत. इथे असलेले एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचे नेते आहेत त्या संदर्भात पाठपुरावा करत नाहीत, याची नाराजगी लोकांमध्ये आहे. मुख्यमंत्र्यांनी काल शब्द दिलाय, सरसकट नुकसान झाल आहे, मग सरसकट नुकसान भरपाई द्यायला काय हरकत आहे, असा सवाल रोहित पवारांनी केला .
‘पेट्रोल डिझेलचे भाव वाढल्याने खताचे भाव वाढले आहेत. शेतकऱ्यांचा खर्च वाढला आहे. पवार साहेब हे निर्णय घेऊन सोयाबीनचा भाव नेहमी चांगला ठेवायचे. भाव खाली यायला लागले की पवार साहेब निर्यात चालू करायचे, आयात ते कधी करत नव्हते. उत्पादन होणाऱ्या वस्तूचा खर्च भाव स्थिर केला जात होता, उत्पादकता खर्च कमी ठेवला जात होता. आज ज्या गोष्टीचे उत्पादन होतं, तिथे पैसे मिळत नाहीत आणि उत्पादनाचा खर्च वाढल. उद्या जाऊन जर शेतकऱ्याच्या बाजूने निर्णय घ्यायचा असेल, तर उत्पादन खर्च कमी कसा राहील, हे आम्हाला बघावं लागेल आणि उत्पादन होईल, त्याला कसा जास्त भाव मिळेल हे करावे लागेल, असे रोहित पवार यांनी सांगितले.
