AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या बहिऱ्या सरकारला आंदोलनाची दखल घ्यावी लागेल म्हणत शिंदे-फडणवीस सरकारवर रोहित पवारांची टीका, आणखी काय म्हणाले रोहित पवार

महाराष्ट्राची आदरयुक्त भीती अनेक राज्यांना आहे. कर्नाटकला देखील आहे. पण चार महिन्यांनी तिथे निवडणुका आहे म्हणून त्यांनी अस्मितेचा मुद्दा समोर आणला आहे.

या बहिऱ्या सरकारला आंदोलनाची दखल घ्यावी लागेल म्हणत शिंदे-फडणवीस सरकारवर रोहित पवारांची टीका, आणखी काय म्हणाले रोहित पवार
Image Credit source: Google
| Updated on: Dec 17, 2022 | 10:31 AM
Share

मुंबई : महाराष्ट्राच्या अस्मितेला ठेच पोहचविण्याचे काम अनेक लोकांनी केला आहे. हा विचार आमच्यासाठी महत्वाचा आहे. हा विचार हजारो वर्षांपासून आहे. त्याला आम्हाला पुढे घेऊन जायचे आहे. आणि त्यालाच काही राजकीय लोकं ठेच पोहचवणार असतील तर ते आम्ही महाराष्ट्राचे नागरिक म्हणून सहन करणार नाही अशी प्रतिक्रिया रोहीत पवार यांनी दिली आहे. याशिवाय महाराष्ट्राची अस्मिता त्यांच्यासाठी महत्वाची नाही. त्यांच्यासाठी त्यांची पार्टी, त्यांचा विचार महत्वाचा त्यांना महत्वाचा वाटतो. त्यांची लोकं त्यांना महत्वाची वाटतात, पण आम्हाला आमची महाराष्ट्राची अस्मिता महत्वाची वाटते म्हणून आम्ही आवाज उठवत आहोत. शिंदे सरकार माफी मांगो आंदोलन करत आहे पण राज्यपाल यांच्या विरोधात करत नाही. कर्नाटक सरकारच्या विरोधात आंदोलन करत नाही. अनेक नेत्यांनी महराष्ट्राचा अवमान केला त्याच्या विरोधात शिंदे-फडणवीस सरकार विरोध करत नाही असं रोहित पवार यांनी म्हंटले आहे.

रोहित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल करत जहरी टीका केली आहे. महाराष्ट्राच्या जनतेत खदखद होती आणि तीच खदखद आजच्या आंदोलनातून बाहेर आली.

महाराष्ट्राची आदरयुक्त भीती अनेक राज्यांना आहे. कर्नाटकला देखील आहे. पण चार महिन्यांनी तिथे निवडणुका आहे म्हणून त्यांनी अस्मितेचा मुद्दा समोर आणला आहे.

मंत्री जेव्हा कर्नाटक मध्ये जाणार असतो तेव्हा त्यांना ते लोकं येऊ नका म्हणून इशारा देतात आणि हे जात नाही म्हणजे न झुकणारा महाराष्ट्र तिथे झुकला असा अर्थ तिथे निघाला आहे अशी टीका सुद्धा रोहित पवार यांनी केली आहे.

याशिवाय हे सरकार बहिरे सरकार असल्याची टीका देखील रोहित पवार यांनी केली असून शिंदे-फडवणीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न.
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप.
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर.
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान.
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद.
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड.
BMC साठी भाजपची टीम सज्ज, 20 जणांची समिती जाहीर; कोणा-कोणाचा सहभाग?
BMC साठी भाजपची टीम सज्ज, 20 जणांची समिती जाहीर; कोणा-कोणाचा सहभाग?.
कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत
कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत.
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा.
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?.