
बारामतीजवळ विमान क्रॅश होऊन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाला. गेल्या महिन्यात, 28 जानेवारील झालेल्या या दुर्घटनेला, आता 1 महीना पूर्ण होत आला आहे. अजित दादांच्या अकस्मात जाण्याने अख्खा महाराष्ट्र हळहळला, पवार कुटुंब, बारामतीकरांनी साश्रू नयनांनी अजित पवारांना अखेरचा निरोप दिला. मात्र त्यांच्या मृत्यूनंतर हाँ विमान अपघात की घातपात असे सवाल उपस्थित होते असून राष्ट्रवादी शरद पवार गाटचे नेते, अजित पवारांचे पुतणे रोहित पवार यांनी हा मुद्दा अगदी लावू धरला. मुंबई, दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदा असो की खाजगी गुप्तहेह संघटनांकडून करून घेतलेला तपास, अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या मुद्यावरून रोहित पवार हे सातत्याने भूमिका मांडताना दिसत आहेत
याप्रकरणी व्हीएसआर कंपनी आणि डीजीसीए विरोधात गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी काल ते मुंबईत आणि नंतर आज बारामती येथील पोलिस स्टेशनमध्ये गेले. मात्र अजूनही पोलिसांनी एफआयर दाखल करून घेतलेली नाही. बारमतीमध्ये पोलिसांशी साधारण दोन तास चर्चा केल्यानंतरही काहीच प्रगति झाली नाही, त्यानंतर रोहित पवार, युगेंद्र पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी रोहित पवार यांनी विमानातील त्रुटी, व्हीएसआरचा कारभार यावर बोट ठेवत एफआयआर दाखल न करून घेतल्यानबद्दल नाराजीही व्यक्त केली. याचदरम्यान एका पत्रकाराकडून करण्यात आलेल्या प्रश्नामुळे ते चांगलेच भडकलेले दिसले.
प्रेशर टॅक्टिक्ट्स वापरताय, सवाल ऐकताच संतापले रोहित पवार
अजित पवार यांचं निधन झालं त्या दिवसापासूनच दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबतच्या चर्चांना जोर आला. विलीनकरण व्हावं अशी अजित पवारांची इच्छा होती, बैठकाही झाल्या, असं शरद पवार गटाच्या अनेक नेत्यांनी बोलून दाखवलं. मात्र अजित पवार गटाकडून या विलीनीकरणाच्या मुद्याला जास्त हवा दिली गेली नसून, त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.
हाच मुद्दा धरत एका पत्रपकाराने रोहित पवारांना प्रश्न विचारला. विलिनीकरण होत नाही म्हणून रोहित पवार प्रेशर टॅक्टिक्ट्स वापरत आहे, अजित पवार यांच्या अपघाता मृत्यूचा मुद्दा एवढा लावून धरत आहेत, अशी चर्चा आहे. हे ऐकताच रोहित पवार संतापले.
शरद पवारांची अवस्था पाहून अजितदादांच्या डोळ्यात पाणी…
त्यावर त्यांनी अगदी रोखठोक, स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं. सर्वात आधी मीच म्हटलं होतं की विलिनीकरण करून आता काय फायदा नाही आणि आम्हाला आता करायचं नाही. पण पवार साहेबांचं वय पाहता, अजितदादांची ती (विलीनीकरण )भावनिक इच्छा होती. पवार साहेबांसोबत येणं ही त्यांची भावनिक इच्छा होती असं रोहित पवार म्हणाले.
अजित दादा 18 वर्षांचे होते, तेव्हा त्यांचे वडील वारले. अनंत आजोब जेव्हा गेले, त्यानंतर (शरद) पवार साहेबांनी अजितदादांना मुलासारखं वागवलं. आणि हे अजितदादांच्या मनात होतं, ते त्यांनी आम्हाला बोलून दाखवलं. रेवतीचं लग्न ठरलंय, हे सांगण्यासाठी जेव्हा पवार साहेबांनी अजितदादांना फोन केला, तेव्हा मी तिथे होतो. पण पवार साहेबांना कफ असल्याने त्यांना बोलता येत नव्हतं. साहेब काय बोलतात हे अजितदादांना कळत नव्हतं. त्यामुळे ही परिस्थिती पाहिल्यावर दादांच्या डोळ्यात पाणी आलं होतं, मी ते पाहिलं आहे. अशी भावना अजित दादांची होती, मग असं असताना आम्ही राजकारण का करू? असा सवाल रोहित पवार यांनी विचारला. अरे नको आम्हाला हे विलिनीकरण, पण अजितदादांना न्याय तरी द्या. एफआयआर तरी दाखल करा. साधा एफआयआर होत नसेल तर अजितदादांना न्याय कसा मिळणार, असं आमचं आणि लोकांचं मत आहे, हे बोलताना रोहित पवार अतिशय भावनाविवश झालेले दिसले.
विधानसभेला, अजितदादांच्या विरोधात बारामतीतून कोण उभं होतं?. युगेंद्र. युगेंद्र आज इथे आहे ना. मला पहिलं जिल्हा परिषदेचं तिकीट दादांनी दिलं. मला आमदारकीचं पहिला तिकीट दादांनी दिलं. आणि राजकारणात आम्ही येण्यापूर्वी आम्ही लहानपणापासून आम्ही त्यांचे पुतणे आहोत. त्यांनी आम्हाला मांडीवर खेळवलंआहे. आम्ही त्यांच्यासाठी नाही लढायचं का ? असा सवालही रोहित पवार यांनी विचारला. नायकवडी आणि मिटकरी आले, बाकीचे लोक आले नाहीत. ते मी काय सांगणार. त्यांच्या मनात असेल पण त्यांना येत नसेल असंही ते म्हणाले.