Malegaon Blast Case : मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याच्या निकालावर RSS प्रमुखांची तीन शब्दात प्रतिक्रिया
Malegaon Blast Case : आज 17 वर्षांनी मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाला आला आहे. त्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांची प्रतिक्रिया आली आहे.

राष्ट्र सेविका समितीच्या पूर्व संचालिका प्रमिला ताई मेंढे यांचं सकाळी निधन झालं. त्यांच्या पार्थिवाचे सर संघचालक मोहन भागवत यांनी दर्शन घेतलं. त्यावेळी मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याच्या निकालावर पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली. त्यावर सर संघचालकांनी ‘संघाचा सबंध नाही’ एवढच उत्तर दिलं. मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात आज तब्बल 17 वर्षांनी निकाल लागला. मालेगावच्या भिक्कू चौकात 29 सप्टेंबर 2008 रोजी बॉम्बस्फोट झाला होता. यात 6 जणांचा मृत्यू झाला. 100 नागरिक जखमी झालेले.
संपूर्ण देशाच लक्ष या निकालाकडे लागलं होतं. सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. एनआयए कोर्टाने हा निकाल दिला. यात संशयित आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह सात जणांना मृत्युदंडाची शिक्षा देण्याची मागणी एनआयएने न्यायालयाकडे केली होती. पण आज विशेष न्यायालयाने निकाल देताना 17 वर्षानंतर सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
साध्वी प्रज्ञा सिंग यांच्याबद्दल न्यायालयाने काय म्हटलं?
साध्वी प्रज्ञा सिंग यांच्या नावाने असलेल्या बाईकचा चेसिस नंबर नीट अढळला न्हवता. नंबरप्लेट व्यतिरिक्त चेसिस नंबर आवश्यक असतो. मालेगाव बॉम्बस्फोटाच्या दोन वर्ष आधी साध्वी प्रज्ञा सन्यासी बनल्या. भौतिक संपत्तीपासून त्या लांब होत्या असं कोर्टाने म्हटलय. मालेगावमध्ये स्फोट झाला हे फिर्यादी पक्षाने सिद्ध केलं. पण घटनास्थळी सापडलेल्या मोटरसायकलवरच तो बॉम्ब ठेवलेला होता हे सिद्ध करता आलं नाही असं कोर्टाने म्हटलय.
एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया काय?
“हिंदू सहिष्णू आहे. त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला. तो देशविघातक कृत्य करत नाही हे आजच्या निकालावरुन स्पष्ट झालय. न्याय उशिरा मिळाला. त्यांना न केलेल्या कृत्याची शिक्षा भोगावी लागली” असं एकनाथ शिंदे म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया काय?
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “आतंकवाद भगवा न कभी था, ना है, ना कभी रहेगा”, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “जर सरकारने त्यावेळी योग्य पुरावे दिले असते, तर गुन्हेगार सुटले नसते”, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं.
