Hingoli lockdown update: दूध, भोजन घरपोच मिळेल, पण लग्न करायचे तर कोर्ट मॅरेजच करा; जिल्हाधिकाऱ्यांचं फर्मान

हिंगोली जिल्ह्यातही कोरोनाचा कहर वाढला आहे. त्यामुळे हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्ह्यात सात दिवसांची संचारबंदी जाहीर केली आहे. (ruchesh jayvanshi on announced 7 days curfew in hingoli)

Hingoli lockdown update: दूध, भोजन घरपोच मिळेल, पण लग्न करायचे तर कोर्ट मॅरेजच करा; जिल्हाधिकाऱ्यांचं फर्मान
प्रातिनिधिक छायाचित्रं

हिंगोली: हिंगोली जिल्ह्यातही कोरोनाचा कहर वाढला आहे. त्यामुळे हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्ह्यात सात दिवसांची संचारबंदी जाहीर केली आहे. या काळात बाहेर फिरणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा जयवंशी यांनी दिला आहे. तसेच लग्न करायचे असेल तर थेट कोर्ट मॅरेज करा, असं फर्मानच जयवंशी यांनी सोडलं आहे. राज्यात 50 व्यक्तिंच्याच उपस्थितीत लग्न करण्याची परवानगी असताना जिल्हाधिकाऱ्यांनी थेट कोर्ट मॅरेज करण्याचा सल्ला दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. (ruchesh jayvanshi on announced 7 days curfew in hingoli)

हिंगोली जिल्ह्यात वाढत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी 7 दिवसांची कडक संचारबंदी सुरू केली आहे. ही संचारबंदी 29 मार्चच्या सकाळी 7 वाजल्यापासून तर 4 एप्रिलच्या रात्री 12 वाजेपर्यंत असणार आहे. या संचारबंदीच्या काळात जिल्ह्यातील सर्व व्यक्ती, वाहने यांच्या हालचालीस प्रतिबंध करण्यात आला आहे. किराणा, भाजीपाला, पेट्रोल पंप, जिल्हा अंतर्गत बस सेवा, कृषी दुकाने, शाळा, महाविद्यालये, प्रार्थना स्थळे, मद्याविक्री आदी गोष्टी कडकडीत बंद राहणार आहेत, असं जयवंशी यांनी सांगितलं. तसेच

रस्त्यावर फिरणाऱ्यांची खैर नाही

विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर साथ रोग प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हे दाखल केले जाणार आहेत. तसेच सर्व शासकीय कार्यालय मात्र अंतर्गत कामकाजासाठी सुरू राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या संचारबंदीच्या काळात मेडिकल्स, रुग्णालये आणि कोरोना तापसनी केंद्र सुरूच असणार आहेत. तर संचारबंदीच्या काळात दूध, कुरिअर, भोजनालय, हॉटेल्स यांना घरपोच सेवा देण्याची सूट देण्यात आली आहे. पण या संचारबंदीच्या काळात लग्न करायचे असेल तर कोर्ट मॅरेजच करावे, असे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. त्याशिवाय नागरिकांनी शासनाने घालून नियमांचं पालन करावं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

हॉटस्पॉट कुठे?

एन.टी. सी, तापडिया इस्टेट, जिजामाता नगर, रिसाला बाजार, मारवाडी गल्ली आणि वसमतसह गिरगांव, चौढी, जवळा बाजार आदी ठिकाणी रुग्णसंख्या अधिक आहे. त्यामुळे हे भाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत.

निर्बंध काय?

29 मार्च ते 4 एप्रिल पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता जिल्ह्यात कडक लॉकडाऊन असणार आहे. लाऊडस्पीकरवरून याबाबत जिल्ह्यात जनजागृती करण्यात येत आहे.

कोणत्या तालुक्यात सर्वाधिक आकडेवारी

जिल्ह्यात हिंगोली आणि वसमत या दोन तालुक्यात सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या आहे.

बेडची सुविधा काय?

एकूण बेड:- 2234
वापर :- 620
शिल्लक:- 1600

समूह संसर्गाचा जिल्ह्यात धोका आहे का?

होय, आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने जिल्ह्यात समूह संसर्गाचा मोठा धोका असल्याचं सूत्रांनी सांगितलं. 21 फेब्रुवारीपासून जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यात 19 ते 35 वयोगटातील तरुणांना सर्वाधीक कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तरुणांकडून कोरोना नियमांचे पालन केले जात नाही. बिनधास्तपणे त्यांचा बाहेर वावर असतो. त्यांच्या बेफिकीरीपणामुळेच समूह संसर्गाचा धोका वाढल्याचं सूत्रांनी सांगितलं. (ruchesh jayvanshi on announced 7 days curfew in hingoli)

रुग्णस्थिती

जिल्ह्यात कालपर्यंत 6 हजार 669 जण कोरोाबाधित असूनत त्यापैकी 5 हजार 858 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

जिल्ह्यात कालपर्यंत एकूण 94 रुग्ण कोरोनाने दगावले.

विविध रुग्णालयात 717 जणांवर उपचार सुरू आहेत.

कोरोना झालेल्या 140 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

तर 150 जणांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. (ruchesh jayvanshi on announced 7 days curfew in hingoli)

 

संबंधित बातम्या:

मुख्यमंत्र्यांचा जनतेशी संवाद, उद्धव ठाकरे 5 मोठ्या घोषणा करण्याची शक्यता

Pune lockdown update : मोठी बातमी : पुण्यात अंशत: लॉकडाऊन, 7 दिवसांसाठी बस, हॉटेल, धार्मिक स्थळं बंद

Corona Cases and Lockdown News LIVE : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा राज्यातील जनतेशी संवाद, महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता

(ruchesh jayvanshi on announced 7 days curfew in hingoli)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI